Maza Desh Essay In Marathi: माणूस जिथे राहतो भूमी बद्दल त्या व्यक्तीला कायमच एक आदर वाटत असतो कारण त्या व्यक्तीचे अस्तित्व हे त्या भूमीमुळे च असते. आज आपण आपल्या निबंध मालिकेमध्ये अशाच एका महान भूमीबद्दल निबंध सादर करत आहे. या महान भूमीचे नाव म्हणजे भारत .
Maza Desh Bharat Essay In Marathi
माझा भारत देश हा सर्वांगाने महान आहे. भारत हा प्रजासत्ताक देश आहे. भारताने संसदीय शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतामध्ये एकूण 28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. भौगोलिक दृष्ट्या भारत हा अत्यंत सुंदर देश आहे.
भारतामध्ये राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख नागरिक आहेत तर पंतप्रधान देश चालवतात. भारतात राज्याचे प्रमुख हे राज्यपाल असतात. राज्यपाल हे राष्ट्रपतींच्या अधिसूचनेखाली कार्य करीत असतात. भारत या देशांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. भारतात आधुनिकतेबरोबरच पारंपारिकतेला देखील तेवढेच महत्त्व आहे. भारताला खूप मोठा ऐतिहासिक इतिहास आहे.
भारत देशामध्ये विविधतेने भरलेले प्रदेश देखील आहेत जसे की भारताचा एखादा भाग हा समुद्रकिनारी आहे तर एक भाग वाळवंटीय प्रदेशात मोडतो. भारतातील प्रत्येक प्रदेशातील लोकांचा पेहराव वेगवेगळा आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ तर राष्ट्रीय पक्षी मोर आहे.
भारताला साहित्याचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. भारतातच रामायण आणि महाभारत ही महाकाव्य लिहिली गेली आहेत जी आज कितीतरी लाखो वर्षांनंतर देखील जनमानसावर प्रभाव टाकतात. भारतामध्ये विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात जसे की मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे.
भारतामध्ये हडप्पा, मोहेंजोदाडो यांसारखा संस्कृती होऊन गेल्या. या संस्कृती त्या काळातील सर्वात आधुनिक संस्कृती होत्या.
भारताच्या उत्तरेला हिमालयाची पर्वतरांग आहे . ही हिमालयीन शिखरे अनेक पर्यटकांना तसेच गिर्यारोहकांना कायम आकर्षित करत असतात. भारताच्या दक्षिणेला बंगालचा उपसागर आहे. भारताला अरबी समुद्र आणि हिंदी महासागराची किनारपट्टी देखील लाभलेली आहे. भारतामध्ये प्रामुख्याने शेती हा व्यवसाय केला जातो मात्र त्याबरोबरच भारतीय किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात मच्छीमारी देखील केली जाते. भारतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन उद्योगधंदे प्रस्थापित केले गेले आहेत.
भारतामध्ये विविध धर्मांची धर्मस्थळे आहेत. ही धर्म स्थळे देखील विविधतेने नटलेली आहेत. प्रत्येक धर्माचे महत्त्व त्या धर्मस्थळावरून समजून येते. भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध आणि ख्रिश्चन धर्माची धर्मस्थळे आहेत. हिंदू धर्माची भगवद्गीता तर मुस्लिम धर्माचे कुराण या सर्वांचाच भारतामध्ये आदर केला जातो. भारतामध्ये शैक्षणिक माध्यमांमध्ये देखील सर्वधर्म समानता शिकवली जाते.
भारतामध्ये लहानपणापासूनच मुलांना विविधतेमध्ये एकता शिकवली जाते. भारताला शांती दूत म्हणूनही सर्व जगभर ओळखले जाते. भारताने कायमच शांतीचा प्रचार आणि प्रसार केला आहे.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रज सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांनी भारतावर आणि भारतातील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. मात्र भारताने अहिंसेचा मार्ग सोडला नाही. भारताने शांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवले. भारताला हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दीडशे वर्ष संघर्ष करावा लागला.
प्रत्येक भारतीयाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे अमूल्य असे महत्त्व माहिती आहे. स्वतंत्र भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून काढली. भारताचे संविधान देखील त्यांनी लिहिले. आज भारत हा देश या संविधाना नुसारच चालतो.
महात्मा गांधी यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी दिलेल्या योगदानामुळे भारतीय चलनावर देखील त्यांचेच छायाचित्र आहे. महात्मा गांधी यांनी भारताला अहिंसा आणि शांती शिकवली. भारताला पूर्वी हिंदुस्थान या नावाने देखील ओळखले जात असे.
दिल्ली ही भारताची राजधानी आहे तर मुंबई ही आर्थिक राजधानी आहे.
भारतामध्ये अनेक महान व्यक्तिमत्व होऊन गेली. या महान लोकांनी भारताला जागतिक स्तरावर पुढे आणले. जमशेदजी टाटा यांनी भारतामध्ये उद्योगाचा पाया घातला. जमशेदजी टाटा यांनी भारतामध्ये अनेक लोकांना उद्योगधंदे निर्माण करून नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या ज्यावर आज कितीतरी लाखो लोक स्वतःची उपजीविका चालवत आहेत. जमशेदजी टाटा यांचा हाच वारसा पुढे रतन टाटा यांनी चालवला. आज भारतामध्ये टाटा उद्योग समूह हा अग्रगण्य आहे.
भारतामध्ये अनेक महान कवी कवयित्री होऊन गेल्या. पंडित भीमसेन जोशी हे म्हणजे जणू पृथ्वीवरचे गंधर्वच. भारतात अनेक कलाकृतींमध्ये प्राविण्य मिळवलेले कलाकार आहेत जे येथील समाज माणसांवर आपला एक प्रभाव अथवा छाप टाकून आहेत. भारताची इस्त्रो ही संस्था अवकाशातील वेगवेगळे प्रयोग करत असते.
आजवर या संस्थेने चंद्र,मंगळ या ग्रहांवर यशस्वीरित्या उपक्रम राबवले आहेत. इस्त्रो ही संस्था जगातील नासा या संस्थेच्या तोडीस तोड काम करत आहे आणि भारताचे नाव जगभर प्रसिद्ध करत आहे.
भारतीय चित्रपट सृष्टी देखील जगभर प्रसिद्ध आहे .भारतातील चित्रपटसृष्टीचा पाया दादासाहेब फाळके यांनी घातला आहे. आज भारतीय चित्रपट सृष्टीतील कलाकार जगभर आपला ठसा उमटवत आहेत.
भारतीय साहित्य क्षेत्र देखील संपूर्ण जगभर नावाजले गेलेले आहे. असा हा माझा भारत देश मानवता, करुणा, बंधुप्रेम आणि सर्जनशीलता यांचे प्रतीक आहे. माझा हा वैविधतेने नटलेला भारत देश मला फार फार आवडतो आणि मला माझ्या या भारत देशाचा अभिमान आहे.
Maza Desh Nibandh In Marathi 10 Lines: माझा देश निबंध 10 ओळी
- माझ्या भारत देशावर माझे फार प्रेम आहे आणि मला माझ्या देशाचा अभिमान आहे.
- माझ्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि आज माझा देश संपूर्ण जगामध्ये मानवता, बंधुता आणि शांतीसाठी प्रसिद्ध आहे.
- माझ्या भारत देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक अगदी गुण्यागोविंदाने राहतात.
- माझ्या भारत देशाची प्रमुख भाषा ही हिंदी आहे मात्र त्याबरोबरच प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या बोलीभाषा बोलल्या जातात.
- माझ्या भारत देशामध्ये सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येक व्यक्ती हा व्यक्त होऊ शकतो.
- माझ्या भारत देशाने संसदीय शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे तसेच माझा भारत देश हा जगातील सर्वात मोठा लोक तांत्रिक देश आहे.
- वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे तर मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे.
- माझ्या भारत देशामध्ये एकूण 28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत.
- माझ्या भारत देशामध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार जन्माला आले आहेत ज्यांनी माझ्या भारत देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे.
- माझा भारत देश वैविधतेने नटलेला आहे त्याचबरोबर तो सर्वधर्म समभाव बाळगतो तसेच माझा देश हा धर्मनिरपेक्ष आहे आणि माझ्या देशावर माझे फार फार प्रेम आहे.
मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी माझा भारत देश या विषयावर निबंध सादर केला आहे. आपणास हा निबंध कसा वाटला हे आम्हाला अभिप्राय देऊ नक्की कळवा. आपल्यासाठी असेच नवनवीन विषयांवर निबंध सादर करायला आम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद!