Savitribai Phule Bhashan Marathi: आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग, माझे सह अध्याय आणि पालक तसेच येथे जमलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो . आज दिनांक 3 जानेवारी म्हणजेच जागतिक बालिका दिवस. आजच्या दिवसाला महिला मुक्ती दिवस असे म्हटले जाते. आज आपण सर्वजण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी येथे एकत्र जमले आहोत तसेच त्यांच्या आठवणींना माझ्या भाषणामधून उजाळा देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव मध्ये नेवसे कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सावित्रीबाई यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. आज संपूर्ण भारतभर त्यांचा जन्मदिवस हा बालिका दिवस किंवा महिला मुक्ती दिवस म्हणून साजरा होतो.सावित्रीबाई फुले यांचा बाल विवाह जोतिबा फुले यांच्याशी 1840 मध्ये झाला.
जेव्हा लग्न झाले तेव्हा त्या 9 वर्षे वयाच्या तर जोतिबा फुले हे 13 वर्षाचे होते. जोतिबा फुले हे आधीच मातृप्रेमाला मुकले होते. त्यांचा सांभाळ त्यांची आत्या सगुणा बाई यांनी केला होता. सगुणा आत्या या त्या काळामध्ये इंग्रज अधिकाऱ्यांच्या घरी दाईचे काम करत होत्या. इंग्रज अधिकाऱ्यांच्या घरी काम करता येत असल्यामुळे त्यांना इंग्रजी चांगले समजत होते. त्यांनी ज्योतिबा फुले यांना देखील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.
सगुणा आत्यांकडे पाहून ज्योतिबा फुले यांना स्त्री शिक्षित होणे किती महत्त्वाचे आहे हे कळले. ज्योतिबा फुले यांनी लग्नानंतर सावित्रीबाई फुले यांना स्वतः शिकवले. ज्योतिबा फुले एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आणि सावित्रीबाई फुले यांनी मिळून 1948 मध्ये पुण्यातील भिडे वाडा येथे मुलींचे पहिली शाळा सुरू केली.एक स्त्री स्वतः शिकते आणि इतर मुलींना शिकवते हे त्या काळाच्या सनातनी आणि कर्मठ लोकांना आवडले नाही.
सावित्रीबाई जेव्हा मुलींना शाळा शिकवण्यासाठी घराबाहेर पडत तेव्हा रस्त्याने जाताना त्यांच्यावर शेण फेकले गेले होते. कोणी चिखल टाके तर कोणी अतिशय घाणेरड्या शब्दांमध्ये निंदानालस्ती करत. लोकांनी भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला मात्र सावित्रीबाई ह्या त्यांच्या ध्येयापासून थोड्याही डगमगल्या नाहीत.
सावित्रीबाई फुले यांनी पती ज्योतिबा फुले यांच्या सोबतीने स्त्री शिक्षणाचा वसा हाती घेतला. जेव्हा त्यांनी शिक्षिका म्हणून काम सुरू केले तेव्हा त्या काळचे कर्मठ लोक म्हणायला लागले की आता जग बुडणार, कलीचे युग आले आहे. आता सर्व जग नष्ट होईल. मात्र अशा लोकांच्या बडबडीला सावित्रीबाई फुले यांनी भीक घातली नाही. त्यांनी आपल्या शिक्षण सेवेचे पवित्र व्रत चालू ठेवले.
स्त्री शिक्षणाबरोबरच सावित्रीबाई फुले यांनी अनेक समाजवादी चळवळींमध्ये सहभाग नोंदवला आणि देशाला आणि समाजाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याला सावित्रीबाईंनी साथ दिली. त्यांनी याद्वारे बाल जराठ विवाह पद्धती बंद केली. बाल जराठ विवाह पद्धती मुळे अनेक बालिका या वयाच्या तेराव्या ते चौदाव्या वर्षी विधवा होत. त्या काळी विधवा स्त्रियांना सती जावे लागत असे त्याचप्रमाणे जर स्त्री सती गेली नाही तर तिचे केशवपन केले जात. केशवपणामुळे स्त्री ला कुरूप केले जाई.स्त्रिया या सामाजिक हिंसाचाराला बळी पडत.
कधी कधी स्त्रियांचे शोषण केले जात असे त्यातून काही विधवा स्त्रिया गरोदर राहत. अशा स्त्रियांची मुले सांभाळण्याचे काम सावित्रीबाईंनी केले. अशाच ठिकाणी जन्मलेल्या मुलाला त्यांनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव यशवंत ठेवले.
सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये जेव्हा प्लेग ची साथ पसरली होती तेव्हा जनतेची सेवा केली मात्र यादरम्यान त्यांना स्वतःला देखील प्लेग झाला आणि पुढे 10 मार्च 1897 रोजी त्यांचा प्लेग ने मृत्यू झाला.
सावित्रीबाईंनी जे काम आयुष्यभर केले त्यामुळेच आज ची श्री घराबाहेर पडू शकते, ताठ मानेने समाजात वावरू शकते आणि स्वतःच्या पायावर उभी आहे.सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या या महान कार्याला आमचा सलाम!
10 lines Speech Savitribai phule
- सावित्रीबाई फुले यांचा जन्म 10 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे नेवसे कुटुंबामध्ये झाला.
- सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस हा राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो.
- आधुनिक भारतामध्ये स्त्रीयांना सावित्रीच्या लेकी असे संबोधले जाते.
- सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे जोतिबा फुले यांच्या सोबतीने मुलींची पहिली शाळा सुरू केली.
- सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत.
- सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाची चळवळ यशस्वीपणे चालवली आणि लोकांना नवीन दृष्टिकोन दिला.
- सावित्रीबाईंनी केशवपन आणि सती जाणे या कुप्रथांना कडाडून विरोध केला.
- सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच शिक्षणाचे महत्त्व तळागाळातील स्त्रियांपर्यंत पोहोचविले.
- सावित्रीबाईंनी पुण्यात पसरलेल्या प्लेग च्या साथीमध्ये स्वतः जनसेवा केली.
- आपले जनकार्य करत असताना प्लेग मुळे सावित्रीबाईंचे 10 मार्च 1897 रोजी निधन झाले.
सावित्रीबाई फुले यांना शिक्षण कोणी दिले?
महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतः सावित्रीबाईंना शिक्षण दिले.
सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या समाजसुधारणा केल्या?
स्त्री शिक्षण, विधवा पुनर्वसन, बालविवाह व सतीप्रथेचा विरोध, केशवपन बंदी यासाठी त्यांनी कार्य केले
भारतातील पहिली मुलींची शाळा कोठे सुरू झाली?
पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू झाली.