Independence Day Essay In Marathi: भारत हा एक प्रजासत्ताक देश आहे. प्रजासत्ताक म्हणजे जिथे प्रजेचे राज्य आहे. मात्र भारताची ही प्रजासत्ताक राज्य असलेली ओळख सहजासहजी निर्माण झालेली नाही. भारताने दीडशे वर्ष पारतंत्र्यात काढलेली आहेत. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो. भारताचा स्वातंत्र्य प्रवास कसा होता हे आपण भारतीय स्वातंत्र्य दिन या 100 ते 500 शब्दांमधील निबंधामध्ये जाणून घेऊयात.
Independence Day Essay In Marathi
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे,
आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे……
स्वातंत्र्य म्हणजे काय? तर आपल्या मर्जीने जगता येणे. त्यामध्ये कुणाचीही आडकाठी येत नाही. पण आपल्याला खरेच स्वातंत्र्याचे महत्व माहित आहे का? स्वातंत्र्याचे महत्व तेव्हाच कळते जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील काही काळ हा पारतंत्र्यामध्ये काढलेला असतो. जसे मृत्यू जवळ आला की जीवनाचे महत्व कळते, तसेच जेव्हा पारतंत्र्य म्हणजे किती भयानक असते ते समजल्यावरच स्वातंत्र्याचे महत्त्व न सांगता देखील कळून येते.
आपल्या भारताला देखील अशाच पारतंत्र्या मधून स्वातंत्र्य मिळाले आहे. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास हा अंगावर काटेच आणणारा आहे. भारतीयांची सहनशीलता आणि त्यांचे शौर्य हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीचे महत्त्वाचे घटक राहिले आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किती तरी क्रांतिकारकांनी स्वतःच्या आयुष्याचे बलिदान दिले आहे.
भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे एका रात्रीत नाही तर दीडशे वर्षांचे अत्याचार सहन केल्यानंतर मिळालेले आहे तरीही भारतीयांनी आपला संयम न सोडता परकीय सत्तेला शांतीच्या मार्गाने लढा दिलेला आहे. भारतावर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं. जेव्हा जेव्हा भारतीयांनी एकत्र येऊन हे राज्य उलथून टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा इंग्रजांनी आपल्या सत्तेच्या आणि सामर्थ्याच्या जोरावरती ते चिरडून टाकले. या सत्तेविरुद्ध सर्वात मोठा संघर्ष झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या नेतृत्वाखाली सण 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध लढण्यात आला.
मात्र भारतीयांकडे तेवढी साधनसामग्री आणि संपत्ती नसल्याकारणाने 1857 चा राष्ट्रीय उठाव भारताला जिंकता आला नाही. परिणामी इंग्रजांची पकड भारतावरती अजूनच मजबूत होत गेली. भारताने स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा हा एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा कथानकाचाच आहे किंबहुना त्यावर अनेक चित्रपट निघाले सुद्धा जान मध्ये भारतीयांना झालेला त्रास आणि त्याविरुद्ध त्यांनी केलेला बंड वेळोवेळी चित्रित करण्यात आला आहे.
भारतामध्ये खूप सारे क्रांतिकारक होते. क्रांतिकारकांची विचारसरणी दोन पद्धतींची होती. काही क्रांतिकारी हे जहाल विचारांचे होते. जहाल म्हणजे वेळ पडल्यास शस्त्र हाती घेऊन इंग्रजांना या भारत भूमीवरून हाकलून देण्यासाठी ते तयार होते. त्यासाठी जीवाचे बलिदान करण्यासही ते मागेपुढे पाहत नव्हते. तर काही क्रांतिकारी हे मवाळ विचारसरणीचे होते. मवाळ विचारसरणी म्हणजे शांततामय पद्धतीने स्वातंत्र्य मिळवणे.
मवाळ विचारसरणीने आहे असे चा मार्ग पत्करून स्वातंत्र्य प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठरवले होते. मवाळ विचारसरणीचे प्रमुख होते महात्मा गांधी. तर जहाल विचारसरणीचे प्रमुख होते लोकमान्य टिळक,सुभाष चंद्र बोस हे क्रांतिकारक. इंग्रजांविरुद्ध सत्ता संघर्ष सुरू असताना संपूर्ण भारत एकवटलेला होता तिथे कोणत्याही जाती अथवा धर्माच्या आधारावर भाग विभागला गेलेला नव्हता. काही नवीन क्रांतिकारी तरुण हे त्यांच्या पद्धतीने इंग्रजांना सळो की पळो करून सोडत होते.
शहीद भगतसिंग, राजगुरू सुखदेव हे तरुण क्रांतिकारी अगदी तरुण वयामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून फासावर देखील गेले होते. इंग्रज जेव्हा भारतामध्ये राहत होते तेव्हा त्यांनी बालविवाह, सती प्रथा या कुप्रथा बंद केल्या पण त्यापलिकडे भारतीयांना त्यांनी माणूस म्हणून नाही तर गुलाम म्हणून वागवले. या अन्यायातून चीड येऊन भारतीय अजून पेटून उठले आणि त्यांनी इंग्रजांना “चले जाव “अशी गर्जना केली.
इंग्रजांनी भारतीयांना अनेक प्रकारे लुटले.भारतातील मसाले इंग्रजांनी कमी दरात खरेदी करून ते इंग्लंड ला नेले. पंजाब येथे जेव्हा सर्व शीख बांधव बैसाखी साजरी करण्याकरता जालियनवाला बागेत जमले होते तेव्हा तेथील जनरल डायर याने धोक्याने तेथे जमलेल्या निशस्त्र जमावावर गोळीबार केला. जे लोक आपला जीव मोठे धरून पळत होते अशांना बागेत बाहेर पडता येऊ नये म्हणून बागेचा दरवाजा बंद करण्यात आला.
अशा प्रकारे अगदी क्रूर पणे जनरल डायर याने नरसंहार केला. यातून भारतीय जनता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अजून आक्रमक झाली आणि पेटून उठली. सगळ्या वृत्तपत्रांनी ही जाहिरात केली. त्यामुळे इंग्रज सरकारला नमते घ्यावे लागले. जनरल डायर ला त्याच्या पदावरून पायउतार करण्यात आले. अशा पद्धतीने भारतीयांनी इंग्रजांच्या सत्तेचा विरोध करत स्वातंत्र्याच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली होती.
मात्र इंग्रजांनी देखील सहजासहजी स्वातंत्र्य दिले नाही त्यांनी स्वातंत्र्य देताना भारतात हिंदू आणि मुस्लिम ऐक्य टिकणार नाही अशी सोय केली. त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांमध्ये भडकवण्यास सुरुवात केली. मुस्लिम लीगचे नेते स्वतंत्र देशाची मागणी करू लागले त्यातूनच प्रथम पाकिस्तान या देशाचा उदय झाला. शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
अशा प्रकारे आपण पारतंत्र्यातून मुक्त झालो. आज स्वातंत्र्य मिळून भारताला कित्येक वर्ष झाली आहेत. आपण कायम आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ज्यांनी बलिदान दिले त्या शूरवीरांचे स्मरण ठेवले पाहिजे. आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचा कधीच अवमान होईल अशी वागणूक टाळली पाहिजे.
Independence Day Essay Marathi 10 Lines
- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारतावर जवळजवळ दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केले.
- भारताने इंग्रजांविरुद्ध अहिंसा मार्गाने लढा देत स्वतःचे स्वातंत्र परत मिळवले.
- भारत हा एक वैभवशाली संपन्न देश होता. भारतात अनेक पराक्रमी राजे राज्य करत होते.
- जेव्हा राज्यांचे अधपतन सुरू झाले तेव्हा इंग्रजांनी मध्यस्थी करून हळूहळू भारत देश स्वतःच्या अधिपत्याखाली आणला.
- लोक अज्ञानी होते त्यामुळे आपण पारतंत्र्यात जात आहोत याची भावना निर्माण झाली नव्हती.
- जेव्हा इंग्रज लोक भारतावर अनन्वित छळ करू लागले तेव्हा भारतीय जनतेला स्वातंत्र्याचे महत्त्व उमगले.
- संपूर्ण भारतीय जनता इंग्रजांविरुद्ध एकवटली आणि त्यांनी इंग्रजांना भारतातून निघून जाण्यास सांगितले.
- ठिकठिकाणी चळवळी घडल्या. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या अनमोल जीवाचे बलिदान दिले.
- महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, लोकमान्य टिळक, शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असे अनेक महान क्रांतिकारक भारताला लाभले.
- आपण सर्वांनी या वीरांचे कायम स्मरण ठेवले पाहिजे आणि आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे.
हे पण वाचा: नागपंचमी सणावर मराठी निबंध
आज आम्ही भारतीय स्वातंत्र्य दिनावर निबंध/ १५ ऑगस्ट निबंध मराठी लिहिलेला आहे. तुम्हालाही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आम्हाला अभिप्राय लिहून नक्की कळवा. तुमचा एक अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अशाच वेगवेगळ्या विषयांवर तुम्हाला माहिती किंवा निबंध हवा असल्यास आमच्या लेखांना नक्की भेट द्या. धन्यवाद!