Gudi Padwa Wishes In Marathi: गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 2026

Gudi Padwa Shubhechha Marathi: गुढीपाडवा म्हणजे हर्ष आणि उल्हासाचा दिवस. गुढीपाडवा या दिवशी भगवान श्री राम हे १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येमध्ये दाखल झाले होते. गुढीपाडवा हा दिवस म्हणूनच विजयाची आणि आनंदाची गुढी उभारून साजरा केला जातो. गुढीपाडवा या दिवशी लोक कडूलिंब आणि साखर अथवा गुळ एकत्र करून खातात. यामागे गहन असा अर्थ दडलेला आहे. माणसाच्या आयुष्यात येणारे कडू आणि गोड क्षण यांनीच जीवन चालू असते त्यामुळे हे दोन्ही क्षण आपण स्वीकारले पाहिजे हा संदेश यामागे असतो.

आज दिनांक 19 मार्च 2026 रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने आम्ही आपल्या सर्वांसाठी काही सुंदर लिखाण सादर केले आहे. गुढीपाडवा या दिवशी आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देऊन नवीन वर्षाची सुरूवात आपण केली पाहिजे. आपल्या प्रियजनासाठी आम्ही  Gudi Padwa Status In Marathi, गुढी पाडवा संदेश मराठी यांचा खजिना इथे देऊ केला आहे. चला तर मग हा शुभेच्छारुपी खजिना लुटायला तयार आहात ना?

Gudi Padwa Wishes In Marathi

नक्षीदार पाट, त्यावर गुढीचा थाट
सुबक अशी गुढी, त्याला साखरेची गाठ
तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि
हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

फाल्गुन महिना सरला, चैत्राची आली स्वारी,
घेऊन सुखाची लयलूट, गुढीपाडवा आला दारी.
आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि
हिंदु नववर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

Gudi Padwa Quotes In Marathi

कुणी रेखिते सुंदर रांगोळी,
कुणी लावते दिव्यामध्ये वात
आला गुढीपाडवा घेऊन सर्वांसाठी
एक नवीन सुरुवात
हा गुढीपाडवा आपणा सर्वांसाठी
आनंदाचा आणि भरभराटीचा जावो
या लक्ष लक्ष शुभेच्छा.

गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात
तुमच्या आयुष्यात देखील व्हावी आनंदाची बरसात
गुढीपाडवा आणि हिंदु
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Gudi Padwa Message In Marathi

प्रभू रामचंद्र आले अयोध्येला
साजरा करूया गुढीपाडवा ,
आनंद झाला जनतेला
आपणा सर्वांना गुढीपाडवा
सणाच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन वर्ष आले घेऊन नवी पहाट,
त्यासोबत आनंदाची नवी वाट.
तुमच्या आयुष्यात सदैव उंच राहो सुख, समृद्धी आणि यशाची गुढी .
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa Shubhechha In Marathi

उभारून आशेची गुढी, नवीन स्वप्नांना देऊया आकार
ही स्वप्ने साकारायला प्रत्यक्ष मदत करेल ओमकार
गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

सुगंध येवो यशाचा,
झुळूक यावी आनंदाची
अशी प्रार्थना आहे श्री चरणांशी
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
गुढीपाडवा सणाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

गोड आठवणींनी करूया नववर्षाची सुरुवात
त्यासोबत खाऊया कडुलिंब आणि गुळाचा कडू गोड मेवा
तुम्हा सर्वांना येणारा
गुढीपाडवा आणि नवीन वर्ष आनंदाचे
आणि भरभराटीचे जावे हीच हार्दिक शुभेच्छा.

गुढीपाडवा आला घेऊन दारी यशाची भरभराट
घरभर सुटला आहे पुरणपोळीचा घमघमाट
तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष
आणि गुढीपाडवा सुखाचा
आणि समृद्धीचा जावा या शुभेच्छा

गुढी पाडवा शुभेच्छा 2026

विजयाचा उत्सव साजरा करूया
अपयश आले तरी यशासाठी पुन्हा लढूया
सर्वजण मिळून हिंदू नववर्ष आणि
गुढीपाडवा मोठ्या आनंदाने आणि
उत्साहाने साजरा करूया
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

आनंदाची गुढी उभारली दारी
माप ओलांडून लक्ष्मी आली सर्वांच्या घरी
हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा
यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

गुढी पाडवा संदेश मराठी

हिरवी हिरवी गुढी त्यावर सजला कलश
कलशाला घातला पेहराव नवा
त्यावर सजवली साखरेची गाठी
सोबतीला आहे चाफा
हिंदू नववर्ष आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरूवात
सोबत गुढी आणि प्रेमाची बरसात
सर्वांना गुढीपाडवा आणि
हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

गुढी पाडवा मराठी स्टेटस

नवीन वर्ष आणि नवीन साज
त्यासोबत एक नवीन गाज
तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि
हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

आम्हाला आशा आहे की गुढी पाडवा स्टेटस, संदेश, शुभेच्छा, फोटो इन मराठी/ Gudi Padwa Sms, Photo, In Marathi हा मराठी शुभेच्छा संग्रह नक्कीच आवडला असेल, धन्यवाद

Leave a Comment