Independence Day Speech In Marathi: १५ ऑगस्ट व स्वातंत्र्य दिन वर भाषण मराठी

15 August Speech Marathi: नमस्कार मंडळी Snehal Talks मध्ये आपले स्वागत आहे. भाषण म्हटले की काही लोकांना फारच तणाव जाणवतो. शालेय जीवनात जेव्हा शिक्षक आपल्याला उभे करून आज तुला अमुक तमुक विषयावर भाषण द्यायचे आहे असे सांगतात तेव्हा बोबडी वळाली नाही असा विद्यार्थी शोधून सापडणार नाही.

भाषण द्यायचे म्हटल्यावर सर्वात सुरुवातीला व्यक्तीला थोडी भीती वाटते. जसे तुम्ही भाषण द्यायला सुरुवात करता तशी तुमची भीड चेपते आणि तुम्ही आत्मविश्वासाने पुढच्या वेळी भाषणाला उभे राहत असता. आजच्या लेखात आपण भारतीय स्वतंत्र दिना वर शालेय विद्यार्थ्यांसाठी भाषणांचा नमुना देणार आहोत. हे भाषण तुम्ही शाळेमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी देऊ शकता, भाषणातील भाषा ही साधी, सरळ आणि सोप्या शब्दांत ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील, जेणेकरून सर्व वयोगटातील व्यक्तींना भाषणाचा अन्वयार्थ समजेल. चला तर मग भाषणाचा हा नमुना वाचायला तयार व्हा.

Independence Day Speech In Marathi

“आद्य वृंद गुरुजन वर्ग, माझे मित्र, मैत्रिणी आणि येथे जमलेल्या तमाम भारतीयांनो, आज मी भारतीय स्वातंत्र्य दिनाबद्दल आपणा सर्वांना मोजक्या भाषेमध्ये माहिती सांगणार आहे, तरी ती तुम्ही शांतचित्ताने ऐकावी आणि त्यावर मनन करावे अशी माझी नम्र विनंती.”

“ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पाणी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी ” या सुमधुर गाण्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यात योगदान असलेल्या शूर वीरांचे वर्णन केले गेले आहे, हे गीत ऐकताना गहिवरून येणार नाही असा भारतीय व्यक्ती आपल्याला शोधून सापडणार नाही.

15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताची निर्मिती झाली. पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती बनले. भारताला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेल्या नाही तर त्यासाठी कितीतरी वीरांनी आपल्या आयुष्याचे बलिदान दिले. भारतीय जनतेने अहिंसा मार्गाने मिळवलेले स्वातंत्र्य इतिहासामध्ये नोंदले गेलेले आहे. महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने अहिंसा मार्ग स्वीकारला होता.

महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी हे आफ्रिकेमध्ये वकिलीचा अभ्यास करत होते. भारतात इंग्रजांचा वाढता अन्याय आणि भारतीयांची होणारी पिळवणूक असह्य होत होती, अशावेळी गांधींनी आफ्रिका सोडून भारतात येणे क्रमप्राप्त समजले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये गांधीजींची भूमिका खूपच महत्त्वपूर्ण होती. महात्मा गांधींनी कायम शांततावादाचा पुरस्कार केला आणि भारतीयांनी स्वातंत्र्य शांतता मार्गाने मिळवावे असे आवाहन संपूर्ण भारतीयांना केले.

दुसरीकडे लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांनी इंग्रजांना त्यांना समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली होती. भारतीयांमध्ये एकजूटता निर्माण व्हावी यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सार्वजनिकरित्या साजरी करण्यास सुरुवात केली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे विचार हे जहाल प्रवृत्तीचे होते मात्र इंग्रजांसाठी तो एक प्रकारे धडाच होता.

अशाप्रकारे जहाल आणि मवाळ विचारसरणीचे लोक वेगवेगळ्या पद्धतीने इंग्रजांना जेरीस आणत होते. डॉक्टर सुभाष चंद्र बोस हे सर्वप्रथम महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये सहभागी झाले होते. मात्र गांधीजींची मवाळ विचारसरणी डॉक्टर सुभाष चंद्र बोस यांना जास्त काळ पटली नाही आणि त्यांनी स्वतःची सेना निर्माण केली.

“तुम मुझे खून दो ,मै तुम्हे आजादी दूंगा”हे डॉक्टर सुभाष चंद्र बोस यांचे उद्गार होते. डॉक्टर सुभाष चंद्र बोस यांचे हे देश प्रेमाचे उद्गार ऐकून कितीतरी तरुण तरुणी त्यांच्या सेनेमध्ये सामील झाले. भारतीयांनी इंग्रजांनी देश सोडून जावा यासाठी “चले जाव” चळवळ चालवली.

इंग्रजांबद्दल भारतीयांचा वाढता रोष आणि इंग्रज अधिकाऱ्यांवर भारतीय क्रांतिकारकांकडून वारंवार होणारे हल्ले यामुळे इंग्रज देखील जेरीस आले होते. शेवटी कष्टाचे फळ मिळाले आणि इंग्रजांनी भारत सोडून जाण्याची तयारी दाखवली.

मात्र सहजासहजी सोडून जातील ते इंग्रज कुठले? इंग्रजांनी जाताना भारतीय एकता अखंडित राहू नये यासाठी हर एक प्रयत्न केले त्यातील एक नीती म्हणजेच, “फोडा आणि राज्य करा “ही नीती. स्वातंत्र्य देताना ही इंग्रजांनी हिंदू मुस्लिम ऐक्य तोडले आणि त्यातूनच त्यांनी हिंदुस्तान से विभाजन करून भारत आणि पाकिस्तान अशा दोन वेगवेगळ्या देशांची निर्मिती केली

आज भारताचे एक सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वजण या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शपथ घेऊया की भारताची अखंडता कायम राहण्यासाठी आपण कायम प्रयत्न करत राहू. भारताच्या एकीमध्ये बाधा आणण्याचे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तो प्रयत्न हाणून पाडण्याचा आपण कायम प्रयत्न करू.

अशा प्रकारे आपण सर्वजण एकजूट राखून आपल्या देशाचा विकास करण्यासाठी कायम तत्पर राहू. हाच विचार आपण सर्वजण संपूर्ण भारतीय जनतेच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करूया.

आपल्या भारतीय स्वातंत्र्य दिना दिवशी एकजूटता हेच ध्येय बाळगून त्याप्रमाणे आचरण करू. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो/संपवते. जय हिंद! जय भारत! जय महाराष्ट्र!

१५ ऑगस्ट १० ओळी भाषण मराठी: Independence Day 10 Line Speech Marathi

“आदरणीय गुरुजन वर्ग, माझे शिक्षक वृंद आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य दिना विषयी जे काही दोन-चार शब्द सांगणार आहेत ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती.”

  1. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले.
  2. भारतावर दीडशे वर्षापेक्षा जास्त काळ इंग्रजांची परीक्षा करत होती.
  3. इंग्रजांनी या संपूर्ण काळामध्ये भारतीयांवर अनन्वित अत्याचार केले.
  4. इंग्रजांनी केलेल्या या अत्याचाराविरुद्ध भारतीय जनता आक्रमक बनली त्यातूनच थोर क्रांतिकारकांचा जन्म झाला.
  5. शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे आद्य क्रांतिकारक इंग्रजांनी त्यांच्या भाषेत समजेल अशा प्रकारे लढा देत होते.
  6. महात्मा गांधी यांचा भारतीय जनमानसावर खूप मोठा पगडा होता त्यातूनच त्यांचा अहिंसावादी दृष्टिकोन भारताला लाभला.
  7. महात्मा गांधी यांनी भारताला अहिंसा मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पुरस्कार केला.
  8. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या जहाल भाषेमध्ये इंग्रजांवर टीका करायला जाणून केली त्यासाठी त्यांनी वृत्तपत्र या माध्यमाची निवड केली.
  9. क्रांतिकारकांच्या या क्रांतिकारी धोरणांमुळे इंग्रजांना भारताला स्वातंत्र्य देणे भाग पडले.
  10. अशाप्रकारे भारताला कितीतरी शूरवीरांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य मिळाले.

आजच्या या लेखामध्ये आम्ही आपणास स्वातंत्र्य दिन या विषयावर भाषण कसे करावे हे कमीत कमी शब्दांमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडला असल्यास आम्हाला अभिप्राय देऊन नक्की कळवा. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. अशीच नवनवीन विषयांवरील भाषणे हवी असल्यास आमच्या साईटला म्हणजेच snehaltalks.com ला नक्की भेट द्या.

 

Leave a Comment