Holi San Nibandh Marathi:होळी म्हटली की डोळ्यासमोर उभी राहते ती लाकडे आणि गौरी म्हणजे गायीच्या शेणापासून तयार केलेली शेणी यांच्या माध्यमातून पेटवलेली होळी .
होळी हा सण भारतामध्ये विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने साजरा होतो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होळीमध्ये विविध प्रकारच्या सुविधा आणि त्याचबरोबर गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गौऱ्या या एकत्र करून जाळल्या जातात. या मध्ये नारळाची आहुती दिले जाते.
पुरणपोळीचा नैवद्य होळीमध्ये अर्पण केला जातो.फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा करतात. यादिवशी घरी छान असे जेवण तयार केले जाते. पुरणपोळी, कटाची आमटी, भात, कोशिंबीर, बटाटेभाजी . या पदार्थांचा नैवेद्य होळी मध्ये दिला जातो.
होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड तर पाच दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळी हा सण वसंतोत्सवच्या आगमनासाठी देखील साजरा करतात.
होळी या सणादरम्यान शेतीची कापणीची कामे पूर्ण झालेली असतात तसेच शेती ती तापून सुलाखून निघण्यासाठी मोकळी केलेली असते. माती खूप छान भाजली जाते आणि त्यानंतर 3 महिन्याचा कालावधी शेती सुरू करण्याकरता बाकी असतो. म्हणजेच हा शेतकऱ्यासाठी आरामाचा काळ असतो.
होळी या सणापूर्वी गहू तयार झालेले असतात म्हणून काही ठिकाणी गव्हाच्या ओंब्या देखील होळीमध्ये अर्पण केल्या जातात.
होळीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या धुळवडी मध्ये होळीची जी राख उरलेली असते तिच्यासोबत खेळले जाते. ही राख शेतीमध्ये मिसळली जाते. तसेच ती पाण्यामध्ये मिश्रित करून तिने एकमेकांना रंगवले जाते. कोणतेही कृत्रिम रंग वापरण्याऐवजी राखेतून धुळवडीचा खेळ खेळला जातो.
भारतामध्ये विविध राज्यांमध्ये होळी साजरी होते. गोव्यामध्ये तर हा होळीचा सण अक्षरशा दहा ते पंधरा दिवस चालतो. गोव्यामध्ये या सणाला शिमगा असे म्हटले जाते. तिथे या सणाला शिमगोत्सव या नावाने ओळखले जाते.
होळी या सणाला होलिका दहन असे देखील संबोधले जाते.
होलिका दहनामागे एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. ती मी तुम्हाला सांगणार आहे.मित्रांनो पौराणिक काळामध्ये हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता. हिरण्यकश्यप हा राक्षस राजा होता. त्याचा भाऊ हिरण्य अक्षर याचा वध भगवान विष्णूंनी वराह अवतार धारण करून केला होता. आपल्या भावाच्या वधामुळे हिरण्यकश्यप या राक्षसाला भगवान विष्णूंचा खूप राग होता.जो कोणी भगवान विष्णूंचे नामक स्मरण करेल त्या व्यक्तीला तो तात्काळ मृत्युदंड देत असे. मात्र त्या हिरण्य कशाचे दुर्दैव आहे की त्याच्या पोटी जो त्याचा पुत्र प्रल्हाद होता तो सदैव श्री विष्णूंचे नामस्मरण करत असे. या नामस्मरणामुळे हिरण्य कशातला आपला पुत्र प्रल्हाद याचा खूप राग येत असे. भगवान विष्णूंच्या वर असलेल्या आपल्या रागामुळे हिरण्यकश्यपला स्वतःच्या मुलाबद्दल तीळ मात्र ही दया नव्हती. त्याने आपला पुत्र प्रल्हाद याला मारण्यासाठी कित्येक प्रयत्न केले. त्याने कधी प्रल्हादला हत्तीच्या पायी तुडवण्याचा आदेश दिला तर कधी त्याला उंच कड्यावरून ढकलून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यापैकी एकाही प्रयत्नामध्ये यशस्वी ठरू शकला नाही त्यामुळे तो चिंताग्रस्त होता. आपला शत्रु विष्णू आहे आणि आपला मुलगा त्याचीच भक्ती करतो हे हिरण्यकश्यपला मान्य नव्हते.एकदा तो असा चिंताग्रस्त असताना त्याच्या भेटीसाठी त्याची बहीण होली का त्याच्याकडे आली. त्याने आपल्या बहिणी जवळ आपली चिंता सांगितली आणि आपल्याला प्रल्हाद पासून मुक्तता हवी आहे असे देखील तिला सांगितले.हिरण्यकश्यप ची बहीण होलीका ही देखील त्याच्याप्रमाणेच असुर वृत्तीची होती. तिने आपल्या भावाला स्वतःला अग्नी पासून वाचण्याचे वरदान आहे ही गोष्ट सांगितली. होलीकेने देवांना प्रसन्न करून स्वतःला अग्नीपासून संरक्षण मिळावे असे वरदान मागितले होते आणि तिला देवाने ते दिले होते.जेव्हा हिरण्यकशपला हे कळले की होलीका ही अग्नीमध्ये बसू शकते मात्र ती स्वतः जळणार नाही तेव्हा त्यांनी मिळून प्रल्हादाच्या मृत्यूचा कट रचला. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका भक्त प्रल्हादाला सोबत घेऊन अग्नीच्या रचलेल्या चितेवर बसली. मात्र सगळे उलटे झाले . भक्त प्रल्हाद याने विष्णूचे नामस्मरण सुरू केले . त्याचवेळी होलिका मात्र अग्नीच्या लपटेत आली आणि ती आगीमध्ये जळून तिचा मृत्यू झाला. भगवान विष्णूंनी हे दाखवून दिले की वरदान कोणतेही असो जेव्हा वेळ माझ्या भक्ताची येईल तेव्हा मी कायम माझ्या भक्तासोबत असेल. या पौराणिक कथेतून पुढे असा प्रघात पडला की होलीका दहन म्हणजे वाईटावर चांगल्या शक्तींचा विजय. कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही तिचा अंत जवळ असतो आणि जे सत्य असते ते अग्नी मधून देखील तावून सुलाखून चमकून बाहेर पडते.
10 Lines Essay In Marathi On Holi Festival
- होळी हा भारतातील एक महत्त्वाचा व आनंदाचा सण आहे.
- होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.
- होळीला होलिका दहन असेही म्हणतात.
- होळीच्या दिवशी लाकडे, शेणाच्या गोवऱ्या जाळून होळी पेटवली जाते.
- होळी वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते.
- होळीला पुरणपोळी व इतर पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो.
- होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते.
- धुळवडीला राख व रंगांनी खेळले जाते.
- होळी वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे.
- होळी हा सण लोकांमध्ये प्रेम, आनंद व एकतेचा संदेश देते.
होलिका दहनाचा अर्थ काय आहे?
होलिका दहन म्हणजे वाईट शक्तींचा नाश आणि चांगल्याचा विजय
होळीशी संबंधित पौराणिक कथा कोणती आहे?
भक्त प्रल्हाद व होलिका यांची कथा होळीशी संबंधित आहे.
होळीच्या दुसऱ्या दिवशी कोणता सण साजरा होतो?
होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते.
महाराष्ट्रात होळीला कोणता नैवेद्य दिला जातो?
महाराष्ट्रात होळीला प्रामुख्याने पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो
होळी सण कधी साजरा केला जातो?
होळी सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.