My Favourite Season Hivala Nibandh In Marathi: भारतात प्रामुख्याने तीन ऋतू आढळतात. पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा. कोजागिरी पौर्णिमेनंतर हिवाळ्याची चाहूल लागते सर्वत्र थंडीची हुडहुडी भरते. मला हा हिवाळा ऋतू फार आवडतो. आज आपण आपल्या निबंध मालिकेमध्ये हिवाळा या ऋतूवर आधारित 100 ते 500 शब्दांमध्ये तसेच दहा ओळींमध्ये निबंध सादर केला आहे. चला तर मग पाहूयात हिवाळा या ऋतू वर आधारित मराठी भाषेत निबंध.
My Favourite Season Winter Essay In Marathi
हिवाळा हा ऋतू म्हटला की सर्वप्रथम कानावर पडणारा शब्द म्हणजे थंडी. जितका जोरदार पाऊस झाला असेल तितका जोरदार हिवाळा होत असतो. ज्या भागांमध्ये वर्षभर उष्णता आढळते अशा भागांमध्ये देखील कधी कधी थंडीचा पारा हा दहा अंशाच्या खाली आलेला आढळतो. थंडी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आठवते ते म्हणजे स्वेटर.
हिवाळा ऋतू मध्ये कोणालाही लवकर उठायला आवडत नाही कारण या ऋतूमध्ये लागणारी साखर झोप प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. हिवाळ्यामध्ये अगदी गाढ झोप लागते त्यामुळे सकाळी उठताना आणि तेही इतक्या थंडीत अगदी नकोसे होते. जिथे मोठी माणसे कार्यालयात काम करत असतात त्यांना उठून ऑफिसला जाणे नकोसे होते तिथे बिचारी लहान मुले उबदार गुलाबी थंडीमध्ये कशीबशी उठून शाळेला जाताना दिसून येतात.
मुलांना तर कान टोपी, स्वेटर, सॉक्स आणि शूज घालून शाळेत जाताना पाहिले की छोटे ससे जणू शाळेमध्ये जात आहेत असे भासते.मोठ्या माणसांना देखील आपापली नित्याची कामे आवरताना अगदी नकोसे होते. थंडीमध्ये आपली आई लवकर उठून सर्वांचा डबा कसा तयार करत असेल हा प्रश्न मला नेहमी पडतो.
आपल्या आईला थंडी वाजत नसेल का असा विचार मनात येतो. एवढी थंडी असतानाही ती आपल्यासाठी उठून जेवण तयार करते यावरूनच आपल्या आईचे मुलांवर किती प्रेम असते किंवा ती किती कर्तव्यदक्ष असते हे समजून येते.कोजागिरी पौर्णिमेनंतर थंडीची सुरुवात होते. इंग्रजी महिन्यांप्रमाणे नोव्हेंबर, डिसेंबर ,जानेवारी आणि फेब्रुवारी हे थंडीचे महिने म्हणून गणले जातात. डिसेंबर ची गुलाबी थंडी तर सर्वांनाच हवी अशी वाटते.
मराठी महिन्यांनुसार मार्गदिवाळीचा सणही ऐन थंडीमध्येच असतो. थंडीमध्ये लवकर उठून अभ्यंगस्नान करणे म्हणजे मोठी पर्वणीच असते. अगदी कडक पाणी डोक्यावर घेऊन घरातली वडीलधारी आपल्याला आंघोळ घालतात. हिवाळ्यामध्ये दिवाळीचा सण साजरा करण्यात एक वेगळीच मजा असते.हिवाळ्यामध्ये घरातील सर्वजण मस्त शेकोटी पेटवून त्या भोवती बसतात आणि गाणी गुणगुणतात.
हिवाळ्यामध्येच प्रामुख्याने सहलींचे आयोजन केले जाते. हिवाळा हा ऋतू फिरण्यासाठी अतिशय उत्तम ऋतू आहे. अनेक शाळांच्या सहली देखील हिवाळ्यामध्येच काढल्या जातात.हिवाळा ऋतू मध्ये मफलर, स्वेटर या उबदार वस्तूंना भरपूर मागणी असते आणि बाजारात देखील सगळीकडे याच वस्तू विक्रीला ठेवलेल्या दिसतात.
हिवाळ्यामध्ये देखील आहार हा अतिशय गरम गरमच केला जातो. जेव्हा आपण गरम गरम चहा पितो तेव्हा खूपच छान वाटते.गरम तळलेल्या भजी खाण्यात मजाच वेगळी येत असते. आम्ही हिवाळ्यामध्ये व्यायाम करायला चालू करतो कारण हिवाळा ऋतू हा माणसाच्या तब्येतीसाठी एकदम चांगला ऋतू आहे असे मानले जाते.
हिवाळ्यामध्ये सकाळी सकाळी सर्वत्र धुके पसरलेले दिसते. पाण्याचे दवबिंदू पानावर दिसतात आणि जणू काही मोतीच पृथ्वीवर अवतरले आहेत असे भासते. निसर्ग एकदम अल्हाददायक होतो. हिवाळ्यामध्ये पानांची पडझड चालू होते.हिवाळा या ऋतूमध्ये बाहेर खूप थंडी असल्याकारणाने माणसाला उष्णतेची गरज भासत असते त्यामुळे माणसाचे शरीर आपोआपच आपले तापमान वाढवत असते परिणामी आपली भूक वाढते.
हिवाळ्यात भरपूर सारे चमचमीत पदार्थ करून खाल्ले जातात.एकंदरीत हिवाळा हा ऋतू सर्वांसाठीच खूप सारा आनंद घेऊन येतो आणि सर्वांनाच हिवाळा ऋतू फार आवडतो.
हिवाळा ऋतू वर दहा ओळी निबंध मराठी
- ग्रेगरियन कॅलेंडरप्रमाणे नोव्हेंबर, डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या कालावधीत हिवाळा ऋतू असतो.
- हिवाळा हा माझा अत्यंत आवडीचा ऋतू आहे कारण या ऋतू मध्ये उन्हाळ्याची गर्मी नसते शिवाय चिकचिक करणारा पाऊस देखील नसतो.
- हिवाळा हा ऋतू बाहेर फिरायला जाण्यासाठी अत्यंत योग्य काळ असतो.
- हिवाळा या ऋतूमध्ये सर्वत्र थंडी पसरते परिणामी माणसे अगदी सकाळी देखील गाढ झोपेत असलेली आढळून येतात.
- हिवाळ्यातील गुलाबी थंडी प्रत्येकाला हवीहवीशी वाटते आणि अंथरुणातून बाहेर येऊ वाटत नाही.
- हिवाळ्यामध्ये आपल्याला आजूबाजूला मफलर, स्वेटर ,सॉक्स विकणारे व्यावसायिक सर्वत्र आढळून येतात.
- हिवाळ्यामध्ये सगळीकडे पहाटे धुके जमलेले दिसते आणि त्यामधून चालत जायला तर फार छान वाटते.
- हिवाळ्यात उदारग्नी हा जास्त प्रज्वलित होत असल्या कारणाने आपल्याला जास्त भूक लागते.
- दिवाळी, नाताळ हे सण देखील हिवाळ्यामध्ये साजरे केले जातात.
- हिवाळ्यामध्ये बाहेर कितीही थंडी असली तरी आम्हाला रोज शाळेत जावे लागते याचे फार वाईट वाटते.
मित्रांनो आज आपण माझा आवडता ऋतू हिवाळा या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये आणि दहा ओळींमध्ये निबंध सादर केला आहे. आपणास हा निबंध कसा वाटला हे आम्हाला अभिप्राय देऊन नक्की कळवा. आपला अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद.