Social Media Cha Prabhav Marathi Speech: मित्रांनो सोशल मीडिया म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर यूट्यूब, इंस्टाग्राम, टिक टॉक, फेसबुक ही संवाद माध्यमे आली असतील. आज आपल्याला असा व्यक्ती शोधून सापडणार नाही ज्याला फेसबुक किंवा इंस्टाग्राम माहित नाही. आज बहुतांश लोक आपल्याला विविध प्रकारचे रील बनवताना आढळून येतील.
ज्या व्यक्तीच्या हातात मोबाईल आहे तो इंस्टाग्राम वरील रील तसेच यू ट्यूब वरील शॉर्ट्स अगदी एकाग्र होऊन बघत असतो हे आपल्याला माहिती आहेच. आपण सर्वही यातून व काही वेगळे नाही.सोशल मीडिया आज आपल्या सर्वांच्या जीवनाचे एक अविभाज्य अंग झाला आहे.
आज जेवण काय बनवायचे हे युट्युब वर शिकण्यापासून, कोणत्या पद्धतीचे कपडे कोणत्या ठिकाणी घातले गेले पाहिजेत याचे ज्ञान देखील आपल्याला आज सोशल मीडियावर मिळते. अनेक भाषा आत्मसात करण्यासाठी आता आपल्याला एखाद्या क्लासमध्ये जाण्याची गरज नाही तर ऑनलाईन घरबसल्या आपण अनेक भाषा शिकू शकतो.
एखादी कला शिकण्यासाठी देखील आता आपल्याला यु ट्युब हा शिक्षक मिळाला आहे. युट्युब वर सर्च मारल्यानंतर आपल्याला जे हवे ते माईकवर बोलले तरी सोशल मीडिया आपल्याला हवे असलेले ज्ञान असलेल्या हजारो साइट्स आपल्यासमोर उभे करते.
पूर्वी विद्यार्थ्यांना जो शिक्षक शिकवत असे भले तो आपल्याला आवडो अथवा न आवडो त्याच्याकडून शिक्षण घेणे भाग होते मात्र आजच्या काळामध्ये विद्यार्थ्याला आपला शिक्षक निवडण्याचा अधिकार देखील सोशल मीडियामुळे मिळाला आहे.पूर्वी अभ्यास आणि शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित होते मात्र आजच्या काळामध्ये तुम्हाला तंत्रज्ञानाचे किती ज्ञान आहे यावर तुमची हुशारी ठरली जाते.
आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण नवनवीन तंत्रज्ञान शिकू शकतो तसेच हे तंत्रज्ञान वापरून आपले जीवन कसे सुखकर करता येते हे देखील शिकू शकतो.सोशल मीडियामुळे आपल्याला बाहेर घडणाऱ्या घटना चुटकीसरशी कळतात. पूर्वीप्रमाणे एखादी बातमी वाचण्यासाठी वृत्तपत्र हातात येण्याची वाट पहावी लागत नाही तर सोशल मीडियामुळे आपण मोबाईलवर च बातम्या देखील वाचू शकतो.
सोशल मीडियामुळे आज काल प्रत्येक जणच स्वतःला एक सेलिब्रेटी समजू लागला आहे असे म्हणायला हरकत नाही.सोशल मीडियाच्या वापरामुळे आपल्याला अनेक नवीन नवीन गोष्टी समजतात. माहितीची देवाणघेवाण होते तसेच विचारांची देखील देवाणघेवाण होते.जसे हे सोशल मीडियाचे फायदे आहेत ते वापरकर्त्यावर अवलंबून आहेत. मात्र कधी कधी सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे अनेक लोकांना त्याचा त्रास होतो. तो कसा? ते आपण जाणून घेऊया.
सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आपले शारीरिक नुकसान तर होतेच पण त्याचबरोबर त्याचा दुरोगामी परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियावर काही पोस्ट केली तर आपण त्यातील गोष्टींचा आपल्या मतानुसार तर्क लावून रिकामे होतो आणि स्वतःची इतरांशी तुलना करणे चालू करतो.
जेव्हा कोणी व्यक्ती काही खरेदी करतो आणि ते सोशल मीडियावर टाकतो तेव्हा अनेक प्रकारच्या लोकांमध्ये असूया निर्माण होते आणि आपण एखाद्याचे अहित चिंततो किंवा त्याला ती गोष्ट मिळाली मला का नाही मिळाली असा विचार करून स्वतःला त्रास करून घेतो.
सोशल मीडियावर अनेक जण धुम्रपान, मद्यपान किंवा इतर गोष्टी करताना आढळून येतात. सुरुवातीला आकर्षण म्हणून आणि नंतर व्यसन म्हणून काही गोष्टी आपल्याला देखील जडू शकतात.सोशल मीडियावर आपले फोटोज अपलोड केल्या कारणाने त्यांचा गैरवापर करणारे सायबर गुन्हेगार अस्तित्वात असतात. हे सायबर गुन्हेगार आपले छायाचित्र वापरून आपली फसवणूक करू शकतात किंबहुना करतात.
प्रामुख्याने बँकेशी निगडित गोष्टी सोशल मीडियावर टाकणे टाळले पाहिजे.सोशल मीडियावर अनेकदा विचारांमध्ये मतभेद असल्या कारणाने आणि वादावाद देखील होतात. काही वेळा गोष्टी चिघळतात आणि त्यातून गुन्हे देखील घडू शकतात. या भांडणांमुळे आपले सामाजिक संबंध बिघडू शकतात.आपण सर्वांनी रोजच्या जीवनात जगताना एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की सोशल मीडिया आहे एक मृगजळ आहे आणि त्याच्या मागे न धावलेलेच बरे.
10 ओळींमध्ये सोशल मीडियाचा प्रभाव या विषयावर भाषण
- सोशल मीडिया हे एक दुधारी शस्त्र आहे असे मी मानते.
- जो सोशल मीडियाचा वापर हुशारीने करेल त्या व्यक्तीसाठी हे एक वरदान आहे आणि जो याचा चुकीचा वापर करेल त्या व्यक्तीसाठी हा एक शापच आहे.
- सोशल मीडियावर आपल्याला विविध विषयांवरील ज्ञान मिळते, सोशल मीडिया म्हणजे माहितीचे भांडारच आहे.
- आजच्या युगामध्ये आपल्याला काही नवीन शिकायचे असले तर सोशल मीडिया सारखा गुरु शोधूनही सापडणार नाही.
- सोशल मीडियावर प्रत्येक विषयासंबंधी सखोल ज्ञान सापडते सोशल मीडिया म्हणजे एक प्रकारचे विद्यापीठ झाले आहे.
- सोशल मीडियावर विविध प्रकारचे ज्ञान मिळत असले तरी काही गोष्टी अर्धवट आहेत आणि अर्धवट ज्ञानामुळे नुकसानच होते हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.
- सोशल मीडियाचा वापर अनेक सायबर गुन्हेगार आपल्या फायद्यासाठी करतात आणि अनेक निरपराध नागरिकांना आपले शिकार बनवतात.
- सोशल मीडियावर लोक स्वतः संबंधी नको असलेल्या गोष्टी देखील जाहीर करतात परिणामी ज्या गोष्टी गुप्त ठेवायच्या असतात त्या उघड होतात.
- एखादी वस्तू आपण खरेदी केली तर सर्वप्रथम ती सोशल मीडियावर दाखवली जाते मात्र त्यातून मत्सर निर्माण होतो तसेच लोक एकमेकांशी तुलना करणे चालू करतात.
- मित्रांनो आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये सोशल मीडियाचा वापर हा मर्यादित पणे केला पाहिजे अन्यथा त्यामुळे येणाऱ्या संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागेल.
सोशल मीडियाचे सकारात्मक परिणाम कोणते आहेत?
सोशल मीडिया मुळे माहिती जलद मिळते, लोकांमधील संवाद वाढतो, व्यवसाय-मार्केटिंगला चालना मिळते आणि शिक्षण, करिअर व सामाजिक जागरूकतेसाठी उपयुक्त मंच उपलब्ध होतो.
सोशल मीडियाचे नकारात्मक परिणाम कोणते असू शकतात?
अतिवापरामुळे वेळेचा अपव्यय, मानसिक ताण, तुलना-आधारित न्यूनगंड, गोपनीयतेचा भंग, चुकीची माहिती (फेक न्यूज) आणि व्यसनाधीनता निर्माण होऊ शकते.
सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करावा?
वेळेची मर्यादा ठेवणे, विश्वासार्ह माहितीच वापरणे, गोपनीयता सेटिंग्ज वापरणे, सकारात्मक व उपयुक्त कंटेंटला प्राधान्य देणे आणि वास्तव जीवनाशी संतुलन राखणे आवश्यक आहे.