Pradushan Ek Samasya Nibandh In Marathi: निसर्गामध्ये मानव प्राण्याने अनेक उत्तम गोष्टी निर्माण केल्या आहेत, मात्र असे देखील आढळून येते की या गोष्टी निर्माण करताना जर योग्य भान बाळगले गेले नाही तर त्यातून अनेक समस्या देखील निर्माण होतात. या गोष्टीला अगदी चपखल शोभणारे एक उदाहरण म्हणजे प्लास्टिक.
माणसाने प्लास्टिक ची निर्मिती केली. प्लास्टिक हा एक असा घटक आहे जो पृथ्वीवर वर्षानुवर्षे टिकून राहतो. प्लास्टिक चा वापर अती प्रमाणात झाल्या कारणाने जगात प्लास्टिक कचऱ्याची ची मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आढळून येते. प्लास्टिक हे अविघटनशील असल्याकारणाने ते कित्येक वर्षे पृथ्वीवर जमा होत चालले आहे.
प्लास्टिक ला पूर्णपणे नष्ट करता येणे शक्य नाही कारण जर प्लास्टिक जाळले तर त्यातून देखील मोठ्या प्रमाणात विषारी वायू हवेत पसरून लोकांच्या जीवाला हानी पोहोचू शकते. अशा प्रकारे प्लास्टिक नावाचा हा भस्मासुर आपल्यासाठी एक फार मोठी समस्या आहे.
माणसाने उद्योग धंदे स्थापन केले, मात्र त्यासाठी अनेक सुपीक जमिनी वापरण्यात आल्या. उद्योग व्यवसायात जे वायू बाहेर टाकले जातात त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते वायू तसेच उत्सर्जित करण्यात आले परिणामी हवेतील विषारी वायूंचे प्रमाण वाढून लोकांना विविध प्रकारचे आजार जडत आहेत.
लोकांना हवा प्रदूषणामुळे श्वसनसंस्थेचे विकार जडले. अनेक व्यक्तींना ॲलर्जी, दमा हे आजार झाले. देशांतर्गत चढाओढीमध्ये अनेक देश इतक्या खालच्या पातळीवर उतरले की त्यांनी देशातील निष्पाप नागरिकांवर देखील हवेतून पसरणाऱ्या जंतूचा भडिमार करून रोगराई निर्माण केली.
पूर्वी मोठ्या प्रमाणात झाडे होती. लोकांनी मोठ्या इमारती बांधल्या आणि मृदेची मोठ्या प्रमाणात धूप झाली त्यामुळे त्यांचा परिणाम हा पर्जन्यक्रियेवर झाला. अनेक देशांनी अणुबॉम्ब ची निर्मिती करण्यासाठी वेळ खर्ची घातला मात्र त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आण्विक कचरा निर्मिती झाली ज्यावर आज ही संशोधकांना उत्तर सापडले नाही.
घनकचरा व्यवस्थापन करताना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो कारण आज ही देशाचे सुजाण नागरिक ओला आणि सुका कचरा एकाच कचरापेटीत टाकत आहे त्यामुळे कंपोस्ट निर्मिती सारख्या गोष्टी या केवळ हवेतच राहत आहेत.
गणेशोत्सव साजरा करत असताना शाडूच्या मातीच्या मूर्तींना पसंती देण्याऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तींना मागणी दिसते, परिणामी या मूर्तीचे पाण्यामध्ये योग्य प्रकारे विघटन होत नाही आणि देवी देवतांचा अपमान होतोच त्याचप्रमाणे पाणी प्रदूषण देखील होते.
काही खाजगी कंपन्या आपल्या इथले सांडपाणी हे सरळ पाण्याचा स्रोत असलेल्या नद्या, ओढे यांमध्ये सोडतात, परिणामी लोकांना विविध प्रकारचे त्वचा विकार होतात. गॅस्ट्रोची, काविळीची लागण या अशुध्द पाण्यामुळे होते परिणामी मृत्यू देखील ओढवतो.सांडपाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा पाणी प्रदूषित होते.
मनुष्यप्राणी जेव्हा उत्सव साजरा करतो तेव्हा त्याने या गोष्टीचा त्रास इतरांना होत नाही ना हे पाहणे गरजेचे आहे. गणेशोत्सवामध्ये मोठमोठ्या आवाजात डॉल्बी वाजवल्यामुळे लहान मुले आणि वयस्कर लोकांना खूप त्रास होतो हे ध्वनी प्रदूषण देखील माणसाने रोखले पाहिजे. ध्वनी प्रदूषणामुळे लोकांना कायमचे बहिरत्व येऊ शकते.
हवेमध्ये उत्सर्जित विविध प्रकारच्या वायूमुळे जागतिक तापमान वाढीचा धोका देखील आहे. म्हणूनच माणसाने समाजात वावरताना निसर्गा विषयी असलेली आपली जबाबदारी ध्यानात घेऊन वागले पाहिजे.
प्रदूषण एक समस्या मराठी निबंध १० ओळी
- प्रदूषण हे प्रामुख्याने मानवनिर्मित आहे. मनुष्याने समाजात वावरताना आपल्या कर्तव्याचे भान बाळगून निसर्गा विषयी असलेल्या आपल्या जबाबदारींचे पालन केले पाहिजे.
- हवा प्रदूषण हे प्रामुख्याने हवेमध्ये उत्सर्जित विषारी वायूमुळे होते आणि त्यात प्रामुख्याने श्वसन संस्थेचे विकार जडले जातात.
- सण उत्सवांमध्ये मोठमोठे आवाजात डॉल्बी वाजवल्यामुळे ध्वनी प्रदूषण होते.
- ध्वनी प्रदूषणाचा त्रास हा लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींना होतो यामध्ये कायमचे बहिरत्व देखील होऊ शकते.
- मनुष्याने निर्माण केलेल्या उद्योगधंद्यांमधून उत्सर्जित सांडपाण्यामुळे जलप्रदूषण होते.
- जलप्रदूषणामुळे पाण्याचे महत्व असे स्त्रोत असलेले नदी ओढून आले हे प्रदूषित होतात परिणामी गॅस्ट्रो कावीळ यांची साथ येते.
- आपल्या घराचा मावणारा रोजचा कचरा हा ओला व सुका या पद्धतीने वेगळा करण्यात आला पाहिजे अन्यथा घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नाही.
- घनकचरा व्यवस्थापन नीट झाले नाही तर रोगराई पसरते.
- मानवाने निर्मिलेला प्लास्टिक हा तर प्रदूषणाचा भस्मासुर म्हणता येईल.
- पेट्रोल व डिझेल या इंधनांच्या ज्वलनानंतर हवेत पडणाऱ्या कार्बन मोनोऑक्साइड या वायूमुळे देखील भरपूर प्रमाणात प्रदूषण होते.
प्रदूषण म्हणजे काय?.
पर्यावरणात हानिकारक घटक मिसळल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतो, यालाच प्रदूषण असे म्हणतात
प्लास्टिकला प्रदूषणाचे मुख्य कारण का मानले जाते?
प्लास्टिक विघटनास खूप वर्षे लागतात, ते माती, पाणी व हवा यांना प्रदूषित करते आणि सजीवांसाठी घातक ठरते.
प्लास्टिक प्रदूषणामुळे निसर्गावर काय परिणाम होतो?
मातीची सुपीकता कमी होते, पाण्याचे स्रोत दूषित होतात आणि प्राणी-पक्ष्यांचा जीव धोक्यात येतो.