My Favourite Animal Dog Essay In Marathi: माझ्या घरी अनेक प्राणी आम्ही पाळले आहेत ज्यांमध्ये गाई आणि म्हशी, मांजर याच बरोबरीने कुत्र्याचा समावेश होतो. आमचा स्वतःचा दुग्ध व्यवसाय असल्याकारणाने आमच्या घरी फार मोठा गाईंचा आणि म्हशींचा गोठा आहे. आम्ही सर्वजण एकत्र राहतो तसेच घराचा परिसर देखील अत्यंत मोठा आहे म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आमच्या घरी कुत्रा देखील आहे.
आमच्या कुत्र्याचे नाव मोती आहे. कुत्रा आणि मला सर्वात जास्त आवडतो. कुत्रा माणसाला कधीच सोडत नाही तो कायम एका इमानदार पाळीव प्राण्याप्रमाणे आपल्या मालकासोबत राहतो. इमानदारी कोणासारखी असावी तर ती कुत्र्यासारखे असावी असे उगाच म्हटले जात नाही.
कुत्रा हा प्राणी प्रामुख्याने लांडगा या प्राणी वर्गातीलच मोडतो असे म्हटले जाते. लांडगे जंगलात राहतात त्यातील काही मानवी वस्तीत राहायला लागले आणि त्यातूनच पुढे कुत्रे निर्माण झाले असे म्हणतात. कुत्र्याकडून आपण प्रामाणिकपणे काम कसे केले पाहिजे हे शिकतो. कुत्रा खाल्लेल्या भाकरीला नेहमी जागतो असे म्हटले जाते.
एखादा कुत्रा जर तुम्हाला भुकेला ला दिसला आणि तुम्ही त्याला एक भाकरी टाकलीत तर तो त्याचे ऋण कधीच विसरत नाही आणि तो कायम आपल्या मागे असलेला आपल्याला आढळून येतो. कुत्रा हा प्राणी संकटातून बचाव करताना साठी देखील उपयोगी ठरू शकतो कारण त्याचे दात अतिशय तीक्ष्ण असतात ते हमला वारावर परत वार करून आपले रक्षण करू शकतात.
अनेक ठिकाणी कुत्रा या प्राण्याला शिकारीसाठी सोबत घेऊन जाणे सोयीस्कर ठरते. आपण एखाद्या निर्जन जंगलामध्ये जर फिरायला जात असो तर सोबत कुत्रा असला तर आपण सुरक्षित आहोत असे मानण्यात येते. कुत्र्याचे नाक हे अतिशय दूरवर असलेला वास देखील सहज ओळखू शकते आणि त्यावरून तो लवकर सावध देखील होतो म्हणूनच जखमीच्या ठिकाणी कुत्रा हा प्राणी बाळगणे फायदेशीर ठरते.
कितीतरी मेंढपाळ हे मेंढ्यांच्या आणि शेळ्यांच्या कळपाबरोबर आपल्या मध्ये एखादा कुत्रा देखील ठेवतात. जेव्हा हे मेंढपाळ एखाद्या रानामध्ये मेंढ्या चारण्यासाठी नेतात तेव्हा या मेंढ्यांवर अचानक एखादा जंगली प्राणी हल्ला करू शकतो त्याकरता संरक्षण म्हणून कुत्रा पाळला जातो.
एखाद्या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी देखील कुत्रा या प्राण्याचा उपयोग केला जातो. गुन्हा अन्वेषण विभागामध्ये आपल्याला विविध प्रकारचे कुत्रे आढळून येतील जे आपल्या पोलीस मित्रांना गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना शोधण्यासाठी मदत करतात. एखादा गुन्हा घडून गेला असेल आणि त्या गुन्ह्याचा एखादा धागा जरी पोलिसांना सापडला तरी तो कुत्र्याच्या साहाय्याने पूर्ण गुन्हेगार शोधण्यामध्ये उपयोगी पडतो.
आज काल लोक हाऊस म्हणून देखील विविध प्रकारचे कुत्रे पाळतात. कुत्र्यांच्या विविध जाती उपलब्ध आहेत. हस्की नावाचा कुत्रा हा आपल्याला बर्फाळ प्रदेशांमध्ये आढळतो मात्र आता हा कुत्रा अनेक सधन कुटुंबांमध्ये देखील पाळलेला आपल्याला आढळून येतो. हस्की हा कुत्रा पाळताना फक्त तुमच्या घरी वातानुकूलित यंत्रणा हवी असते तसेच त्यांचे खानपान देखील इतर कुत्र्यांपेक्षा वेगळे असते. चिहुअहुआ जातीचे कुत्रे देखील इतर कुत्र्यांपेक्षा फारच वेगळे आणि आकाराने एकदम लहान असतात.
भारतामध्ये आज काल सर्वत्र लॅब्रेडोर जातीचे कुत्रे आढळून येतात. हे कुत्रे आपल्या मालकाच्या मुलाप्रमाणे त्याच्यासोबत बागडताना दिसतात. हे कुत्रे दिसायलाही अगदी गुबगुबीत असतात. जर्मन शेफर्ड या जातीचे कुत्रे हे प्रामुख्याने शिकार करण्यासाठी वापरले जातात. या कुत्र्यांची उंची ही एखाद्या साधारण माणसा इतकी आढळते. पग जातीचे कुत्रे आपण जाहिरातीमध्ये पाहिले आहेतच. ते फारच गोंडस दिसतात.
आजवर चित्रपटामधून देखील अनेक कुत्र्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. एन्टरटेन्मेंट चित्रपट हा तर पूर्णपणे एका कुत्र्याच्या आयुष्यावर चित्रित केला आहे आणि त्यामध्ये त्या प्राण्याने उत्तम सादरीकरण देखील केले आहे. तेरी मेहेरबानिया या चित्रपटामध्ये देखील सर्व शत्रूंचा बीमोड एका कुत्र्याने करून चित्रपटाच्या नायकाला न्याय मिळवून दिलेला दाखवला आहे.
कुत्रा हा प्राणी एक चांगला साथीदार आहे. जे लोक एकटेपणाने जगतात अशा लोकांना डॉक्टर नेहमी एखादा कुत्रा पाळण्याचा सल्ला देतात जेणेकरून त्या व्यक्तीला एकटेपणा वाटणार नाही अशा रीतीने कुत्रा हा प्राणी माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
Maza Avadta Prani Kutra Marathi Nibandh 10 Lines
- कुत्रा हा माझा सर्वात आवडता प्राणी आहे कारण तो माणूस अशी कायम प्रामाणिक राहतो.
- कुत्रा हा प्राणी आपल्याला संरक्षण देतो तसेच तो त्याच्या इमानदारीमुळे देखील ओळखला जातो.
- कुत्रा या प्राण्याच्या अनेक विविध प्रजाती आज आपल्याला सर्वत्र आढळून येतात जसे की जर्मन शेफर्ड, पग, पामेलियन, लॅब्रॉडॉर आणि चिहुअहुआ.
- कुत्रा हा प्राणी अनेक शेतकरी ज्यांच्याकडे गाई म्हशी हे पाळल्या जातात अशा रक्षणासाठी वापरला जातो.
- आजही शिकार करण्यासाठी काही भागांमध्ये सोबत कुत्रा नेण्याची प्रथा आहे.
- कुत्रा या प्राण्याचे नाक कुठलाही वास अतिशय पटकन ओळखू शकते.
- जर एखादी नैसर्गिक आपत्ती ओढवणार असेल तर त्याचे ज्ञान देखील या प्राण्याला खूप आधीच येते आणि तो विचित्र पद्धतीने ओरडू लागतो असे पूर्वज सांगतात.
- अनेक मेंढपाळ आपल्या प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी सोबत कुत्रे बाळगतात.
- पोलीस मित्र देखील आणि गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी कुत्रा या प्राण्याचा वापर करतात आणि गुन्हेगारांना शोधतात.
- कुत्रा हा प्राणी माणसांसोबत कुटुंबाचा एक भाग म्हणून राहतो आणि माणसे देखील त्याला आपल्या घरातील एक सदस्य म्हणून वागणूक देतात.
कुत्रा हा प्राणी कोणत्या स्वभावामुळे ओळखला जातो?
कुत्रा हा प्राणी आपल्या प्रामाणिक स्वभावामुळे ओळखला जातो.
कुत्र्याच्या प्रजातींची काही नावे सांगा?
कुत्रा या प्राण्याच्या अनेक विविध प्रजाती आज आपल्याला सर्वत्र आढळून येतात जसे की जर्मन शेफर्ड, पग, पामेलियन, लॅब्रॉडॉर आणि चिहुअहुआ.
कुत्रा पोलिसांचा मित्र म्हणून कसे काम करतो?
गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी पोलीस कुत्र्याचा उपयोग करतात.