Cinema Cha Samajavr Prabhav Marathi Speech: मित्रांनो आज आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दिन .आज आपण सर्वजण त्याचे औचित्य साधून एकत्र जमले आहोत. येथे उपस्थित सर्व मान्यवर, चित्रपटांमधून स्वतःची कला सादर करणारे सर्व कलाकार आणि भविष्यात या चंदेरी दुनियेत पदार्पण करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्व नव तरुण तरुणी यांना माझा नमस्कार .
आज आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रम पाहिले त्यांचा आस्वाद घेतला त्याचबरोबर सिनेमाचा समाजावर काय प्रभाव होतो तेही आज थोडक्यात जाणून घेऊया. सिनेमा हे समाजाचे प्रतिबिंब मानले जाते. समाजात ज्या घटना घडतात त्या दृश्य स्वरूपात सादर करण्याचे काम सिनेमा अथवा चित्रपट करत असतो.
सिनेमामधून करमणूक तर होतेच मात्र सिनेमाचा मूळ उद्देश हा जनजागृती करणे, समाजाला अभिव्यक्त करणे हा आहे. सिनेमा हा समाज मनाचा आरसा आहे. भारतामध्ये 1913 पासून सिनेमाचा काळ सुरू झाला. दादासाहेब फाळके यांनी सर्वप्रथम राजा हरिश्चंद्र हा चित्रपट साकारला. हा एक मूक चित्रपट होता पुढे 1931 पर्यंत मूक चित्रपटांचा काळ होता.
चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणे आणि लोकांना त्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या यांची ओळख देण्यात येते.आज भारतामध्ये विविध प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट तयार होतात. काही चित्रपट हे सामाजिक संदेश देतात तर काही आजच्या काळामध्ये बेफाम झालेल्या तरुण पिढीचे दर्शन घडवतात.
अनेक चित्रपट हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बनवले जातात तर काही चित्रपट हे समाजाचे वास्तववादी चित्रण दाखवतात.थ्री इडियट हा चित्रपट सर्वांनी पाहिला असेलच. या सिनेमाचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे. शिक्षण कसे असले पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःचे असे अंगीभूत काही कलागुण असतात ज्यांना वाव दिला पाहिजे हे या सिनेमाने सर्वांना शिकवले. या सिनेमाच्या माध्यमातून समाजाने शालेय शिक्षणापलीकडे जाऊन इतर गोष्टींकडे ही करिअर म्हणून पहायला सुरुवात केली.
लगान, बॉर्डर, मंगलसिंग पांडे, क्रांती हे देशभक्तीपर चित्रपट आपल्याला भारत भूमीच्या संरक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या वीरांची कथा सांगतात. असे चित्रपट आपल्यातील देशभक्ती जागृत ठेवण्याचे काम करतात जे देशासाठी अत्यंत हितकारक आहे.काही चित्रपट हे मानवी हितसंबंधांवर भाष्य करतात. काही सिनेमांमध्ये आपल्याला एकत्र कुटुंबपद्धती आणि त्यामधील विभिन्न मानवी स्वभाव यांचे दर्शन घडते. मानवी भावभावना आणि त्याची गुंतागुंत याचे चित्रण अशा चित्रपटात दिसते.
आजच्या काळात संयुक्त कुटुंबपद्धतीचे देखील दर्शन केले जाते मात्र त्यात असणाऱ्या आधुनिक समस्या देखील अधोरेखित केल्या जातात.काही चित्रपट हे घटस्फोट आणि नको असलेल्या नात्यांमध्ये घुसमट सहन करत जीवन व्यतीत करणाऱ्या व्यक्तींची कहाणी सांगतात जसे की कभी अलविदा ना कहना हा चित्रपट. अनेक प्रेक्षकांना हे चित्रपट म्हणजे स्वतःच्या जीवनाचा आरसा वाटतात.काही चित्रपट हे माणसाच्या संघर्षाची कहाणी सांगतात.
एम एस धोनी हा चित्रपट क्रिकेटपटू धोनी याच्या जीवनावर आधारित आहे. एक तिकीट कलेक्टर आपल्या जिद्दीने आणि हुशारीने भारत देशाच्या क्रिकेट टीम चा कर्णधार बनतो त्याचप्रमाणे देशाला आजवरच्या सर्व प्रकारातल्या सामन्यांमध्ये विजयी चषक मिळवून देतो ही अभिमानास्पद बाब पाहताना आपला देखील ऊर भरून येतो.
चित्रपट क्षेत्र आज वर्षाला सुमारे 2500 पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती करत आहे. या क्षेत्रात काम करणारे अभिनेते तसेच अभिनेत्री बक्कळ पैसा कमवतात मात्र त्याचबरोबर त्यांचा एक प्रचंड मोठा चाहता वर्ग देखील आहे. या सिने अभिनेत्याना पाहण्यासाठी लोक स्वतःच्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत.एक जागरूक अभिनेता अथवा अभिनेत्री यांनी कायम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ते जसे वागतात तसेच अनुकरण करणारा त्यांचा एक चाहता वर्ग आहे म्हणूनच कोणत्याही चुकीच्या गोष्टींची जाहिरात करणे त्यांनी टाळले पाहिजे.
आरोग्याला हानिकारक असणारे घटक जसे की गुटखा, सिगारेट, दारू यांच्या जाहिराती करणे टाळले पाहिजे. सिनेमासृष्टीमध्ये वाढत चाललेले नेपोटिझम आज काल प्रेक्षकांना देखील समजत आहे. सिनेमासृष्टीमधील हा वशिलेबाजी पणा प्रेक्षकांना देखील आवडलेला नाही. भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये बॉलीवूड कडे प्रामुख्याने प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली आढळते.
10 ओळींमध्ये चित्रपटांचा समाजावर वाढता प्रभाव :भाषण
- भारतामध्ये सिनेमाची सुरुवात ही दादासाहेब फाळके यांनी केले.
- दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला मुक चित्रपट तयार केला.
- भारतामध्ये चित्रपट हे समाजमनाचा आरसा असल्याप्रमाणे काम करत.
- चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य केले जात असे.
- सुरुवातीचे चित्रपट हे देशभक्तीपर होते . हळूहळू चित्रपट हे कौटुंबिक होत गेले.
- भारतातील सुरुवातीचे कौटुंबिक चित्रपट हे एकत्र कुटुंब पद्धती तसेच मनमिळाऊ पणा आणि त्या यांचा पुरस्कार करणारे होते.
- पुढे काळानुरूप लोकांना भासणार्या वैयक्तिक समस्या आणि समाजाचे विकृतीकरण यावर चित्रपट बनवले गेले.
- आजच्या काळामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती तसेच भावना शून्य व्यवहार आणि शारीरिक आकर्षण यांवर आधारित चित्रपट बनवले जातात.
- चित्रपटांचा दर्जा खालावला गेल्यामुळे आज काल नागरिक सिनेमा पाहायला पसंती देत नाहीत.
- सिनेमासृष्टी मध्ये असलेली वशिलेबाजी पद्धत आता सर्व जगासमोर उघडी पडली असल्या कारणाने सिनेमाकडे बहुतांश प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली आढळते.
भारतामध्ये चित्रपटाची सुरुवात कोणी केली?
भारतामध्ये चित्रपटाची सुरुवात दादासाहेब फाळके यांनी केली.
भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला चित्रपट कोणता?
राजा हरिश्चंद्र हा भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला चित्रपट होय.
सिनेमाचा मूळ उद्देश काय आहे?
सामाजिक संदेश देणे आणि लोकांना त्यांचे हक्क व जबाबदाऱ्या यांची जाणीव करून देणे हा सिनेमाचा मूळ उद्देश आहे.