Aarogydayi Jiwanshailiche Paryay Speech In Marathi:आरोग्यदायी जीवन शैलीचे पर्याय भाषण मराठी

Aarogydayi Jiwanshailiche Paryay Bhashan Marathi: आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींना आणि पालकांनो. आज दिनांक 7 एप्रिल. सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. 7 एप्रिल 1948 रोजी वर्ल्ड ऑर्गनायझेशन ची स्थापना झाली. 1950 पासून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या स्थापनेचा दिवस हा जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा होतो.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जिला संक्षिप्तपणे डब्ल्यूएचओ असे देखील म्हटले जाते ही जगभरामध्ये लोकांच्या आरोग्याविषयी असलेल्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणारी एक संस्था आहे. आज आपण कोणतेही औषध खातो त्या औषधाचे प्रमाण ते औषध आपल्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्याचे मानांकन इत्यादी सर्व संस्था निर्धारित करत असते. मित्रांनो एखादा आजार आपल्याला होऊ नये म्हणून आपण लस घेतो आणि त्या आजाराचा भविष्यात जो धोका होणार असतो त्याला काही अंशी टाळतो.

कधीकधी आपण आजारी पडल्यानंतर औषधे घेऊन बरे होतो. काही आजार हे आपल्याला जिवाणू आणि विषाणू यांच्या संपर्कामुळे होतात. जेव्हा एखादा व्यक्ती आजारी असतो आणि आपण त्याच्या संपर्कात आलो तर आपण देखील आजारी पडतो त्यावेळी औषधांनी तो आजार बरा होतो मात्र काही आजार हे असे असतात की जे आपल्या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला जडतात अशा आजारांसाठी आपण आरोग्यदायी जीवनशैली सुरुवातीपासून अंगीकारली पाहिजे.

आपण जर आधुनिक काळापूर्वीचा काळ पाहिला तर आपल्याला दिसून येईल की तेव्हा लोक कष्टाची कामे करत त्या कामांमुळे त्यांचे शरीर थुकून जात असे आणि ते योग्य जेवण अथवा आहार करून पुढे आराम करत. त्या काळामध्ये मोबाईल किंवा इतर संगणक सुविधा अस्तित्वात नसल्याकारणाने लोक लवकर झोपी जात आणि लवकर उठत. आपल्या भारतामध्ये तर लवकर नीजे लवकर उठे त्यास आरोग्य धनसंपदा लाभे अशी म्हण देखील प्रचलित आहे जी आपल्या जीवनाशी अगदी तंतोतंत जुळते.

आजच्या काळामध्ये आपण अशाच प्रकारे वागणे हे आपल्या हिताचे ठरणार आहे कारण जो आधुनिक ते बरोबरच आपल्या मूल्यांना धरून ठेवतो तोच व्यक्ती आयुष्यात आनंदी राहतो. आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्यासाठी आपल्याला आपले काम हे एका वेळे पुरते निर्धारित केले गेले पाहिजे. जसे की आठ ते दहा तास काम करणे हा मनुष्य धर्म आहे त्यानंतर आपल्या शरीराला देखील ऊर्जेची गरज भासते योग्य आहार सेवन करणे हे शरीराला ऊर्जा मिळवून देण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.

आहारामध्ये सर्व प्रकारांच्या फळांचा समावेश असला पाहिजे तसेच प्रथिने, कर्बोदके ही योग्य प्रमाणात सेवन केली गेली पाहिजेत अन्यथा शरीर हे निकृष्ट बनत जाते. आज कालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण पोषणयुक्त आहार खायचा टाळून पिझ्झा बर्गर यांसारखे पदार्थ खातो जा मधून शरीराला पोषक तत्वे मिळत नाहीत परिणामी आपले शरीर हे चरबीयुक्त पदार्थांनी भरते.शरीर जर पोषण युक्त पदार्थ घेऊ शकत नसेल तर ते लवकरच विविध आजारांना बळी पडते.

आज-काल वैद्यकीय क्षेत्रामध्ये विविध विषाणू आणि जिवाणू यांवर प्रभावी ठरणारी औषधे निर्माण झालेली आहेत मात्र सध्याचे आजार हे कुठल्याही विषाणू आणि जिवाणू पेक्षा अधिक घातक आहेत आणि ते तयार झालेले आहेत अयोग्य जीवनशैलीचा अवलंब केल्यामुळे.आज काल प्रत्येक घरामध्ये मधुमेह, लठ्ठपणा, ताण-तणावांनी ग्रस्त असलेले अनेक लोक आपल्याला दिसून येतील. बाह्यदर्शी पाहत आहे लोक आपल्यासारखेच अगदी स्वस्थ दिसतात परंतु त्यांचे आजार हे त्यांना आतून मारत आहेत. या आजारांपासून स्वतःला वाचवायचे असेल तर प्रत्येकाने आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारली पाहिजे.

आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये सर्वप्रथम आपण आहाराचे योग्य नियोजन केले पाहिजे. आपल्या उठण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा निर्धारित केल्या पाहिजेत. जर आपण बैठे काम करत असू तर वेळोवेळी थोडावेळ उठून चालले पाहिजे. दररोज व्यायाम करण्याने आपले शरीर लवचिकता टिकून धरते.आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारताना आपण व्यसनांपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. दारू, सिगारेट यांचा प्रभाव हा लगेच दिसत नसला तरी काही काळानंतर त्याचे गंभीर दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात.

आरोग्यदायी जीवनशैली म्हणजे व्यसनांपासून मुक्तता करून घेणे होय. आपल्याला ताण-तणावांचा सामना करण्यासाठी नियमितपणे काही वेळासाठी ध्यान केले पाहिजे. ध्यान केल्याने मन एका ठिकाणी केंद्रित होते. मनातील नको ते विचार निघून जातात. चिंता ही चितेपेक्षा जास्त जाळते असे म्हटले जाते म्हणूनच स्वतःला नेहमी ताणतणावापासून दूर ठेवावे.

एकूण काय तर आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे म्हणजेच निसर्गाच्या सानिध्यात जाणे आणि स्वतःला आतून ओळखून स्वतःचा विकास साधणे होय.

10 ओळी भाषण:आरोग्यदायी जीवनशैली

  1. सर्वसामान्य लोकांना आरोग्य विषयी ज्या ग्रुपचा निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो.
  2. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली, त्यांच्या स्थापनेचा हा दिवस 1950 पासून जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा होतो.
  3. माणसाची आरोग्य शैली ही सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये अत्यंत बदलली आहे.
  4. पूर्वीचे कष्टाचे काम कमी होऊन अनेकांना बैठी कामे करावी लागतात त्यामुळे आरोग्याशी निगडित अनेक आरोग्य समस्या आपल्यासमोर उभ्या राहतात.
  5. आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्यासाठी आपल्याला आपल्या रोजच्या दिनक्रमामध्ये काही महत्त्वाचे बदल करायला हवेत.
  6. रोज सकाळी लवकर उठून थोडाफार व्यायाम केला गेला पाहिजे.
  7. शरीरासाठी पोषक अशा आहाराचे सेवन केले पाहिजे, आहारामध्ये प्रथिने आणि कर्बोदके यांचे प्रमाण योग्य असले पाहिजे.
  8. काम करण्याबरोबरच किमान आठ तासांची झोप घेणे अनिवार्य केले पाहिजे.
  9. आपला प्रत्येक दिवस हा माणसाने आनंदात घालवला पाहिजे आणि ताण-तणावापासून दूर राहिले पाहिजे.
  10. जर आपण आरोग्यदायी जीवनशैलीचे हे पर्याय अवलंबले तर निरोगी आयुष्य जगू शकतो.

आजच्या आधुनिक काळामध्ये कोणत्या प्रकारचे आजार आढळतात?

आजच्या आधुनिक काळामध्ये लठ्ठपणा, मधुमेह आणि ताण तणाव यामुळे निर्माण होणाऱ्या आजार आढळतात.

आरोग्यदायी जीवनशैली करता कोणते पर्याय महत्त्वाचे ठरतात?

आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारताना लवकर उठणे, व्यायाम करणे, चांगली झोप घेणे आणि ध्यान करणे हे पर्याय महत्त्वाचे ठरतात.

जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा स्थापना दिवस म्हणजेच ७ एप्रिल हा दिवस दरवर्षी जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो.

Leave a Comment