Mulyachi Bhaji Recipe In Marathi: मुळ्याची भाजी मराठी रेसिपी

Mulyachi Bhaji Recipe: या समाजात दोन प्रकारची लोक राहतात एक जगण्यासाठी खाणारी तर दुसरी खाण्यासाठी जगणारी आपण कोणत्या वर्गात मोडतो हे जाणे त्याने स्वतःच ठरवावे मात्र खाण्यासाठी जगणारी माणसे ही जगण्यावर आणि खाण्यावर नितांत प्रेम करणारी असतात आणि अशा खवय्या लोकांसाठी आजचा लेख मी लिहीत आहे आजच्या लेखात मी एका सुंदर फळभाजीची पाककृती आपणास विस्तारितपणे सांगणार आहे.

Mulyachi Bhaji Recipe In Marathi

मुळा ही भाजी सर्वांना माहीत असेलच काहींनी हे नाव वाचल्यावर नाक मुरडले असेल तर काहींना मुळा हा सॅलड प्रमाणे खायला आवडत ही असेल मात्र आज मी मुळ्याच्या फळाची नाही तर त्याच्या पानापासून तयार होणाऱ्या एका चविष्ट भाजीची पाककृती सांगणार आहे. ही पाककृती कदाचित काहीजणांना आधीच ठाऊक असेल तर काहींनी प्रथमच वाचली ऐकली असेल.

माझे असे निवेदन आहे की प्रत्येकाने आपल्या घरी एकदा ही भाजी निश्चित करून पहावी आणि ती कशी झाली हा अभिप्राय आम्हाला वाचायला नक्कीच आवडेल. चला तर मग सुरुवात करूया मुळ्याच्या पानांच्या भाजीला लागणार सामग्री पासून.ाझे असे निवेदन आहे की प्रत्येकाने आपल्या घरी एकदा ही भाजी निश्चित करून पहावी आणि ती कशी झाली हा अभिप्राय आम्हाला वाचायला नक्कीच आवडेल. चला तर मग सुरुवात करूया मुळ्याच्या पानांच्या भाजीला लागणार सामग्री पासून.

मुळ्याची भाजी साहीत्य

१. एक ताजी हिरव्या पानांची मुळा भाजी
२. एक कांदा
३. पाच ते सहा पाकळ्या लसुन
४. चार ते पाच हिरव्या मिरच्या
५. शेंगदाण्याचा कूट
६. खायचे तेल
७. मीठ स्वादानुसार
८. जिरे

मुळ्याची भाजी पाककृती

स्टेप १: सर्वप्रथम बाजारातून आणलेली मुळ्याची भाजी स्वच्छ पाण्यामधून धुऊन घ्यावी.
स्टेप: मुळ्याच्या पाना पासून मुळा वेगळा करावा.
स्टेप: मुळ्याची पाने सुरीच्या सहाय्याने अगदी बारीक चिरून घ्यावीत.
स्टेप: गॅसवर एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते उकळत ठेवावे आणि त्यामध्ये ही चिरलेली मुळ्याची पाने टाकावीत मुळ्याची पाणी शिजेपर्यंत भांड्यावर झाकण ठेवावे.
स्टेप: मुळ्याची पाने शिजल्यानंतर गॅस बंद करावा.
स्टेप: कांदा बारीक चिरून घ्यावा.
स्टेप: हिरव्या मिरच्या चिरून घ्याव्यात.
स्टेप: लसणाच्या पाकळ्या सोलून घ्याव्या.
स्टेप: शिजलेल्या मुळ्याच्या पानांमधील पाणी पूर्णपणे काढून टाकावे.
स्टेप १०: गॅसवर एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल घ्यावे.
स्टेप ११: तेल गरम झाले की त्यामध्ये अनुक्रमे जिरे, लसुन , हिरव्या मिरच्या टाका.
स्टेप १२: त्यानंतर हळद आणि स्वादानुसार मीठ टाकावे.
स्टेप १३: आता शिजलेली मुळ्याची भाजी भांड्यामध्ये टाकून भाजी हलवत रहावे.
स्टेप १४: भाजी भांड्याला चिकटून करपणार नाही याची दक्षता घ्यावी.
स्टेप १५: भांड्यावर झाकण ठेवून भाजी शिजू द्यावी.
स्टेप १६: भाजी शिजत आल्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार भाजलेल्या शेंगदाण्याच्या कूट टाकावा.
स्टेप १७: भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करावा.

गरम गरम भाकरी बरोबर ही चविष्ट अशी मुळ्याच्या पानांची भाजी खाण्यासाठी तयार झाली. मुळ्याचे अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. हे सविस्तरपणे आपण लेखात पाहू.

मुळ्यामध्ये कोणते औषधी गुण आहेत?

मुळ्यामध्ये विटामिन सी आणि बी सिक्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे मुळा हा अँटिऑक्सिडंट सुद्धा आहे. मुळ्याची भाजी खाल्ल्याने पचनसंस्थेत सुधारणा होते. मूळयामध्ये विविध प्रकारची प्रथिने , लोह आणि फॉस्फरस आढळते.

मुळ्याची भाजी कोणी खावी?

ज्या व्यक्तींमध्ये रक्ताची कमतरता असते, अशक्तपणा असतो त्याचप्रमाणे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी मुळा खाणे फायदेशीर ठरते. मुळा हा हृदयरोग पेशंट असलेल्या व्यक्तींसाठी ही वरदान आहे कारण त्यामध्ये अँथोसायनिन नावाचे फ्लेव्हनाईड आढळते.
ज्या ज्या व्यक्तींची पित्त प्रकृती असते त्यांनी देखील मुळ्याचे सेवन केले पाहिजे. मूळयामध्ये असलेल्या लोहामुळे रक्तातील लाल पेशींचे प्रमाण वाढते आणि पर्यायाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

मुळा ही कंदवर्गीय वनस्पती आहे तसेच ती उष्ण वर्गीय आहे म्हणूनच हिवाळा आणि पावसाळा या ऋतूंमध्ये मुळा खाल्ल्यास त्याचा शरीराला फायदाच होतो म्हणजेच शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम मुळा करतो. मुळ्याचे पराठे , रायता लहान मुले अगदी आवडीने खातात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कित्येक लोक हे घरचे आरोग्यदायी खाणे खाण्याऐवजी पिझ्झा बर्गर यांसारखे पदार्थ खातात जे आरोग्यासाठी पुढे जाऊन त्रास निर्माण करतात.

पिझ्झा बर्गर हे पदार्थ अनेक शारीरिक समस्यांना आमंत्रण देतात जसे की अतिरिक्त वाढलेले वजन, उच्च रक्तदाब, मधुमेह. या शारीरिक समस्यांना टाळण्यासाठी आपल्या माती तयार झालेल्या भाज्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. भारतामध्ये विविध प्रांतांमध्ये तेथील हवामान आणि कृषी क्षेत्रानुसार भाज्यांची नावे बदलतात मात्र सर्वांमध्ये एक गोष्ट समान राहते ती म्हणजे त्या भाज्यांमधील सकसपणा. मुळा ही वनस्पती कंदवर्गामध्ये गणली जाते.

हे पण वाचा: Forgiveness In Marathi: क्षमा म्हणजे काय?

अशा पद्धतीच्या वनस्पतींमध्ये अन्न हे मुळामध्ये साठते. मूळयामध्ये आणि त्याच्या पानांमध्ये जास्त प्रमाणात पाणी आढळते त्यामुळे पोट लवकर भरते आणि अशा पद्धतीने वजन नियंत्रित ठेवण्यासाठी देखील मुळ्याचा उपयोग होतो. हिंदी भाषिक परिसरामध्ये मुळापासून बनणारे मुली के पराठे प्रसिद्ध आहे.

मुळा भाजीचे महत्व तर संतांच्या अमृतवाणी मध्ये सुद्धा शेकडो वर्षांपूर्वी गायले गेले आहेत. संत सावता माळी म्हणतात,”कांदा ,मुळा ,भाजी अवघी विठाई माझी, लसूण ,मिरची, कोथिंबीर अवघा झाला माझा हरी” यातून आपल्याला हे निश्चितच समजते की महाराष्ट्रात मुळा ही भाजी पूर्वपार पद्धतीने आपल्या जेवणाचा एक अविभाज्य घटक होती किंबहुना आहे. मुळ्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. बाजारामध्ये आपल्याला मुळा अगदी किफायतशीर दरामध्ये मिळतो. अशा आरोग्यदायी भाज्या आपण आवर्जून खाल्ल्या पाहिजेत.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आवर्जून तुम्ही ही मुळ्याच्या पानांची भाजी करून चाखायला हरकत नाही. तुमचा या लेखावरील अभिप्राय ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.

अशाच नवनवीन पाककृती शिकण्यासाठी आणि वेगवेगळ्या विषयांवरील लेख वाचण्यासाठी आमच्या साईटला नक्की भेट द्या.

Leave a Comment