Swachteche Mahtwa Nibandh In Marathi: मित्रांनो शाळेत जाणारी मुले जर टापटीप जात असतील तर अशी मुले सर्वांनाच हवीहवीशी वाटतात. एखादा मुलगा केस नीट न करता, मळलेले कपडे घालून जर वर्गात गेला तर अशा मुलांशी बोलायला कोणताच विद्यार्थी पुढे होत नाही. अशी वागणूक का मिळते तर अस्वच्छतेमुळे लोक तुमच्या पासून दूर पळत असतात.
आपल्याला जर स्वच्छता प्रिय असली तर आपणही सर्वांना प्रिय होऊन जातो हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. आम्ही इयत्ता पहिली मध्ये असताना आम्हाला गणू नावाच्या मुलाची एक गोष्ट शाळेमध्ये सांगितली जात असे.
गणू नावाचा मुलगा अत्यंत घाणेरडा राहत असे. गणू रोज आंघोळ करत नसे. तो दातही घासत नसे. अंगावर स्वच्छ कपडे घालण्याऐवजी तो मळकी कपडे घालत असे.
असा हा गणू वर्गात गेला की एकही मुलगा त्याच्या जवळ जाऊन बसत नसे. एके दिवशी गणू एकटाच वर्गामध्ये रडत होता तेव्हा बाईंनी येऊन त्याला विचारले की तुला काय झाले आहे ? तू का रडत आहेस? गणू म्हणाला बाई वर्गात माझ्याशी कोणीच बोलत नाही याचे मला वाईट वाटते आणि म्हणून मी रडत आहे.
त्यावेळी वर्गातील बाई गणूला म्हणाल्या गणू स्वच्छ राहायला चालू कर सगळी मुले आपण होऊन तुझ्याशी बोलतील. दुसऱ्या दिवशी गणेश स्वच्छ आंघोळ करून, चांगला गणवेश घालून ,केस विंचुरून शाळेमध्ये आला. गणूला या नवीन अवतारात पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले आणि सर्वजण आपण होऊन त्याच्याशी बोलण्यासाठी पुढे आले. या छोट्याशा गोष्टीतून आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व समजू शकते.
आपण दररोजच्या जीवनामध्ये आपली शारीरिक स्वच्छता जपली पाहिजे. आज काल विविध प्रकारचे आजार माणसाला होत आहेत. आजारांमागे अनेक सूक्ष्म जीवांचा हात दिसतो. हे सूक्ष्मजीव आपल्या शरीरावरील बारीक केसांमध्ये अडकून बसतात. रोजच्या रोज आंघोळ केल्याने आपण या सूक्ष्मजीवांना आपल्यापासून दूर करू शकतो.
आपण ज्याप्रमाणे स्वतःच्या स्वच्छतेला महत्त्व देतो त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूचा परिसर देखील आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. आपण एखादा खाऊ खाऊन त्याचे रिकामे झालेले कागद कुठेही इतरत्र न टाकता ते कचराकुंडीतच टाकले पाहिजेत. जर आपण कचरा इतरत्र टाकला तर त्यामुळे दुर्गंधी तर पसरतेच पण त्याच बरोबर रोगराई देखील पसरते.
आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली नागरिक म्हणून जबाबदारी आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपली शाळा, बाग बगीचा, उद्याने, सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक स्वच्छतागृहे , शासकीय इमारती या सर्वांचा समावेश होतो.
आपण मंदिरांमध्ये दर्शनासाठी जातो तेव्हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तसेच मंदिर देखील स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी आहे. मंदिरामध्ये विनाकारण फुलांचा,प्रसादाचा कचरा करता कामा नये. एखादी वस्तू मंदिरामध्ये सोडून जाने हे देखील चुकीचे आहे.
आपले शहर स्वच्छ ठेवणे हे प्रामुख्याने प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपण कितीतरी शहरे पाहतो की जे आपले घोषवाक्य ठेवतात उदाहरणार्थ आपले पुणे स्वच्छ पुणे. पण अशा घोषवाक्य लिहिलेल्या ठिकाणीच लोकांनी गुटखे खाऊन पिचकारी मारलेल्या आपल्याला आढळून येतील.
आपण जेव्हा ही सार्वजनिक ठिकाणी खराब करत असतो तेव्हा आपण याचे भाग बाळगले पाहिजे की ही सार्वजनिक स्वार्थी कारणे स्वच्छ होण्यामागे जो खर्च होत असतो तो आपल्या सामान्य जनतेच्या पैशांमधूनच होत असतो.
आपण जर देश स्वच्छ ठेवला तर रोगराई हटवण्यामध्ये आपण महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. स्वच्छता केल्यामुळे आपल्या देशातील पर्यटन देखील वाढू शकते ज्याचा परिणाम आपल्या देशाच्या आर्थिक सुस्थितीवर होऊ शकतो.
आपण सर्वांनी सामाजिक भान बाळगून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे.
Swachteche Mahtva Nibandh 10 Lines
- स्वच्छतेचे महत्त्व प्रत्येक व्यक्तीने स्वतः अंगीकारले पाहिजे.
- प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या शारीरिक स्वच्छतेला महत्त्व दिले पाहिजे.
- शारीरिक स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास माणूस निरोगी होतो परिणामी समाज निरोगी होतो .
- जेव्हाही आपण अस्वच्छतेला कारणीभूत ठरतो तेव्हा त्याचा परिणाम हा सामाजिक स्वच्छतेवर देखील होतो आणि रोगराईला आमंत्रण मिळते.
- पाण्याची अयोग्य साठवण केल्यामुळे डेंगू सारखे आजार देखील फायदा होतात म्हणूनच पाण्यांच्या टाक्यांची स्वच्छता योग्यपणे करणे गरजेचे आहे.
- वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच प्रत्येकाने आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहिल्याचे भान बाळगले पाहिजे.
- एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सामाजिक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ठिकाणी स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे.
- आपण एखादा खाऊ खाल्ला तर त्याचे पॅकेट हे कचराकुंडीतच टाकले पाहिजे जेणेकरून कचऱ्याचे योग्य नियोजन केले जाईल.
- कचरा जर उघड्यावर पडला तर त्यात अनेक प्रकारचे किडे जन्म घेतात परिणामी रोगराई पसरते.
- स्वच्छतेचे भान बाळगून आपण भावी पिढीसाठी एक स्वच्छ सुंदर परिसर निर्माण केला पाहिजे.
स्वच्छता म्हणजे काय?
आपले शरीर, आपला परिसर हा व्यवस्थित ठेवणे म्हणजे स्वच्छता होय.
शारीरिक स्वच्छता पाळली गेली नाही तर काय होते?
शारीरिक स्वच्छता पाळली गेली नाही तर शरीरातून दुर्गंधी येते तसेच विविध प्रकारचे आजार होतात.
आपला देश स्वच्छ ठेवणे ही कोणाची जबाबदारी आहे?
आपला देश स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.