Pruthviche Manogat Nibandh Marathi: सौर मालिकेतील पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे की जिथे सजीवांना जीवन जगण्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध आहे. आजवर पृथ्वीवर कितीतरी प्रकारचे जीवजंतू जन्मले आणि त्यांचा विनाश देखील झाला मात्र पृथ्वी आजही आपल्या सर्वांचा सांभाळ करत आहे. समजा एखाद्या दिवशी ही पृथ्वी बोलू लागली तर. आजच्या आपल्या निबंधाचा विषय हाच आहे पृथ्वीचे मनोगत. या निबंधामध्ये पृथ्वी जर आपल्याशी बोलू लागली तर ती कोणते विचार प्रकट करेल ते कल्पनेतून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.चला तर मग पाहूया पृथ्वीचे मनोगत या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये आणि दहा ओळींमध्ये निबंध.
Essay On Pruthviche Manogat In Marathi
प्रिय मुलांनो, मी पृथ्वी आज तुमच्याशी बोलत आहे, होय मीच बोलत आहे जिला तुम्ही स्वतःची माता म्हणता. तुमच्यापैकी काही जण मला निळी परी म्हणून देखील संबोधतात. आज मला तुमच्यासोबत खूप काही बोलायचं आहे.”
“सुमारे साडेचार लाख अब्जवर्षांपूर्वी माझी निर्मिती झालेली आहे. माझ्या निर्मिती बद्दल तुम्ही मानवाने लावलेले कयास वैज्ञानिक पण आहेत आणि अध्यात्मिक पण आहेत. वैज्ञानिक दृष्ट्या माझी उत्पत्ती ही अनेक प्रकारचे विस्फोट अवकाशात होऊन त्यामधून धुलीकडे एकत्र येऊन तयार झाली आहे असे मानले जाते तर देवी-देवतांनी माझी निर्मिती केली आहे असे अध्यात्म सांगते.”
“वैज्ञानिक दृष्ट्या जायचे झाले तर माझ्या निर्मिती वेळी अनेक उल्का माझ्यावर पडल्या आणि त्यातूनच येथे लहान मोठ्या बेटांची देखील निर्मिती झाली. सुरुवातीला मी खूपच तप्त असा गोळा होते हळूहळू माझे तापमान कमी होत गेले, माझे कमी झालेले तापमान सजीव प्राण्याच्या जगण्यासाठी अत्यंत पोषक होते.”
“सर्वप्रथम अमीबा सारख्या एकपेशीय जीवांची उत्पती झाली. त्यानंतर अनेक गुंतागुंतीचे जीव उत्पन्न झाले. विविध प्रकारच्या वनस्पती, झाडे, प्राणी माझ्या अंगाखांद्यावर बागडत होते. या सर्व प्राण्यांच्या गरजा देखील अगदी कमी होत्या फक्त अन्न आणि निवारा. या प्राण्यांमुळे मला एक वेगळाच बहर आला होता.”
“मला कायमच वातावरणीय बदलांना सामोरे जावे लागले आहे, जेव्हा सर्व प्राणीमात्र माझ्या सोबत आनंदाने राहत होते अशाच वेळी अचानक काही वातावरणीय बदलांमुळे माझ्या सोबत आनंदाने जगणारे काही प्राणी नष्ट झाले कारण माझे वातावरण त्यांच्या वाढीसाठी अथवा जगण्यासाठी साजेसे राहिले नाही परिणाम हे प्राणी कायमचे नामशेष झाले “.
तुम्ही डायनासोर चे नाव ऐकून असाल, पृथ्वी वरून नामशेष झालेल्या प्राण्यांपैकी ती देखील एक प्रजाती होती.”
“पुढे या धक्क्यातून मी सावरले, माझ्या इथे वातावरण पुन्हा पूर्वीसारखे होऊ लागले, पुढे अजून विविध प्रकारचे प्राणी, पक्षी माझ्या इथे निर्माण झाले. पुढे आदिमानवाची निर्मिती झाली, तो देखील माझ्या संसाधनांचा वापर करून स्वतःच्या जगण्याचे बळ मिळवत होता. मानवाने स्वतःच्या बुद्धीचा वापर करून आजच्या माणसाची निर्मिती झाली.”
“माणसाने चाकाचा शोध लावला, अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टी मनुष्यप्राणी माझ्यामध्ये उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून मिळवू लागला. मनुष्याने हळू हळू प्रगती पथावर वाटचाल सुरू केली.”
“माझ्या मुलाची म्हणजेच मनुष्याची ही प्रगती पाहून मी देखील अत्यंत खुश होते. मनुष्याने निरनिराळे शोध लावत स्वतःचे जगणे सुसह्य केले. जे माझ्या इतर मुलांना जमले नाही ते सर्व माणसाने मिळवले.”मनुष्य स्वतःच्या सोबत माझ्या इतर निर्मितीची देखील काळजी घेत होता. पशु पक्ष्यांना दाणा पाणी यांची सोय तो करून देत होता.
माझे सर्वात हुशार मुल मनुष्य प्राणी माझ्या इतर मुलांना सांभाळून घेईल या भ्रमात मी होते पण आता माझ्या या भ्रमाचा भोपळा पूर्णपणे फुटला आहे. मनुष्याने स्वतःची स्वार्थी वृत्ती वापरून माझ्या इतर प्रिय मुलांना स्वतःचे चाकर करून घेतले. मनुष्य सर्व गोष्टी पैशांवर मोजू लागला.
इतर प्राण्यांना आपले गुलाम करून आपल्या मनाप्रमाणे त्यांचा वापर करून घेऊ लागला.” “मनुष्याने स्वतःच्या स्वार्थासाठी मला देखील सोडले नाही, माझ्या पोटामधील खनिजे, अनमोल रत्ने मिळवण्यासाठी माणसाने मला देखील भगदाड पाडले आणि पैसा मिळवला. मनुष्याने केलेल्या या कृत्यांमुळे माझे शरीर हे खूपच विद्रुप झाले आहे तसेच माझ्यावर जगणाऱ्या इतर प्राण्यांचे उपजिविकेचे साधन देखील नष्ट झाले आहे.
मनुष्याने हवमधे उत्सर्जित केलेल्या विविध वायूंमुळे हवेत विषारी वायूंचे प्रमाण वाढून जागतिक तापमानवाढीचे भयानक मोठे संकट आज उभे राहिले आहे. माझी सर्व मनुष्यजातीला कळकळून विनंती आहे की माणसाने वेळीच सावध होऊन आपण केलेल्या चुकांची दुरुस्ती करावी आणि इतर प्राणी मात्रांच्या नैसर्गिक ठिकाणाला हात घालू नये, सर्व प्राणिमात्रांबरोबर एकोप्याने राहण्यात सर्वांचे हित दडलेले आहे.”
पृथ्वी मनोगत निबंध १० ओळी मराठी
- मुलांनो आज मला तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे हो मीच बोलत आहे तुम्ही ज्या ठिकाणी राहता ती तुमची पृथ्वी.
- मुलांनो माझी निर्मिती कशी झाली हे तुम्हाला माहीत असेल आधी मी एक तप्त गोळा होते ज्याचा विस्फोट होऊन त्यातूनच माझी निर्मिती झाली.
- आजवर माझ्यावर अनेक प्रकारचे नैसर्गिक आघात झाले मात्र त्यातून तावून सुलाखून आजची तुमची पृथ्वी तुमच्यासमोर उभी आहे.
- सर्वात आधी माझावर एकपेशीय जीवांची निर्मिती झाली आणि मग पुढे गुंतागुंतीचे सजीव निर्माण झाले.
- डायनासोर देखील इथे उत्पन्न झाले मात्र काही नैसर्गिक आपत्तींमुळे ते नष्ट झाले.
- मनुष्यप्राणी हा माझा अत्यंत लाडका होता मात्र आज माझावर जे आघात होत आहेत त्याला मनुष्यच कारणीभूत आहे.
- मनुष्याने सुंदर वस्तूंची निर्मिती केली मात्र काहींनी विध्वंसक गोष्टींची देखील निर्मिती केली जसे की बॉम्ब, हत्यारे.
- माझ्या इथे पेट्रोल, डिझेल, सोने, खनिजे मिळवण्यासाठी खाणी खणल्या गेल्या त्यामुळे माझे अत्यंत नुकसान झाले.
- माझ्यावर जगणाऱ्या अनेक प्राणीमात्रांना स्वतःच्या निवाऱ्यास मुकावे लागले.
- माझी मनुष्याला अत्यंत कळकळीची विनंती आहे की त्याने इतर प्राणी मात्राना हानी पोहोचवू नये.
नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या निबंध मालिकेमध्ये पृथ्वीचे मनोगत या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये आणि दहा ओळींमध्ये निबंध सादर केला आहे. आपणास हा निबंध कसा वाटला हे आम्हाला अभिप्राय देऊन नक्की कळवा. आपला अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद.