CLOSE AD

Suryachi Atmakatha Essay In Marathi: सूर्या ची आत्मकथा मराठी निबंध

Surya Chi Aatmakatha Marathi Nibandh: माझ्या प्रिय मानवांनो, मी सूर्य बोलतोय. अरे असे घाबरून जाऊ नका. मी खरेच तुमच्याशी बोलत आहे. तुम्ही माझी लेकरे आहात. तुमच्यापैकी कितीतरी जण मला रोज न चुकता अर्घ्य देता.

मला तुम्ही तुमची देवता मानता. तुम्ही माझी प्रिय मुले आहात.माझी अनेक नावे आहेत तुम्हाला तर ती ठाऊकच आहेत. भास्कर, दिनकर, रवी अशी एक ना अनेक नावे आहेत.

तुम्ही रोज सकाळी जेव्हा माझ्यासमोर सूर्यनमस्कार घालता तेव्हा तुम्ही सर्व जण आरोग्यदायी व्हा अशाच शुभाशिर्वाद मी देत असतो.

बाळांनो तुम्ही माझ्या जवळ येऊ शकत नाही कारण मी आगीचा एक तप्त गोळा आहे. तुम्ही ज्या सूर्यमालिकेचा भाग आहात त्यामधील नव्याण्णव टक्के वस्तुमान हे माझे एकट्याचे आहे.

माझे शरीर हे हायड्रोजन आणि हेलियम या वायूंनी तयार झालेले आहे.माझ्या शरीरावर जे डाग तयार झाले आहेत त्यांना सौरडाग असे म्हणतात. मी जवळजवळ चारशे साठ कोटी वर्षे वयाचा आहे. मी एक तारा आहे.

माझ्या सौरमालिकेमध्ये अनेक ग्रह आहेत. त्यापैकी पृथ्वी या ग्रहावर सजीव सृष्टी अस्तित्वात आहे.माझी अगणित ऊर्जा सूर्यकिरणांमध्ये रूपांतरित होते.

माझी ही किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचतात कारण माझ्या प्रकाशाचा वेग हा तुमच्या पेट्रोल अथवा डिझेल घालून चालणाऱ्या गाडीपेक्षा कितीतरी पट जास्त आहे.माझी सूर्यकिरणे प्रकाशाच्या रूपात पृथ्वीवर पोहोचतात.

पृथ्वीवरील वनस्पती या किरणांचा वापर करून प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात. यामधून वनस्पती, झाडे यांची वाढ होते. तसेच या वनस्पती वर अवलंबून असणारे शाकाहारी आणि मांसाहारी जीव जीवन जगतात.

पृथ्वीवरील अन्नसाखळीमध्ये माझे महत्वपूर्ण योगदान आहे.तुम्ही सर्वजण जेव्हा प्रकाश होतो तेव्हा सूर्य उगवला असे म्हणता आणि जेव्हा अंधार पडतो तेव्हा सूर्य मावळला असे म्हणता. प्रत्यक्षात मी कुठेच उगवत अथवा मावळत नाही.

मी तारा असल्याकारणाने इतर ग्रह माझ्या भोवती फिरतात त्याचप्रमाणे पृथ्वी हा ग्रह माझ्याभोवती फिरतो. पृथ्वीच्या माझ्या भोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होत असतात.जेव्हा मी सकाळी तुम्हा सर्वांना दिसतो तेव्हा तुम्ही तुमचा दिवसाची सुरूवात करता. सूर्यदर्शन झाले की सर्वजण आपापल्या कामांना लागतात.

दिवसभर शेतात अथवा कामाच्या ठिकाणी जाऊन आपला दिवस सत्कारणी लावता.शेतात जेव्हा माझे कडाक्याचे ऊन तुम्हाला असह्य होते तेव्हा तुम्ही मला अक्षरशः वैतागता आणि सावली कधी येईल याची वाट पाहत असते.

खर सांगू का तर तुम्हाला देखील असे त्रासात बघणे मला सहन होत नाही.जेव्हा उन्हाळा ऋतू असतो तेव्हा मी तुम्हां सर्वांना नकोसा देखील होतो यात तुमची कोणतीही चूक नाही माझी किरणे ही मानवी त्वचेसाठी नुकसानदायक देखील आहेत.

जर तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हात माझी किरणे स्वतःच्या अंगावर घेतली तर तुमच्या शरीराला ‘ ड ‘ जीवनसत्त्व मिळते जे तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.पावसाळा ऋतू मध्ये मात्र तुम्ही सर्वजण माझी चातका प्रमाणे वाट पाहत असता.

जेव्हा मी ढगांमध्ये गायब असतो तेव्हा सर्व जण मी बाहेर कधी येतो याची वाट पाहत असतात.पावसाळ्यामध्ये कपडे लवकर वाळवण्यासाठी माझी वाट पाहिली जाते. घरातील धान्य वाळवणे या करता तुम्हा सर्वांना माझी आवश्यकता असते.

थंडीच्या दिवसात तर माझे ऊन अंगावर घेण्यासाठी तुम्हा सर्वांची झुंबड उडते. हिवाळा आणि पावसाळा हे दोन ऋतू खऱ्या अर्थाने माझे मानवी जीवनातील महत्व अधोरेखित करतात.पौराणिक हिंदू कथांमध्ये माझा कायम उल्लेख आढळतो. हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक अध्यात्माला शास्त्राची जोड आहे.

भगवान हनुमान हे लहान असताना मला एक फळ समजले होते. त्यांना अत्यंत भूक लागली होती तेव्हा त्यांनी मला फळ समजून माझ्याकडे झेप घेतली आणि मला गिळंकृत केले पण त्यावेळी भगवान इंद्राने आपल्या वज्राने हनुमान देवाला मूर्च्छित केले. मूर्च्छित झाल्यामुळे भगवान हनुमान यांच्या मुखातून माझी सुटका झाली नाही तर आता दुनिया पूर्णच वेगळी आणि अंधकारमय झाली असती.

माझे तुम्हा समस्त मानवजातीला एकच सांगणे आहे की ज्याप्रमाणे तुम्ही इथे गुण्यागोविंदाने नांदता तोच अधिकार येथील इतर सजीवांना आहे म्हणूनच जगा आणि जगू द्या हा नियम लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आचरण करा.

10 Lines Essay Suryachi Aatmkatha

  1. मी सूर्य आहे, संपूर्ण सौरमालिकेचा केंद्रबिंदू आणि ऊर्जेचा स्रोत आहे.
  2. भास्कर, रवी, दिनकर अशी माझी अनेक नावे आहेत.
  3. माझ्या किरणांमुळे पृथ्वीवर जीवन शक्य झाले आहे.
  4. वनस्पती माझ्या प्रकाशाने अन्न तयार करतात.
  5. माझ्यामुळे संपूर्ण अन्नसाखळी चालते.
  6. मी तारा असून पृथ्वी माझ्याभोवती फिरते.
  7. पृथ्वीच्या गतीमुळे दिवस आणि रात्र होतात.
  8. माझ्याकडून मिळणारे सकाळचे कोवळे ऊन मानवासाठी आरोग्यदायी असते.
  9. ऋतूचक्रात माझे महत्व अनन्यसाधारण आहे.
  10. सर्व ऋतुंमध्ये माझी महत्वपूर्ण भूमिका आहे म्हणूनच मला मानव देव मानतो आणि पूजतो.

सूर्याला देव का मानले जाते?

सूर्य जीवनाचा स्रोत आहे, तो प्रकाश, उष्णता आणि ऊर्जा देतो म्हणून त्याला देव मानले जाते.

सूर्य तारा आहे का ग्रह?

सूर्य हा एक तारा आहे, ग्रह नाही.

सूर्यामुळे पृथ्वीवर जीवन कसे टिकते?

सूर्यकिरणांमुळे प्रकाशसंश्लेषण होते आणि अन्नसाखळी चालते.

सूर्य उगवतो आणि मावळतो का?

नाही, प्रत्यक्षात पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यामुळे असे भासते.

सूर्यकिरणांचे मानवासाठी फायदे कोणते?

सकाळच्या उन्हामुळे ‘ड’ जीवनसत्त्व मिळते जे आरोग्यास उपयुक्त आहे.

Leave a Comment