My Favourite Game Essay Marathi: माणसाने आपले आयुष्य हे एखाद्या स्वच्छंदी पक्ष्याप्रमाणे जगले पाहिजे असे मी मानते कारण त्याशिवाय जगण्यात खरी मजा आहे हे लोकांना कळत नाही. या स्वच्छंदी जीवनात जगताना माणसाला कायम जमिनीवर राहण्याचे भान देखील ठेवले पाहिजे. हे भान जर जपायचे असेल तर माणसाने स्वतःला एखाद्या छंदात गुंतवून ठेवले पाहिजे. काही व्यक्तींना पुस्तके वाचायला आवडतात तर काहींना गाणी गुणगुणायला आवडतात. काहींना खेळ खेळून आपला उत्साह वाढवायला आवडते. अशाच व्यक्तींसाठी आज आपण हा निबंध सादर करीत आहोत ज्यांना मुळातच खेळाची प्रचंड आवड आहे. आज आपण 100 ते 500 शब्दांमध्ये माझा आवडता खेळ -क्रिकेट या विषयावर निबंध सादर करीत आहोत.
Cricket Essay In Marathi
आपल्या भारतीयांना जर कोणी प्रश्न विचारला की तुमचा आवडता खेळ कोणता तर 50% होऊनही अधिक लोक क्रिकेट आहेच उत्तर देतील. भारतीयांसाठी क्रिकेट हा खेळ म्हणजे धर्म बनलेला आहे. भारताने कितीतरी उत्कृष्ट क्रिकेटपटू आजवर दिलेले आहेत. जेव्हा भारताने सर्वात पहिला वर्ल्ड कप कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता तेव्हा सर्व भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
लिटिल मास्टर सुनील गावसकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली,वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, गौतम गंभीर, एम एस धोनी, विराट कोहली , व्हीव्हीएस लक्ष्मण, हरभजन सिंग, युवराज सिंग अशी कित्येक नावे जी इतिहासाच्या पटलावर लिहिली गेली आहेत. क्रिकेट या खेळाचा इतिहास जर उलगडला गेला तर भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावरच आपल्याला सर्वात जास्त विश्वविक्रम रचलेले पाहायला मिळतील.
क्रिकेट हा खेळ फक्त खेळ न राहता तो प्रत्येक भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे. आज नवीन पिढी देखील क्रिकेटचा हा ठेवा पुढे नेत आहे. क्रिकेट हा खेळ भारतीयांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. भारतातील प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला भविष्यातले सचिन विराट तयार होताना दिसत असतीलच. क्रिकेट हा खेळ मला देखील फार फार आवडतो.
क्रिकेट खेळासाठी आपल्याजवळ फक्त एक बॅट हवी आणि एक बॉल हवा. बाकी क्रिकेटमध्ये लागणारे साहित्य म्हणजे स्टम्प म्हणून आपण एखादा टायर लावून देखील क्रिकेट खेळू शकतो. असे क्रिकेट तुम्हाला गल्लीबोळामध्ये दिसेल. मला क्रिकेटची आवड ही अगदी लहानपणापासूनच होती.
लहानपणी प्लास्टिकचा बॉल आणि प्लास्टिकची बॅट वापरून मी क्रिकेट खेळत असे. सगळे घरचे मला बॉल टाकत आणि मग मी माझी बॅट घालून हवे तसे वाकडे फटके मारत असे. क्रिकेट खेळताना एक वेगळीच मजा वाटत असे. जेव्हा मी शाळेत जायला लागलो तेव्हा आम्ही सर्व मित्र मिळून आमची क्रिकेटची टीम बनवली. विरोधी टीम सोबत आम्ही क्रिकेट खेळताना फारच मज्जा येत असे. ज्याची बॅट असेल तो कायम स्वतःकडे बॅटिंग ठेवत असे.
आम्ही त्याला बॉल टाकून अक्षरशः दमून जात असू. जेव्हा आमची बॅटिंग खेळायची वेळ येई तेव्हा तो मित्र त्याची बॅट घेऊन घरी जात असते तेव्हा त्याचा फारच राग येत असे. मात्र क्रिकेटवरील माझे प्रेम कधीच कमी झाले नाही.
मी शाळेमध्ये आजही क्रिकेट खेळतो. शाळेमध्ये ज्या टूर्नामेंट्स असतात त्यामध्ये मी आवर्जून सहभाग घेतो. क्रिकेट हा खेळ संपूर्ण संघाची एकजुटता दाखवतो म्हणून मला हा खेळ खूप आवडतो. क्रिकेटमध्ये कोणताही व्यक्ती एकटा जिंकत नाही तर त्याचा पूर्ण संघ जिंकतो. क्रिकेटमुळे तुम्हाला संघ कौशल्य विकसित करता येते. सर्वांनी एकत्रित रित्या काम करताना प्रत्येकाचा स्वभाव भिन्न असतोच पण त्या भिन्न स्वभावाला एकत्र घेऊन त्याला स्वतःची ताकद कशी बनवायची हे आपल्याला या खेळातून शिकायला मिळते.
क्रिकेट खेळताना त्यातील बारकावे शिकताना फारच मजा येते. क्रिकेटचे नियमही सर्वांना समजायला सोपे आहेत त्यामुळे तो खेळ सर्व प्रकारच्या लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. रन आउट होणे, स्टंपिंग होणे, एल बी डब्ल्यू, वाईड बॉल,नो बॉल असल्यावर फ्री-हीट मिळणे . ही क्रिकेटचे नियम फारच भन्नाट आहेत.
मला देखील मोठे झाल्यावर एक क्रिकेटर म्हणून स्वतःचे नाव कमवायचे आहे. मला क्रिकेट खेळताना पीच चा अंदाज लावायलाही आवडते. जो खेळाडू पीच चा अंदाज व्यवस्थित लावू शकतो तो खेळाडू हा खेळ निम्मा जिंकला असे समजायला हरकत नाही. कितीतरी वेळा संपूर्ण खेळ याच गणितावर बदलता येतो. कधी कधी असेही म्हणतात की क्रिकेट हा नशिबाचा खेळ आहे. पाऊस कधी आला तर क्रिकेटचे नियम पुन्हा बदलतात.
क्रिकेट हा जंटलमन्स गेम आहे असेही म्हटले जाते हे देखील चुकीचे नाही. परंतु काही खेळाडू या खेळाला गालबोट लावेल असे काम करतात. मात्र अशावेळी क्रिकेट मधील उच्च संस्था त्यांना योग्य ती शिक्षा सुनावतात. कधी कधी क्रिकेट खेळत असताना जागतिक दर्जाच्या खेळाडूंमध्ये देखील बाचाबाची होते अशावेळी खेळामध्ये संयम किती गरजेचा असतो हे आवर्जून ध्यानात घ्यावे असे वाटते.
क्रिकेट मधील काही त्रुटी सोडल्या तर क्रिकेट हा उत्तम खेळ आहे आणि तो खिलाडी वृत्तीने खेळला तर आपण हरू किंवा जिंकू याने काहीच फरक पडत नाही उलट खेळाचा मनमुराद आस्वाद घेतला गेला पाहिजे असे तत्व मी मानतो. म्हणूनच मला क्रिकेट हा खेळ फार आवडतो.
Majha Avadta Khel Cricket Nibandh In Marathi 10 Lines
- क्रिकेट हा माझा अत्यंत आवडीचा खेळ आहे.
- भारतामध्ये तर क्रिकेट या खेळाची एखाद्या धर्माप्रमाणे पूजा केली जाते इथे क्रिकेट हाच धर्म मानला जातो.
- भारताने आजवर इतिहास यामध्ये तीन वेळा विश्व करंडक उंचावलेला आहे.
- क्रिकेटचे विविध प्रकार आहेत जसे की वन डे क्रिकेट, कसोटी क्रिकेट आणि ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट
- क्रिकेट या खेळाने भारताला जागतिक दर्जाचे खेळाडू मिळवून दिले आहेत.
- भारतातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या नावावर क्रिकेट जगतामध्ये अनेक विश्वविक्रम रचले गेले आहेत.
- विराट कोहली हा क्रिकेट खेळाडू तर सर्व भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेला आहे.
- एम एस धोनी ने भारताला स्वतःच्या नेतृत्वाखाली आजवर कित्येक करंडक जिंकून दिले आहेत.
- क्रिकेट हा खेळ जेंटलमन्स गेम म्हणून प्रसिद्ध आहे.
- मला देखील इतर खेळाडू प्रमाणे आपल्या देशाचे नाव क्रिकेट या खेळामध्ये उज्वल करायचे आहे.
आज आपण माझा आवडता खेळ क्रिकेट या विषयावर 100 ते 500 शब्दांमध्ये आणि दहा ओळींमध्ये निबंध सादर केला आहे.
आपणाला हा निबंध कसा वाटला हे आम्हाला अभिप्राय देऊन नक्की कळवा आपला अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे .धन्यवाद!