My Favourite Animal Cat Nibandh In Marathi: मांजर हा प्राणी मार्जारकुळातील एक प्राणी आहे. मांजर हा केसाळ प्राणी आहे. माणसासोबत वास्तव्य करायला मांजर शिकले आहे म्हणूनच मांजर हे आपल्या घरातील एक प्रमुख पाळीव प्राणी झाले आहे. मांजर ही मादा वर्गात मोडते तर तिच्या नरा ला बोका असे म्हणतात.
वर्षानुवर्षे माणूस आपल्या घरात हा गोंडस प्राणी पाळत आहे. पूर्वी माणूस शेतांमध्ये घर बांधून राहत तसेच घरांमध्ये धान्याचा मोठा साठा करत. धान्याचा मोठा साठा असल्याकारणाने घरांमध्ये उंदरांचा उपद्रव होत होता त्यावर इलाज म्हणून लोकांनी घरात मांजर पाळायला सुरुवात केली.
मांजर आणि उंदराचे वैर सर्वांना माहीत असेलच. मांजर ही उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात मदत करते आणि म्हणूनच तिला देखील माणसांची मित्र म्हणायला हरकत नाही. मांजर हा प्राणी तसा भरपूर चलाख देखील आहे. घरातील दूध चोरून पिणे हे देखील मांजराचे एक लक्षण आहे.मांजर डोळे मिटून दूध पिते हे सर्वांना माहीत असेलच.
मांजराला वाटते की डोळे बंद करून दूध प्यायल्याने त्याला कोणी पाहत नाही मात्र प्रत्यक्षात संपूर्ण जग त्याला या अवस्थेत पाहत असते. एखादा व्यक्ती खोटेपणाने वागला तर त्याला मांजराचे हे उदाहरण दिले जाते.माझ्या घरी देखील आम्ही मांजर पाळले आहे.
माझ्या मांजराचे नाव मनी आहे. मनीचा रंग हा पांढरा शुभ्र आहे. माझी मांजर ही अगदी केसाळ आहे. ती एखाद्या सशासारखी गुबगुबीत आहे. माझी मांजर आमच्या घरात सर्वांची लाडकी आहे.जेव्हा माझ्या मांजरीला काही खायला हवे असते तेव्हा ती माझ्या आईच्या पायाजवळ घुटमळत असते. मांजरीचा आवडता खाऊ म्हणजे दूध आणि दुसरे आवडते खाद्य म्हणजे मासे.
जेव्हा घरात माशांचे कालवण बनते तेव्हा माझ्या मांजरीसाठी वेगळे ताट तयार केले जाते. तिच्या माशांच्या खाण्यामध्ये आपण लुडबुड केली तर ती आपल्यावर गुरूगुरते. अशी ही आमची मांजर घरात सर्वांना प्रिय आहे.मांजराचा एक गुणधर्म सांगायचा झाला तर तो म्हणजे मांजर हे स्वतःच्या दुनियेत जगणारा प्राणी आहे.
तुम्ही मांजर शांत बसले असताना जर त्याची खोडी काढली तर ते तुम्हाला नखे मारल्याशिवाय शांत बसत नाही.मांजर हा प्राणी अत्यंत हुशार आहे तसेच तो एकाच मालकाविषयी प्रामाणिक नसतो. जिथे खायला मिळते त्या घरची मांजर होते असे म्हटले जाते.मांजराचे डोळे हे अंधारात देखील फार दूरचे पाहू शकतात.
मांजर आडवे जाणे याला अशुभ म्हटले जाते मात्र असे काही नाही ही केवळ अंधश्रद्धा आहे. मांजर आडवे जाणे आणि कामात अडथळा येणे यांचा एकमेकांशी दुरान्वये संबंध नाही.मांजरामध्ये देखील आता विविध प्रजाती आढळून येतात. आजच्या काळात पर्शियन मांजरी मोठ्या प्रमाणात उच्चभ्रू लोकं घरी पाळतात. या मांजरीच्या अंगावर मोठ्या प्रमाणात केस असतात.
आपण जर एखाद्या व्यक्तीच्या पुढे जास्त बोलू शकत नसलो तर त्याला देखील ताटाखालचे मांजर होणे असे म्हणतात.मांजराला वाघाची मावशी असे देखील म्हणतात. ज्याप्रमाणे वाघासमोर कुणाचे काही चालत नाही तो गुण वाघाची मावशी असलेल्या मांजरींमध्ये देखील भरभरून आढळतो.
मांजर हा अत्यंत गोंडस प्राणी आहे मात्र तो तेवढाच धूर्त देखील आहे. मांजराला आपलं स्वार्थ बरोबर साधून घेता येतो. आजवर मांजर हे एक स्वार्थीपणाचे लक्षण असलेला प्राणी म्हणून देखील गणला जातो. आपल्याला जे हवे ते मिळवण्यासाठी मांजर म्याँव म्याँव असा आवाज काढते.
My Favourite Animal Cat Essay In Marathi 10 Line
- मांजर हा आपल्या घरात आढळणारा सर्वांचा लाडका प्राणी आहे.
- मांजर हा प्राणी वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळतो जसे की काळा, पांढरा, तांबूस रंग.
- मांजर हा प्राणी म्याँव म्याँव असा आवाज काढून स्वतःला काही हवे असेल त्याकडे सूचित करतो.
- मांजराला दूध प्यायला अतिशय आवडते.
- घरी उंदरांचा उपद्रव टाळण्यासाठी मांजर पाळली जाते.
- मांजराला मासे खायला फार आवडतात.
- मांजर या प्राण्याला वाघाची मावशी म्हणून देखील ओळखले जाते.
- एखादी नैसर्गिक आपत्ती येणार असेल तर मांजर विचित्र आवाजात ओरडते.
- भारतात मांजर आडवी जाणे अशुभ मानले जाते tr जपानमध्ये मांजर हा प्राणी शुभ मानला जातो.
- मांजर हा प्राणी अत्यंत हुशार आहे आपले पोट जिथे भरते तिथे जाऊन ते भरणे यातच मांजर आपले शहाणपण मानते.
मांजर हा तुमचा आवडता प्राणी का आहे?
मांजर हा शांत, चपळ व स्वच्छता प्रिय प्राणी आहे. त्याचे गोड रूप व खेळकर स्वभाव मला खूप आवडतो.
मांजराच्या कोणत्या सवयी विशेष आवडतात?
मांजर स्वतःची स्वच्छता स्वतः राखते, हलकेच चालते आणि घरात उंदीर पकडून उपयोगी ठरते
मांजराची माणसाच्या जीवनात काय भूमिका आहे?
मांजर माणसाचा चांगला साथीदार असून घरात आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण करते.