Digital India Speech In Marathi: डिजिटल भारत भाषण मराठी

Digital India Bhashan Marathi: मित्रांनो भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून ते आज 21 व्या शतकापर्यंत भारताने अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेली आहे. भारत हा एक असा देश आहे जो संस्कृतीच्या मुलांना धरून आहेच पण त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाची कास देखील त्याने धरलेले आहे. आज आपण आपल्या भाषण मालिकेमध्ये या डिजिटल भारताविषयी जाणून घेऊयात.

डिजिटल भारत मराठी भाषण

मित्रांनो भारत हा असा देश आहे की जिथे संस्कृती आणि तंत्रज्ञान एकमेकांच्या हातात हात घालून नांदत आहेत. आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती कारण फाळणीमुळे काही आर्थिक गोष्टीं बाबतीत भारत हा थोडा मागे होता.

देशाचे नेतृत्व करणाऱ्या राजकीय शक्तींनी देशाला या कठीण काळात देखील उत्तमरीत्या चालवले आणि आज आपल्यासमोर एक विकसनशील भारत देश उभा आहे. भारतामध्ये पूर्वी माहितीची देवाणघेवाण ही सर्वप्रथम वृत्तपत्राद्वारे होत होती.

हळूहळू औद्योगिक क्रांतीने भारतात देखील पाय रोवले आणि दूरचित्रवाणी सर्वांच्या दृष्टिक्षेपात आली. आज डिजिटल युगामध्ये भारत भरपूर पुढे आला आहे. आता भारतामध्ये अनेक गोष्टींमध्ये डिजिटल क्रांती झाली आहे. भारतामध्ये आघाडीच्या अनेक दूरसंचार संस्था काम करतात.

रिलायन्स, एअरटेल, आयडिया आणि वोडाफोन या दूरसंचार संस्थांनी भारतामध्ये नेटवर्कचे बलाढ्य असे जाळे विणले आहे.भारतामध्ये आजच्या घडीला सर्वत्र शासकीय कामकाजामध्ये डिजिटल क्रांती झालेली दिसून येते. पुर्वी भारतीय शासकीय कार्यालयांमध्ये फॉर्म भरणे आणि शासकीय योजनाचा फायदा घेणे तसेच शासकीय कामे पूर्ण करणे ही अत्यंत वेळखाऊ होती. लोकांना रांगेत तासन् तास उभे रहावे लागत असे. तसेच काही लोकांचे नंबर येत तोपर्यंत शासकीय कामाची वेळ देखील संपून जात असे त्यामुळे जनतेला खूप मानसिक आणि शारीरिक त्रास सोसावा लागत असे.

2015 साली त्याकाळातील भारतीय सरकारने डिजिटल भारत ही संज्ञा सर्वप्रथम वापरली. भारतातील बहुतांशी कामे ही पूर्वी कागदी फायलींमध्ये टाळेबंद होती. डिजिटल क्रांती मुळे ही सर्व कागदे आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवली गेली. लोकांना ताटकळत आपला नंबर येण्याची वाट शासकीय कार्यालयात पहावी लागत असे मात्र आता एका क्लिकवर लोकांची कामे अगदी घरबसल्या देखील होतात.

डिजिटल भारत या संकल्पनेमध्ये व्यक्तीची ओळख, नागरिकत्वाचा पुरावा, मोबाईल क्रमांक याद्वारे माहिती एकत्र केली जाते. वन टाइम पासवर्ड ज्याला वेळेचे बंधन दिले जाते तसेच दोन टप्प्यांमध्ये खात्री केली जाते की ज्याच्याबद्दल माहिती द्यायची आहे त्याच व्यक्तीला ती पोहोचते की नाही . या कामामुळे माहितीचे संरक्षण होते.

काही ठिकाणी चालाख सायबर गुन्हेगार माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी सरकारचे सायबर गुन्हे नियंत्रण विभागाचे कर्मचारी अशा गुन्हेगारांचा शोध लावतात.आज आपण कोठेही काही खरेदी करायला गेलो तर आपल्याला एक किंवा आर कोड मिळतो.

सगळीकडे फिरत असताना आपल्याला रोग पैसे खिशात ठेवण्याची गरज नाही. आज अगदी एखाद्या भाजीवाल्यापासून ते मोठ्या दुकानदारांपर्यंत सर्वांकडेच स्वतःचे असे यूपीआय द्वारा संरक्षित केलेले क्यू आर कोड असतात. आपण आपल्या मोबाईलद्वारे आपल्या बँक खात्यातून सरळ विक्रेत्याच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवू शकतो.भारत डिजिटल झाला असला तरी काही समस्या आजही आपल्या समोर आहेत.

भारतामध्ये असणारी शहरे आणि खेडी यांमध्ये आजही डिजिटलायझेशन मध्ये तफावत पाहायला मिळते. जे शहरी भाग आहेत तिथे उद्योगधंदे मोठे असल्याकारणाने तसेच लोकांचा ओढा जास्त असल्याकारणाने नेटवर्कची सुविधा ही अधिक जलद आहे याउलट खेड्याकडे अथवा गावांमध्ये नेटवर्कची सुविधा अत्यंत धीम्या गतीची आहे.

जोवर गाव आणि शहरे यांना समान संधी दिल्या जाणार नाहीत तोवर भारत पूर्णपणे डिजिटल झाला असे म्हणता येणार नाही.भारतामध्ये आज यूपीआय, आरोग्य सेवा आणि ई शासन या काही डिजिटल क्रांतीचा भाग असलेल्या साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

इ शासन च्या माध्यमातून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवला जातो. लोकांच्या समस्या लोक इथे सांगू शकतात. समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांचा पाठपुरावाही घेऊ शकतात.डिजिटल भारत हा भारतासाठी उत्क्रांतीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. काही अपवाद वगळले तर आपण एका नवीन डिजिटल युगाकडे वाटचाल करत आहोत.

10 ओळींमध्ये Digital India या विषयावर भाषण मराठी

  1. नमस्कार मित्रांनो आज आपण डिजिटल भारत या विषयावर भाषण ऐकण्यासाठी जमा झालेलं आहोत, डिजिटल भारत ही संकल्पना भारतामध्ये सर्वप्रथम एक जुलै 2015 रोजी आणली.
  2. डिजिटल भारत च्या माध्यमातून भारताला नवीन तंत्रज्ञानात सोबत घेऊन जाण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
  3. डिजिटल भारत च्या माध्यमातून इंटरनेटची सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मानस होता.
  4. शहरी भागामध्ये डिजिटलायझेशन हे ग्रामीण भागाच्या मानाने जलद गतीने झालेले आहे.
  5. आज यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार केले जात असल्यामुळे हे व्यवहार सुरक्षित होत आहेत.
  6. इ शासन च्या माध्यमातून शासनाच्या वेगवेगळ्या सवलती आणि योजनांची माहिती नागरिकांना अगदी घरबसल्या मिळते.
  7. शासकीय कार्यालय देखील डिजिटल झाल्यामुळे आता लोकांना ताटकळत रांगेत उभे राहावे लागत नाही.
  8. आरोग्य सेवा देखील डिजिटल झालेल्या आहेत त्यामुळे रुग्णांना लवकर अथवा वेळेवर उपचार मिळण्यास मदत होते.
  9. काही सायबर गुन्हेगार मात्र या डिजिटल क्रांती मध्ये अडथळे निर्माण करून स्वतःचा फायदा उचलायला बघतात अशांसाठी स्वतंत्रपणे सायबर गुन्हे विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
  10. भारत हा वेगाने डिजिटल क्रांती घडवत आहे आणि नवीन काळामध्ये सर्व जगासमोर एक डिजिटल देश म्हणून उभा राहत आहे.

मित्रांनो आज आपण डिजिटल भारत या विषयावर भाषण सादर केले आहे. आपणास या भाषण मालिकेतील डिजिटल भारत हे भाषण कसे वाटले ते आम्हाला अभिप्राय देऊन नक्की कळवा. आपला अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद.

Leave a Comment