Mahila din Wishes In Marathi: महिला दिन विशेष आज दिनांक 8 मार्च 2026 जागतिक महिला दिन. संयुक्त राष्ट्र संघटनेने स्त्रियांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आणि स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीची आहे हे समजून त्याचा उचित असा संदेश देण्यासाठी दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यास सुरूवात केली.मैत्रिणींनो जागतिक महिला दिन बहुतांशी सर्व देशांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
जागतिक महिला दिन इतिहास
अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये देखील स्त्रियांना अनेक ठिकाणी दुय्यम वागणूक मिळत होती. स्त्रियांना मतदानाचा हक्क देखील नाकारण्यात आला होता तसेच कामाच्या ठिकाणी देखील दुय्यम वागणूक दिली जात होती. प्रगत देशांमध्ये महिलांना ही दुय्यम वागणूक असह्य झाली आणि त्यांनी त्याविरुद्ध बंड पुकारले तो दिवस म्हणजे 8 मार्च 1908.स्त्रियांनी या विषमतेवर रस्त्यांवर उतरून निदर्शने केली आणि यातूनच पुढील काळात स्त्री ची समर्थता जगाला दिसली. या ऐतिहासिक दिवशी सुरू झालेली ही स्त्री शक्तीची नांदी आजही अविरत चालू आहे.
महिला दिन साजरा करण्याच्या पद्धती:आजकाल समाजात झालेल्या जागृती मुळे स्त्रिया या सन्मानाने खाजगी कार्यालयांमध्ये , सरकारी कार्यालयात कार्यरत आहेत. अशा कार्यालयात स्त्रियांचा गौरव या दिवशी केला जातो. घरी देखील तुम्ही तुमच्या आज्जी,आई, बहीण, पत्नी, मुलगी यांना यादिवशी सुंदर अशी भेटवस्तू देऊन त्यांना खुश करू शकता. स्त्रिया फक्त भेटवस्तू ने खुश होतात असे नाही तर निदान आजचा एक दिवस तुम्ही त्यांना कामापासून आराम देऊ शकता.फक्त महिला दिनी नाही तर तुम्ही रोजच्या जीवनात स्त्रियांना आदर आणि सन्मानाने वागणूक दिली तर स्त्रिया आपल्या प्रिय व्यक्तीसाठी काहीही करण्यास सदैव तत्पर असतात.
आज महिला दिनाचे औचित्य साधून तुम्ही तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिकांमध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्री साठी सुंदर आणि प्रेरणादायी असे संदेश पाठवू शकता.आम्ही आपल्यासाठी काही संदेश येथे देऊ केले आहेत ते आजच आपल्या साठी कायम खंबीरपणे उभ्या असणाऱ्या महिलांना नक्की पाठवा.
Women’s Day Status In Marathi
तू आहेस एक शक्ती,ओळख स्वतःची क्षमता कधी हार मानू नकोस तुझ्यात नाही कुठली कमतरता कस तुझी कंबर, आणि हो लढायला तयार स्त्री आहेस तू, जणू शिवबाची तलवार जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Womens Day Quotes In Marathi
नाही ती अबला नाही ती अजाण ती म्हणजे साक्षात महाशक्ती तिच्याशिवाय सृष्टी देखील अपूर्ण जगतामध्ये तिच्या इतके नाही कुणी परिपूर्ण महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Women’s Day Shubhechha In Marathi
माझ्या नशिबी तू म्हणजे जणू दुधावरची साई महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या आई Happy Women’s Day
Mahila Din Status In Marathi
जाई, जुई,चंपा अबोली बागेमध्ये डुलतात ही सारी फुले,महिला दिनी आदरणीय शिक्षिकांना शुभेच्छा देती मुले.महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
Mahila Din Shubhechha In Marathi
जिजाऊ सारखी धैर्यवान आणि ताराराणी सारखी शौर्यवान प्रत्येक महिला आहे जन्मतः बलवान सर्व महिलांना जागतिक महिला दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा
Women’s Day Suvichar In Marathi
घराच्या चार भिंती ओलांडून, गगनभरारी घेणारी स्त्री म्हणजे घरासाठी एक वरदान आहे. आज या स्त्रियांमुळेच प्रत्येक घर सुजाण आहे.जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Jagtik Mahila Din Shubhechha Marathi
सावित्री म्हणजे स्त्री शिक्षणाची क्रांती यांच्या मुळेच आहे सर्वत्र पसरली महिलांची कीर्ती Happy Women’s Day to All
जागतिक महिला दिन शुभेच्छा
सरस्वतीचे रूप तू, बुद्धीची तू खाण शिक्षणाने साध्य करते तू समाजाचे कल्याण जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
महिला दिन मराठी स्टेटस
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हणतात, पण प्रत्येक यशस्वी स्त्री मागे तिची धैर्यवान आई असते अशा माझ्या प्रेमळ आईस महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जागतिक महिला दिन संदेश मराठी
बाहुली प्रमाणे जपलेली माझी प्रिय लेक आज गगनाला गवसणी घालत आहे, अशा माझ्या ध्येयवेड्या लेकीला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माता तूच,सखी तूच,तुझ्याशी मनाचे हितगुज उत्तरोत्तर वाढत जावे हे प्रेमाचे बंध जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई
महिला दिनानिमित्त मराठी स्टेटस
प्रिय सखी, आजवर समाजमान्यता झुगारुन तुझे तयार केलेले विश्व मी पाहिले आहे, मी अनुभवल्या आहेत तुझ्या मनातील वेदना, मी पाहिले आहेत तुझ्या डोळ्यांमधून कधी न वाहिलेले अश्रू.. सार्थक केले आहेस तू ऋण तुझ्या माय बापांचे..खरं सांगू तू आहेस रागिणी जीवनाच्या कुरुक्षेत्रामधील , जिथे अर्जुन ही तूच आणि माधव ही तूच…जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सखी.
महिला दिन मराठी फोटो
कधी आई, कधी ताई कधी असते अनाथांची माई कामाची तिला सदैव घाई अविरत कार्यरत असलेल्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महिला दिन शुभेच्छा २०२६
सावित्रीच्या लेकी आम्ही, जिजाऊंची प्रतिष्ठा झुकणार नाही, लढणार आम्ही हीच आमची प्रतिज्ञा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Womens Day Wishes In Marathi
आकाशाला भेदणारी सुनीता विल्यम्स हो,समाजाला घडवणारी तू सावित्री हो,तू हो उदयाची अनाथांची सिंधुमाय देवाजवळ करते प्रार्थना तुझी ही माय Happy Women’s Day My Lady
आम्हाला आशा आहे की ही महिला दिन शुभेच्छा, संदेश, स्टेटस, शायरी, फोटो, कोट्स मराठीमध्ये/ Women’s Day Wishes, Images, Quotes, Status, Message, SMS In Marathi for Whatsapp, Instagram, Facebook,Sharechat हा शुभेच्छा संग्रह तुम्हाला नक्की आवडला असेल, धन्यवाद