My Favourite Actor Essay In Marathi: मित्रांनो मनोरंजन क्षेत्र हे माणसाला त्याच्या दैनंदिन जीवनातील काही जड प्रसंग विसरायला निश्चितच मदत करते. मनोरंजन क्षेत्रामध्ये उत्क्रांती होत गेली. पूर्वी जे मूक चित्रपट होते त्यांची जागा बोलक्या चित्रपटांनी घेतली. चित्रपट, नाटक, जाहिराती यांमध्ये अभिनयाच्या संधी वाढल्या आणि नवनवीन अभिनेता आणि अभिनेत्री उदयास आल्या.
आजच्या काळात तर चित्रपटांबरोबर सिरीज नावाचा नवीन प्रकार उदयास आलेला आहे नवनवीन उदयनमुख कलाकार त्यातून स्वतःचे नशीब आजमावत आहेत या सगळ्या नवीन मांदियाळी मध्ये एक जुना चेहरा आजही प्रत्येक मनावर राज्य करतो तो म्हणजे विनोदाचा बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे.लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट म्हणजे हास्याची पर्वणीच होती.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट म्हटले की आम्ही सर्वजण दूरदर्शन वरून बाजूला होतच नसू. दर शनिवारी दुपारी साडेतीन आणि रविवारी दुपारी चारला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय असलेला एक मराठी चित्रपट आम्ही पाहत असू. आपल्या अभिनयाने ते समोरच्याला जागेवरच खिळवून ठेवत असत.
लक्ष्मीकांत जी ज्या चित्रपटात भूमीका करत तिथे जो चित्रपटाचा नायक असे तोदेखील त्यांच्यापुढे फिका पडत असे इतके वलय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयामध्ये होते.
लक्ष्मीकांत बेर्डे म्हटल्यावर आपल्याला आठवते ती अशी ही बनवाबनवी मधली पार्वती. हा माझा बायको या डायलॉग ने फेमस झालेली पार्वती सगळ्यांना आपल्यापैकीच एक वाटते. शरीराने पुरुषी असले तरी पार्वती ही एक स्त्री आहे हे लक्ष्मीकांत यांच्या आणि अभिनयाने सर्वांनीच मान्य केले होते. पार्वतीचा रांगटपणा आणि विनोद त्यांनी अगदी उत्तम रीतीने हाताळले होते. अशी ही बनवाबनवी हा चित्रपट जितका वेळा पाहिला जातो तितक्या वेळा पार्वती सर्वांना आपल्या विनोदी अभिनयाने हसवते.
चित्रपटांमध्ये सचिन पिळगावकर यांनी साकारलेली सुधा अगदी सौंदर्यवती स्त्री म्हणून शोभते मात्र तिच्यापुढे तितकीशी सुंदर नसलेली पार्वती देखील भाव खाऊन जाते ही रसिक प्रेक्षकांनी लक्ष्मीकांत जी यांच्या कामाला दिलेली दाद आहे.
लक्ष्मीकांत जी यांनी धुमधडाका, पछाडलेला, शुभ बोल नाऱ्या, जनता जनार्दन, हमाल दे धमाल अशा कितीतरी एक से बढकर एक मराठी चित्रपटांना आपल्या अभिनयाने मोठे केले आहे.
झपाटलेला हा चित्रपट तर लक्ष्मीकांत जी यांच्या जीवन काळातील एक सर्वोत्तम चित्रपट म्हणावा लागेल. तात्या विंचू आणि लक्षा यांच्यामधील संवाद एका बाहुल्याच्या आत दडलेला खलनायक आणि त्याला घाबरणारा नायक त्यांनी उत्तमपणे साकारला समोर फक्त बाहुला असताना त्यांनी त्या बाहुल्यातला जिवंत खलनायक स्वतःच्या नजरेसमोर ठेवून स्वतःचा अभिनय साकारला.
आजही तात्या विंचू म्हटले की भीतीची एक लहर मनामध्ये येते, इतका जिवंत अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केला आहे.लक्ष्मीकांत जी यांचे आपल्या सहकलाकारांबरोबर मैत्रीपूर्वक संबंध होते. सचिन पिळगावकर, अशोक सराफ, महेश कोठारे या त्रिकुटांबरोबर असलेली लक्ष्मीकांत बेर्डे ची यांची मैत्री जगविख्यात आहे.
आपल्या मित्रांच्या शब्दाखातर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला. पछाडलेला या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते अत्यंत आजारी होते तरी त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप या चित्रपटांमध्ये देखील पाडलेली आहे.शुभ बोल नाऱ्या या चित्रपटांमध्ये सगळ्यांना नको असणारा एक तरुण त्यांनी उत्तमरीत्या साकारलेला आहे. एक होता विदूषक हा चित्रपट लक्ष्मीकांत जी यांच्या आयुष्याच्या भरपूर जवळ जाणारा आहे असे म्हटले जाते.
अभिनयाचे उत्तम जाण असून देखील त्यांना बहुतांश वेळा सहअभिनेता म्हणूनच काम करावे लागले ही सल त्यांना आयुष्यभर राहिली. त्यांचे आयुष्य ही एखाद्या विदूषकाप्रमाणे सर्वांना हसवण्यात गेले ज्याचे दुःख कधीच कोणी समजू शकले नाही. म्हणूनच एक होता विदूषक हा त्यांच्या अत्यंत जवळचा चित्रपट होता. त्यांच्या या चित्रपटाकडे मात्र विनोदी अंगण होते म्हणून प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि या लाडक्या कलाकाराला दुर्लक्षित केले गेले. हा कलाकार फक्त विनोदी कामे करण्यासाठी आहे असा एक शिक्काच त्यांच्यावर बसला.
मायबाप प्रेक्षकांचा हा आदेश आहे असे समजून त्यांनी पुढे अनेक विनोदी कलाकृती अगदी एक हाती चालवल्या. लक्ष्मीकांत जी हे गंभीर भूमिका देखील करू शकतात हे त्यांनी आपल्या अभिनयातून वारंवार दाखवून दिले.
हमाल दे धमाल हा लक्ष्मीकांत जी यांनी साकारलेला चित्रपट कष्ट करून पोट भरणाऱ्या समाजाचे चित्रण आहे. हमालांचे आयुष्य, त्यांचे कुटुंब यांच्या घरची परिस्थिती या चित्रपटांमध्ये उत्तमरीत्या दाखवलेली आहे. घरासाठी संघर्ष करणारा घरातील कर्ता मुलगा त्यांनी अत्यंत खुबीने दाखवला आहे. स्वप्नवत वाटणारा हा प्रवास अनेक लोकप्रत्यक्ष आयुष्यात देखील मिळवू शकतात हे या चित्रपटात शिकण्यासारखे आहे.
लक्ष्मीकांत जी यांचे अनेक चित्रपट हे वाखाणण्यासारखे होते. आज लक्ष्मीकांत जी आपल्यासोबत नाहीत तरीपण त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून ते आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक घर करून राहिलेले आहेत.
10 Lines Essay My Favourite Actor
- मराठी चित्रपट सृष्टी मध्ये विनोदाचा बादशहा म्हणून ओळखले गेलेले लक्ष्मीकांत बेर्डे हे माझे आवडते अभिनेते आहेत.
- लक्ष्मीकांत जी यांनी आपल्या हलक्याफुलक्या आणि विनोदी अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
- लक्ष्मी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
- झपाटलेला, धुमधडाका, पछाडलेला, थरथराट असे एकापेक्षा एक छान चित्रपट लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांना दिलेले आहेत.
- लक्ष्मीकांत बेर्डे यांनी टूर निघाली या मराठी कार्यक्रमांमध्ये देखील उत्तम भूमिका निभावली आहे.
- धडाकेबाज या चित्रपटामध्ये बाटलीतला गंगाराम आणि लक्षा ही दोन पात्रे त्यांनी एकट्याने अगदी समर्थपणे निभावलेली आहेत.
- अशी ही बनवाबनवी या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेली पार्वती आजही प्रेक्षकांना हसवते.
- झपाटलेला चित्रपटांमध्ये एका बाहुल्याला घाबरणारा नायक त्यांनी अगदी हुबेहूब साकारला आहे.
- लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या जोड गोळीने महाराष्ट्रातील मराठी मनांवर एक काळ राज्य केलेले आहे.
- आज लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या सोबत नसले तरी त्यांच्या दर्जेदार अभिनयाने सजलेले चित्रपट आपल्यासाठी त्यांनी ठेवलेला एक अनमोल असा खजिना आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे अभिनित पाच चित्रपटांची नावे सांगा?
झपाटलेला, धुमधडाका, पछाडलेला, थरथराट आणि हमाल दे धमाल तसेच इतर चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सहज सुंदर अभिनय केलेला आढळतो.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बद्दल मराठी चित्रपट सृष्टीत काय गौरव उद्गार काढले जातात?
लक्ष्मीकांत बेर्डे यांना मराठी चित्रपट सृष्टी मध् विनोदाचा बादशहा असे म्हणून ओळखले जाते.
लक्ष्मीकांत बेर्डे हे कशासाठी प्रसिद्ध होते?
लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये विनोदी भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध होते