Ganeshotsav Essay In Marathi: हिंदू संस्कृतीचे आराध्य दैवत म्हणजे श्री गणेश आहेत. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते. श्री गणेशोत्सव सार्वजनिक रित्या मोठ्या प्रमाणात भारतात साजरा होतो.आज आम्ही आपल्या सर्वांसाठी माझा आवडता सण -गणेशोत्सव या विषयावर 100 ते 500 शब्दांमध्ये निबंध सादर करत आहोत. आपण हा निबंध आपल्या मुलांच्या शालेय पाठ्यक्रमामध्ये वापरू शकता. हा निबंध समजावा अशा पद्धतीने सोप्या शब्दांमध्ये लिहिण्यात आलेला आहे.
Ganesh Festival Essay In Marathi
“वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ,
निर्वीघ्नम कुरुमे देव, सर्वकार्येषु सर्वदा”
श्री गणेशाच्या नमनाने सर्व कार्यांची सुरुवात केली जाते. कुठलीही पूजा करण्याआधी जर श्री गणेशाचे स्मरण केले गेले तर ते कार्य तडीस जाते अशी श्रद्धा आपण एक हिंदू म्हणून कायम बाळगतो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतामध्ये एकता निर्माण राहावी, एकजूट कायम राहावी याकरता गणेशोत्सव हा सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्यास सुरुवात केली.
गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे घरी आगमन होते आणि घर हर्ष उल्हास आणि भरून जाते. श्री गणेशाच्या आवडीचा नैवेद्य आई बनवते. श्री गणेशाचे आवडीचे पदार्थ म्हणजे मोदक. गणेशोत्सवामध्ये घरोघरी गणपतीचे आगमन झाल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री गणेशाची आरती करून श्री गणेशाला प्रसन्न केले जाते.
श्री गणेशाचे स्त्रोत पठण केले जातात. अशा मंत्रमुग्ध वातावरणामध्ये मन तल्लीन होऊन जाते. श्री गणेशांविषयी अनेक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे.श्री गणेश हे देवी पार्वती आणि महादेव यांचे पुत्र होय. श्री गणेश यांचे मोठे बंधू म्हणजे श्री कार्तिक स्वामी आहेत. एकदा श्री शंकर आणि पार्वती यांनी आपल्या दोन्ही मुलांची परीक्षा घेण्याचे ठरवले.
त्यांनी दोन्ही मुलांना पृथ्वीला तीन प्रदक्षिणा घालून येण्यास सांगितले. जो सर्वप्रथम पृथ्वीला तीन प्रदक्षिणा घालून येईल तो गणांचा अधिपती होईल असे त्यांनी सांगितले. भगवान श्री कार्तिक स्वामी यांचे वाहन मोर होते तर श्री गणेशांचे वाहन उंदीर होते. मोर हे आपले वाहन असल्याकारणाने कार्तिक स्वामींना गर्व झाला आणि त्यांना वाटले की ते सहजच श्री गणेशांना हरवू शकतात.
हे दिलेले आव्हान स्वीकारून कार्तिक स्वामी त्यांचे वाहन असलेल्या मोरावर विराजमान होऊन पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा करण्यासाठी निघून गेले. श्री गणेशा बुद्धीने अत्यंत तल्लख होते. श्री गणेश आपल्या भावाप्रमाणे पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले नाहीत. श्री गणेशांनी पूजेचे साहित्य घेतले त्यामध्ये फुले घेतली.
श्री गणेशांनी कैलास पर्वतावर बसलेल्या आपल्या आई-वडिलांना म्हणजेच शंकर आणि पार्वती यांना तीन प्रदक्षिणा घातल्या. जेव्हा कार्तिक स्वामी तिन्ही लोकांची प्रदक्षिणा घालून परत आले तेव्हा त्यांना तिथे श्री गणेश दिसले. कार्तिक स्वामींना वाटले की श्री गणेश हे आव्हान पूर्ण करू शकले नाहीत. कार्तिक स्वामींना वाटले की या आव्हानांमध्ये त्यांचा विजय झाला.
तेव्हा तिथे नारायण नारायण म्हणत नारद मुनी आले आणि त्यांनी घडलेला संपूर्ण वृत्तांत कार्तिक स्वामींना सांगितला. तो ऐकल्यावर कार्तिक स्वामींना देखील श्री गणेशाच्या बुद्धिमत्तेची चुणूक दिसून गेली. अशाप्रकारे श्री गणेश हे गणांचे अधिपती झाले. श्री गणेशांचे हे बाल रूप सर्वांना मोहित करणारे आहे. श्री गणेशा मध्ये अपार बुद्धिमत्ता तर आहे.
श्री गणेशाचे मोठे उदर हे सर्व प्रकारचा राग पोटात घालून घेण्याचे प्रतीकच आहे. श्री गणेशा यांचे मोठे काम एकाग्रतेने ऐकावे यांचे प्रतीक आहेत. श्री गणेशाचे मुख हे हत्तीचे आहे आणि ते उत्तम बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. श्री गणेशांची सोंड कोणतीही गोष्ट चांगली अथवा वाईट सहजपणे स्वीकार करणे याचे प्रतीक आहे.
चांगली गोष्ट ठेवणे आणि वाईट असलेली गोष्ट सोडून देणे हे एकदंता चे प्रतीक आहे. अशा प्रकारे श्री गणेशाचे मनमोहक रूप आपल्याला काय ज्ञान घ्यावे, कसे वागावे हे शिकवते. भारतामध्ये श्री गणेशोत्सव साजरा करताना अनेक मान्यता आहेत. जसे की असे मानले जाते की श्री गणेश हे काही काळासाठी सुट्टी घेऊन आपल्या भक्त जणांना भेटण्यासाठी पृथ्वीतलावर येतात.
अशावेळी गणपती बाप्पांना आवडणारे मोदक बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी उंदीर बीज साजरी होते ज्यामध्ये श्री गणेशांचे वाहन असलेल्या उंदरासाठी देखील कडधान्यांचा नैवेद्य बनवला जातो. श्री गणेशांचे आगमन झाल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये गौराई देखील घरी येतात. घरी येणाऱ्या गौराई या माहेरवासिनी चे प्रतीक असतात.
गौराई माहेरी येते तर तिला सुंदर साडी नेसवली जाते . गौराई साठी पंचपक्वान्न घरोघरी तयार केली जातात. “बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला” असे म्हणण्यात कितीतरी सासरवासी स्त्रिया माहेरी जातात. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून माहेरी काही काळा पुरता आराम मिळावा म्हणून कदाचित ही प्रथा चालू झाली असेल असे म्हणण्यास हरकत नाही.
महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने पुणे , मुंबई अशा शहरांमध्ये गणेशोत्सव अगदी जोरात साजरा होतो. पुण्यामध्ये मानाचे पाच गणपती आहेत. या पाच ठिकाणे परंपरेनुसार गणेशोत्सव साजरा केला जातो तसेच देखावे सादर करून लोकांना उपदेश दिला जातो.
अशा पद्धतीने गणेशोत्सव हा हर्ष आणि उल्हासाने साजरा होतो. सार्वजनिक ठिकाणी श्री गणेशोत्सवामध्ये पारंपारिक देखावे उभारले जातात. काही सार्वजनिक ठिकाणी समाज प्रबोधनासाठी देखावे साकारले जातात.
समाज प्रबोधन होऊन समाजाचा विकास व्हावा हा सार्वजनिक गणेशोत्सव मागचा मूळ हेतू आहे. आपण सर्वांनी देखील गणेशोत्सव आणि ही परंपरा कायम टिकून राहावी यासाठी पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत.
गणेशोत्सव मराठी निबंध १० ओळी
- गणेशोत्सव हा सण भारतामधील विविध राज्यांमध्ये मोठ्या उल्हासाने साजरा केला जातो.
- महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात श्री गणेशोत्सव साजरा होतो.
- सर्व जनता एकत्र यावी आणि लोकांमध्ये एकजूटता निर्माण व्हावी यासाठी बाळ गंगाधर टिळकांनी श्री गणेशोत्सव सार्वजनिक रित्या साजरा करण्यास सुरुवात केली होती.
- श्री गणेश हे संपूर्ण जनतेचे आराध्य दैवत आहेत त्यांचे बालरूपातील देखणे रूप सर्वांनाच मोहित करत असते.
- श्री गणेश हे गणांचे अधिपती आणि 64 कलांचे देवता आहेत.
- कोणत्याही गोष्टीचा आरंभ करण्याआधी श्री गणेशाचे स्मरण केले जाते त्यामुळे कोणतेही कार्य निर्वीघ्नपणे पार पडते असा मानस जनसमुदायांमध्ये कायम आहे.
- अनेक सार्वजनिक संस्था अथवा सार्वजनिक मंडळ श्री गणेश चतुर्थी मध्ये देखावे सादर करतात ज्या द्वारे ते लोकांना म्हणजे जनतेला चांगले उपदेश करतात.
- अनेक सार्वजनिक मंडळी जिवंत देखावे देखील साजरे करतात यामध्ये प्रामुख्याने शिवाजी महाराजांच्या जीवनकालातील काही घटनांचा उल्लेख आढळतो ज्यामुळे लोकांना इतिहास समजण्यास देखील मदत होत राहते.
- गणेश उत्सव हा सण लोकांना एकत्र आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.
- भारतीय परंपरेमध्ये श्री गणेशाचे अनन्य साधारण महत्व आहे आणि आपण कुठेही जाऊ त्या ठिकाणी श्री गणेशाच्या नावानेच सुरुवात करून कार्याचा शुभारंभ करण्याची पद्धत भारतीय संस्कृतीने अवलंबिली आहे.
घराघरांमध्ये, गावांमध्ये आणि शहरांमध्ये साजरा होणारा गणेशोत्सव यावर मराठी निबंध आपण पाहिला. आपणाला हा निबंध आवडला असल्यास आम्हाला आपला अभिप्राय नक्की कळवा. आपला अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.
अशाच वेगवेगळ्या सणांविषयी आपणास माहिती हवी असल्यास आमच्या साईटला नक्की भेट द्या .धन्यवाद!