My Brother Essay In Marathi: प्रत्येक बहिणीच सगळ्यात खास नातं असत ते म्हणजे तिचा भाऊ. भाऊ म्हणजे आधार. भाऊ म्हणजे हक्काची जागा. बहिणीला भाऊ असणे म्हणजे जीवन सहजसोप होऊन जातं. भाऊ म्हणजे फक्त नात नाही तर त्या पलीकडचं एक चिरंतन अस्तित्व आहे. आज आम्ही माझा भाऊ ‘ या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये आणि दहा ओळींमध्ये निबंध सादर केला आहे.
My Brother Essay In Marathi | माझा भाऊ मराठी निबंध
भाऊ म्हणजे खोडकर आणि प्रेमळ नातं, तुझं माझं जमेना न तुझ्यावाचून करमेना असं माझं न माझ्या भावाच नातं आहे. माझा भाऊ माझासाठी माझा पहिला मित्र आहे. मित्रांमध्ये ज्याप्रमाणे थट्टा मस्करी असते तसच काहीस माझं न माझ्या भावाच नातं आहे.
माझा भाऊ आणि मी एकमेकांना खूप त्रास देत असतो, भांडणं करतो आणि मग परत एकत्र देखील येतो.
माझ्या भावाला निरनिराळ्या रंगाच्या खेळण्यातील गाड्या जमविण्याचा छंद आहे आणि आम्ही दोघे त्याचा हा छंद जोपासण्यासाठी कायम प्रयत्न करत असतो.
माझा भाऊ म्हणजे माझा पाठीराखा आहे. माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट काळात तो कायम माझ्यासोबत असतो. माझा भाऊ अभ्यासात खूप हुशार आहे. माझ्या भावाला खेळांमध्ये देखील विशेष रुची आहे. माझ्या भावाला मोठे होऊन क्रिकेटर बनायचे आहे त्यासाठी तो रोज सराव ही करत असतो. खेळाबरोबरच माझा भाऊ खूप सुंदर गाणे म्हणतो. माझा भाऊ कायम सर्व गोष्टीमध्ये तरबेज असतो.
माझा भाऊ माझ्या बाबांना सर्व कामांमध्ये मदत करतो. बाबांबरोबर बागेमध्ये झाडांची काळजी घ्यायला तो नेहमीच पुढे असतो. माझ्या भावाला बागकामाची प्रचंड आवड आहे.माझा भाऊ मला नेहमीच वेगवेगळ्या झाडांविषयी माहिती सांगत असतो. माझा भाऊ माझ्या आईचा अत्यंत लाडका आहे.
आई जवळ तो त्याचे सर्व नखरे पुरवून घेतो. माझा भाऊ माझ्या आजी आजोबांची देखील खूप सेवा करत असतो. आजोबांना तो मंदिरात घेऊन जातो. आजीला काही हवे नको याबद्दल तो कायम दक्ष असतो. माझा भाऊ अगदी आदर्श नातू आहे.
माझ्या भावाला शाळेमध्ये आदर्श विद्यार्थी म्हणून गणले जाते. सार्वजनिक जीवनामध्ये सर्वांशी सलोख्याने कसे वागले पाहिजे याचे तो एक उत्तम उदाहरण आहे. माझ्या भावाचे मित्र देखील कायम त्याच्या सोबत असतात कारण तो त्यांच्या सोबत कायम असतो. माझ्या भावाला व्यायामाची देखील अत्यंत आवड आहे.
रोज शाळेतून घरी आल्यानंतर तो एक तास व्यायाम करत असतो. माझ्या भावाला कराटे देखील येतात. माझा भाऊ इतर मुलामुलींना देखील कराटेची प्रात्यक्षिके करून दाखवतो किंबहुना शिकवत असतो.
माझा भाऊ एक उत्तम चित्रकार देखील आहे. जेव्हा शाळेमध्ये मला चित्रकलेचा अभ्यास दिलेला असतो तेव्हा मी तो माझ्या भावाकडून करून घेत असते. सुरुवातीला तो मला चित्रे काढून देणार नाही असे सांगून रडवतो मात्र नंतर मात्र तो मला सर्व चित्रे काढून देतो. मला कोणतीच गोष्ट तो मला चिडवल्याशिवाय देत नाही. मला चिडवून तो माझी चेष्टा मस्करी करत राहतो.
माझ्या अभ्यासाकडे देखील माझ्या भावाचे व्यवस्थित लक्ष असते. मला घरी दिलेला गृहपाठ तो माझ्याकडून पूर्ण करून घेतो. मला अभ्यासातील जो विषय समजला नसेल तो मी त्याला विचारते. तो मला त्यावर नेहमीच मला समजेल अशा पद्धतीने शिकवत असतो. माझा भाऊ माझे सर्व लाडदेखील पुरवत असतो.
माझा भाऊ माझ्याकडून सर्व पाठांतरे पाठ करून घेत असतो. परीक्षेच्या पूर्वी तो माझ्यासाठी एक प्रश्नपत्रिका काढून माझा सराव घेत असतो. वेळप्रसंगी तो मला एखाद्या कठोर शिक्षकाप्रमाणे ओरडतो देखील पण त्यामागे माझा अभ्यास छान झाला पाहिजे असाच त्याचा हेतू असतो.
माझा भावाला माझ्या सर्व गोष्टी माहिती असतात. तो कायम माझ्यासोबत असतो. मला आई बाबा कधी ओरडले आणि मी रडले तर तो मला शांत करतो. वेळप्रसंगी तो मला आईच्या हाताच्या मारापासून देखील वाचवतो. माझा भाऊ म्हणूनच माझासाठी कायम उभा असतो.
आम्ही दोघे मिळून सर्व सण मोठ्या आनंदाने साजरे करतो. माझ्या भावाला मी रक्षाबंधनाला राखी बांधते तेव्हा तो मला तो माझे कायम रक्षण करील असे वचन देतो. माझ्या भावाने आजवर मला प्रत्येक गोष्टीमध्ये खुप साथ दिलेली आहे आणि यापुढेही त्याच्या साथीनेच मी राहणार आहे.
माझा भाऊ हा पट्टीचा पोहणारा आहे. त्याला आजवर पोहण्याच्या स्पर्धेमध्ये आंतरशालेय पारितोषिके मिळालेली आहेत. तो पोहण्याबरोबरच नेमबाजी मध्ये देखील तरबेज आहे. माझा भाऊ एक नंबरचा नकलाकार देखील आहे. जेव्हा आम्ही सर्व भावंडे एकत्र जमतो तेव्हा तो सर्वांच्या नकला करून आम्हाला खूप खूप हसवतो. आम्ही सगळे त्याला चार्ली चॅप्लिन असेच संबोधतो .
असा हा माझा भाऊ म्हणजे गुणांची खाणच आहे. त्याच्या मनात आम्हा सर्वांविषयी खूप सारे प्रेम, करुणा आहे. तो जसा आहे तसाच खेळकर, हुशार रहावा असे मला नेहमी वाटते. माझ्या भावावर माझे खूप खूप प्रेम आहे.
Majha Bhau Nibandh In Marathi 10 lines
- माझ्या भावाचे नाव राम आहे आणि तो माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे.
- माझा भाऊ स्वभावाने मिश्किल तर आहेच पण त्याचबरोबर खूप समजूतदार देखील आहे.
- माझा भाऊ घरात सर्वांचा अत्यंत लाडका आहे, घरातील सर्व जण त्याच्यावर फार प्रेम करतात.
- माझा भाऊ आजी आजोबांची सेवा करतो तो त्यांना देवतुल्य मानतो.
- माझ्या भावाला बागकामाची आवड आहे.
- माझ्या भावाला मोठे होऊन क्रिकेटर बनायचे आहे त्यासाठी तो दररोज सराव देखील करतो.
- माझा भाऊ चित्रकलेमध्ये अगदी माहीर आहे आणि मला तो कायम चित्र काढून देण्यात मदत करतो.
- माझा भाऊ शाळेमध्ये आदर्श विद्यार्थी म्हणून गणला जातो.
- माझ्या भावाने आजवर विविध स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके जिंकली आहेत.
- माझा भाऊ माझ्या मागे प्रत्येकवेळी एखाद्या डोंगराप्रमाणे उभा राहून मला माझ्या कामामध्ये पाठिंबा देत असतो.
मित्रांनो, आज आपण माझा भाऊ या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये आणि दहा ओळींमध्ये निबंध लिहिलेला आहे. आपण हा निबंध शालेय अभ्यासक्रमासाठी वापरू शकता. आपल्याला हा निबंध कसा वाटला हे आम्हाला अभिप्राय देऊन नक्की कळवा. आपला अभिप्राय आमच्यासाठी महत्वाचा आहे धन्यवाद!