Child Labour Essay In Marathi: बालकामगार निबंध मराठी

Child Labour Nibandh In Marathi: भारत देश हा विकसनशील देशांमध्ये गणला जातो. भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्रितरित्या आनंदाने राहतात. भारत हा देश समृद्ध म्हणून गणला जातो मात्र भारतामध्ये देखील गरीब श्रीमंत अशी दरी आपल्याला आढळून येते. भारताचे बहुतांश श्रीमंत लोक आहेत त्यांना सर्व सोयी सुविधा मिळतात मात्र मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना या सोयी सुविधांसाठी देखील संघर्ष करावा लागतो.

दारिद्र्यरेषेखालील लोकांमध्ये तर परिस्थिती फारच बिकट आढळते. दारिद्र रेषेखालील कुटुंबांमध्ये शिक्षणाचा अभाव, पैशांची कमतरता , अन्नाची कमतरता या कारणामुळे घरातील प्रत्येक सदस्याला कोणते ना कोणते काम करून आपली उपजीविका चालवणे भाग पडते. अशा कुटुंबांमध्ये असलेली लहान मुले मात्र विनाकारण या चक्रामध्ये भरडली जातात.

घरातील लहान मुलांनी घरातील एखादी काम करणे याला आपण बाल काम म्हणू शकतो. जेव्हा 14 वर्षे वयोगटात खालील मुले ही घर सोडून इतरत्र ठिकाणी अर्थार्जनासाठी काम करतात तेव्हा अशा मुलांना बालकामगार म्हटले जाते. बाल कामगार पैसे मिळवण्यासाठी काम करतात. भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये बालकामगार विरोधी कायदा आणला होता.

आजही 21व्या शतकामध्ये आपल्याला बालकामगार ही संकल्पना दृष्टीस पडते जी अत्यंत चुकीची आहे. संविधानामध्ये बालकामगार विरोधी कायदा आणून सर्व बालकांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. शिक्षणाचा अभाव असल्याकारणाने अशा मुलांच्या पालकांना या कायद्याचे महत्त्व आजही समजत नाही.

बालकामगार हे आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवण्यासाठी पडेल ते काम करतात. काही कारखान्यांमध्ये उदाहरणार्थ विडीचा कारखाना, रसायन कारखाना अशा ठिकाणी छोटी कामे करण्यासाठी बालकामगारांचे नियोजन केले जाते. अशा ठिकाणी काम करण्यामुळे या लहान मुलांना फुफुसाचे आजार तसेच त्वचा विकार झालेले आढळतात.

कारखान्यामध्ये काम करणाऱ्या बालकामगारांची परिस्थिती अत्यंत भयावह झालेली आढळते. लहान मुलांना अगदी कमी काळामध्ये काम करावे लागल्या कारणाने त्यांची वाढ खुंटते. मुलांना चांगले आणि पौष्टिक आहार खायला मिळाले नाही तर कुपोषणाची समस्या निर्माण होते.

मुले ही राष्ट्राची संपत्ती आहेत असे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणत असत आपण ही संपत्ती योग्य रीतीने साठवली तर देशाचा भविष्यकाळ उज्वल होतो मात्र अजूनही बालकामगार आपल्याला पूर्णपणे हटवण्यामध्ये अपयश आलेले आहे.

बालकामगार निर्माण होण्यामागे अनेक कारणे आहेत जसे की या मुलांच्या घरांमध्ये आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असते. घरातील एका व्यक्तीवर संपूर्ण कुटुंबाची उपजीविका चालवणे अवघड असते. घरातील लोकांना शिक्षण विषयक ज्ञान नसते. घरातील प्रौढ शिक्षित नसल्यामुळे त्यांना सरकारी योजना काय आहेत आणि त्याचा लाभ घेऊन या दारिद्र्यरेषेतून बाहेर कसे पडावे याविषयी काहीच माहिती नसते.

बालकामगार देखील काम केल्यानंतर पैसे मिळतात या भावनेतून कामालाच प्राधान्य देताना आढळतात आणि पुस्तकांपासून व शिक्षणापासून दूर राहणे पसंत करतात. एखादा मुलगा आधी बालकामगार म्हणून काम करत असेल आणि नंतर त्याला सुधारण्याची संधी मिळाली आणि त्याने शाळेमध्ये प्रवेश घेतला तरी समाजातील इतर लोक त्याला हीन दर्ज्याची वागणूक देतात ही देखील बालकामगार वाढीस कारणीभूत असलेली गोष्ट आहे.

बालकामगार कमी करण्यासाठी भरपूर उपाययोजना करता येऊ शकतात. जसे की जी लहान मुले बालकामगार म्हणून काम करत आहेत अशांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना मोफत शिक्षण दिले गेले पाहिजे.

बालकामगारांना शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे महत्त्व पटवून दिले गेले पाहिजे. प्रौढ व्यक्तींना सर्वात आधी साक्षर केले पाहिजे जेणेकरून ते बालकामगार निर्माण होऊ देणार नाही. लोकांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व समजावून सांगितले गेले पाहिजे जेणेकरून लोकसंख्या वाढीला आळा बसेल परिणामी कुटुंबाला अर्थार्जनासाठी त्रास सहन करावा लागणार नाही.

भारताचे एक सजग नागरिक म्हणून आपण बाल कामगार तयार होण्यास कायम विरोध केला पाहिजे आणि आपल्या आसपास जर कोणी बाल कामगार काम करत असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन करून त्याला शिक्षण प्रवाहात आणले पाहिजे.

Bal Kamgar Marathi Nibandh 10 Lines

  1. शून्य ते चौदा वर्ष वयोगटातील मुलं जेव्हा एखाद्या ठिकाणी अर्थार्जनासाठी काम करतात तेव्हा त्यांना बालकामगार म्हणून गणले जाते.
  2. घरातील प्रौढ लोकांच्या अज्ञानामुळे आणि घरातील लोकांच्या उपजीविकेसाठी लहान मुलांना कामगार म्हणून काम करावे लागते.
  3. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांमध्ये लोकसंख्या वाढ देखील असते अशावेळी घरातील लोकांचा उदरनिर्वाह हा चालवणे मुश्किल होते म्हणून घरातील सर्वच लोक कामगार म्हणून सर्व ठिकाणी काम करतात.
  4. लहान वयातच मुले बालकामगार म्हणून काम करतात त्यामुळे त्यांचा त्यावर वाईट परिणाम होतो आणि मुले परिणामी कुपोषित होतात.
  5. बालकामगारांना पौष्टिक आहार मिळत नाही तसेच कारखान्यांमध्ये काम करून अशा लहान मुलांना विविध प्रकारचे आजार जडतात.
  6. भारत सरकारचे संविधान जेव्हा निर्माण करण्यात आले तेव्हा आंबेडकरांनी बालकामगार विरोधी कायदा संसदेमध्ये आणला.
  7. उद्योगधंद्यांच्या ठिकाणी 14 वर्षे वयोगटापेक्षा लहान मुलांना कामावर ठेवण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.
  8. लहान मुलांना मोफत शिक्षण दिले गेले पाहिजे जेणेकरून त्यांना शिक्षणाची गोडी लागेल.
  9. शिक्षणामुळे माणूस समृद्ध होतो म्हणूनच या बाल कामगारांना या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी योग्य शिक्षण मदत करू शकते.
  10. आपण देखील एक सजग नागरिक म्हणून जिथे आपल्याला बालकामगार काम करताना आढळतील तिथे विरोध केला पाहिजे.

बालकामगार म्हणजे काय?

१४ वर्षांखालील वयोगटातील मुले जेव्हा शिक्षणाऐवजी घराबाहेर अर्थार्जनासाठी काम करतात, तेव्हा अशा मुलांना बालकामगार असे म्हणतात. बालकामगार ही सामाजिक समस्या असून ती मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासाला अडथळा आणते.

बालकामगार निर्माण होण्याची मुख्य कारणे कोणती?

दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी, लोकसंख्या वाढ, पालकांचे अज्ञान आणि सरकारी योजनांची माहिती नसणे ही बालकामगार निर्माण होण्याची प्रमुख कारणे आहेत.

बालकामगार रोखण्यासाठी कोणते उपाय करता येतील?

मोफत व सक्तीचे शिक्षण, पालकांचे प्रबोधन, गरिब कुटुंबांना आर्थिक मदत, सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि समाजातील जागरूकता वाढवणे या उपायांनी बालकामगार कमी करता येऊ शकतात.

Leave a Comment