My Favourite Fort Essay In Marathi: माझा आवडता किल्ला निबंध मराठी

Fort Essay In Marathi: सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव ‘ कोंढाणा ‘ असे होते. पुण्याच्या नैऋत्य दिशेला भूलेश्वराच्या डोंगररांगांमध्ये सिंहगड हा किल्ला आहे. सिंहगड या किल्ल्याला 2000 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार होण्याआधी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. सर्वप्रथम किल्ला महादेव कोळी समाजाच्या राजांचा होता. आजही या गडावर फिरताना आपल्याला महादेव कोळी समाजातील लोकं भेटतील ज्यांना या किल्ल्यावर बद्दल भरपूर माहिती उपलब्ध आहे.

ऐतिहासिक बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला मोघलांना द्यावा लागला होता. नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हा किल्ला जिंकला. सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंडाणा होते मात्र जेव्हा तानाजी मालुसरे हा किल्ला लढवताना दारातील ती पडले तेव्हा शिवाजी महाराजांच्या मुखातून उद्गार निघाले,”गड आला, पण माझा सिंह गेला”.

शिवाजी महाराजांसाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपल्या मुलाचे लग्नही पाहिले नाही. सिंहगड किल्ला लढायला जाताना तानाजी मालुसरांचे उद्गार होते,”आधी लगीन कोंढाण्याचे, आणि मग माझ्या रायबाचे”. आजही कोणतेही कार्य करताना आधी कोणत्या कार्याला महत्त्व द्यायचे असेल तर हेच वाक्य सर्वांच्या तोंडी असते.

एका सहली दरम्यान मला सिंहगड किल्ल्यावर जाण्याची संधी मिळाली. सिंहगड किल्ल्याला दोन प्रवेशद्वार आहेत. एक म्हणजे पुणे प्रवेशद्वार, दुसरे म्हणजे कल्याण दरवाजा. कल्याण दरवाजाच्या पुढेच आपल्याला तानाजी कडा दिसतो. सिंहगडावरती घोड्यांच्या बागेसाठी खूप मोठे दगडांमध्ये कोरलेली जागा आहे.

आजही घोड्यांची पागा गडावर अगदी सुस्थितीत बघायला मिळते. सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक आहे. हे स्मारक पाहताना मराठ्यांसाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान दिलेले तानाजी मालुसरे आठवतात.

सिंहगडावर लोकमान्य टिळकांचे अस्तित्व असलेली एक जागा आहे. लोकमान्य टिळकांचा बंगला सिंहगडावर आहे. टिळकांना भेटण्यासाठी गांधीजी देखील सिंहगडावर येत असत.सिंहगडावर देव टाके नाव असलेली एक निसर्गतः निर्माण झालेली पाण्याची जागा आहे. जेव्हा गांधीजी टिळकांना भेटण्यासाठी या गडावर येत तेव्हा ते आवर्जून या देव टाके मधील पाणी पिण्यासाठी मागवत असे म्हटले जाते.

सिंहगड आपल्याला मराठ्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत अजूनही उभा आहे. एक गडप्रेमी म्हणून आपण या गडांचे संवर्धन होण्यासाठी कायम पुढाकार घेतला पाहिजे. गडाचे बुरुज ढासळत चालले आहेत तर त्यावर उपाय योजले पाहिजेत. काही उत्साही लोक गडावर फक्त फोटो काढण्यासाठी येतात आणि स्वतःची नावे गडाच्या ऐतिहासिक ठेव्यावर कोरून जातात जे अतिशय चुकीचे कृत्य आहे. अतिउत्साही लोकांच्या अशा गोष्टींना योग्य शासन केले गेले पाहिजे.

किल्ल्यावर फिरायला जाताना आपण किल्ल्याच्या स्वच्छतेचे भान बाळगले पाहिजे. आपण खाण्यासाठी नेलेल्या वस्तू या कचरा कुंडीतच टाकल्या पाहिजेत. गड किल्ल्याचे संवर्धन करणे हे आपल्या प्रत्येकाचा कर्तव्य आहे. ज्याप्रमाणे आपण नागरिक म्हणून आपल्या हक्कांविषयी बोलतो त्याचप्रमाणे एक सुजाण नागरिक म्हणून ज्या जबाबदाऱ्या आपल्यावर आहेत त्या जबाबदाऱ्यांचे पालन देखील आपण केले पाहिजे.

सिंहगड किल्ला हा शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची मूर्तीमंत पावती आहे. सिंहगड किल्ला लढताना कितीतरी मावळे धारातीर्थी पडले होते त्या सर्व मावळ्यांचे आपण ऋण मानले पाहिजे. सिंहगड किल्ल्यावर उभे राहिले असता समोर पुरंदर, तुंग, तिकोना, राजगड हे किल्ले देखील इतिहासाची साक्षी देत उभे आहेत. प्रत्येकाने आवर्जून एकदा तरी सिंहगडाला भेट दिली पाहिजे.

सिंहगड किल्ला १० ओळी निबंध मराठी

  1. सिंहगड म्हणजेच कोंढाणा हा माझा आवडता किल्ला आहे.
  2. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी प्राणांची शर्थ करून हा किल्ला मुघलांच्या ताब्यातून परत मिळवला होता.
  3. नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपल्या हाताची ढाल करून उदयभान विरुद्ध लढून किल्ला जिंकण्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले होते.
  4. “गड आला पण माझा सिंह गेला”, हे शिवाजी महाराजांचे मुखोद्गर याच किल्ल्यावर लढताना वीरमरण आलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या साठी होते.
  5. “आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे”ही वाणी नरवीर तानाजी मालुसरे यांची होती.
  6. आज सिंहगड अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे, आपण त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजे.
  7. सिंहगडावर लोकमान्य टिळकांनी वास्तव्य केलेला टिळक बंगला आज ही अस्तित्वात आहे.
  8. शिवकालीन घोड्यांची पागा आजही सिंहगडावर आहे.
  9. सिंहगडाला पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा आहे.
  10. सिंहगड हा किल्ला जतन करून आपला इतिहास आपण जिवंत ठेवला पाहिजे त्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे.

सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?

सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा असे होते.

सिंहगड या किल्ल्याला कोणते दरवाजे आहेत?

सिंहगड या किल्ल्याला दोन दरवाजे आहेत एकाला पुणे प्रवेशद्वार तर दुसरा कल्याण दरवाजा या नावाने ओळखला जातो.

तानाजी मालुसरे यांच्या बद्दल शिवरायांनी कोणते उद्गार काढले?

गड आला पण माझा सिंह गेला ‘, हे उद्गार शिवरायांनी तानाजी मालुसरे यांच्या बद्दल म्हटले.

Leave a Comment