Bhartatil Sanskrutik Vividhata Speech In Marathi: भारतातील सांस्कृतिक विविधता भाषण मराठी

Speech In Marathi On India’s Cultural Diversity: व्यासपीठावरील मान्यवर,आदरणीय गुरुजन वर्ग, आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींना आज आपण सांस्कृतिक दिवस साजरा करण्यासाठी सर्वजण एकत्र आलेलो आहोत . भारताला अत्युच्च अशी सांस्कृतिक विविधता लाभलेली आहे. या सांस्कृतिक विविधतेमुळे भारताची ओळख जगभरात पोहोचलेली आहे. आज मी माझ्या भाषणामध्ये भारतीय संस्कृतीतील विविधता आणि भारताचे त्यामुळे निर्माण झालेले जागतिक महत्त्व या विषयावर भाषण सादर करणार आहे तरी तुम्ही सर्वांनी ते शांतचत्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती.

भारताला भौगोलिक विविधता लाभलेली आहे. भारताला समुद्रकिनारे लाभले आहेत त्याचप्रमाणे उत्तुंग अशी पर्वतरांग लाभलेली आहे. भारताचा काही भाग हा हिरवाई आहे तर दुसरा भाग हा पूर्णपणे वाळवंटात आहे. भारताला ज्याप्रमाणे भौगोलिक विविधता लाभलेली आहे तशीच सांस्कृतिक विविधता देखील लाभलेली आहे.

भारत हे एक सांघिक राष्ट्र आहे. भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक आढळतात. भारताचे लोक हे त्यांच्या भौगोलिक विविधतेमध्ये विभागले गेलेले आहेत. प्रत्येक भौगोलिक प्रदेशानुसार विविध राज्यांमध्ये भारताची विभागणी झालेली आहे. भारतातील प्रत्येक राज्यामध्ये प्रादेशिक बोली आढळते. महाराष्ट्र मध्ये मराठी भाषा बोलणारे लोक आढळतात तर पंजाबमध्ये पंजाबी बोली बोलणारे.

भारतातील प्रत्येक राज्यामध्ये तेथील भौगोलिक प्रदेशानुसार पेहराव केलेला आढळतो. दक्षिणेकडील राज्यांमध्ये उदाहरणार्थ तमिळनाडू, कर्नाटक येथे पुरुष लुंगी प्रधान करतात तर उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रामुख्याने नेहरू पोशाख आढळतो. आज नवीन युगामध्ये देखील भारतातील लोकांनी आपली प्रादेशिक संस्कृती जपून ठेवलेली आढळते.

भारतामध्ये पूर्वी चातुर्वर्ण्य समाज संस्था होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा चार वर्गांमध्ये समाजाची विभागणी केली होती. लोकांच्या व्यवसायानुसार ही विभागणी केली होती. या विभागणीनुसार लोक आपल्या उपजीविका चालवत. पुढे शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार झाल्यामुळे लोकांमध्ये वर्णावरून केली गेलेली विभागणी अथवा असमानता नष्ट झाली आणि सर्वजण एकत्र आले.

आज भारतामध्ये कोणत्याही जातीचा अथवा धर्माचा व्यक्ती त्याला हवे ते शिक्षण घेऊ शकतो. भारतात फिरण्याचे आणि बोलण्याचे स्वातंत्र्य असल्यामुळे व्यक्ती विकसित होऊ शकतो पर्यायाने याचा फायदा देशाचा विकास होण्यासाठीच होत असतो. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याकारणाने येथे सर्वधर्मसमभाव आढळतो. भारतात ज्ञानाचे भांडार उपलब्ध आहे किंबहुना इतिहास देखील भारताला ज्ञानाचा कुबेर असे म्हणतो.

भारताची संस्कृती ही वेदांवर आधारित आहे. भारतामध्ये महाराष्ट्र हे राज्य आपल्या भारत देशाचे हुबेहूब प्रतिबंब आहे असे म्हणता येईल. ज्याप्रमाणे भारतात सांस्कृतिक विविधता आढळते आणि विविध जातीचे लोक एकत्र नांदतात तसेच महाराष्ट्रामध्ये देखील विविध जातीचे लोक एकत्र राहतात. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव तसेच दिवाळी हे सण मोठ्या उल्हास आणि आनंदाने साजरे केले जातात. विविध राज्यांमधील लोक गणेशोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्राला भेट देतात.

भारतामध्ये पृथ्वीवरील स्वर्ग असा ओळख असलेला एक प्रदेश आहे ज्याचे नाव आहे जम्मू आणि काश्मीर. वर्षभरात लाखो पर्यटक या प्रदेशाला भेट देण्यासाठी आणि येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येतात. काश्मीर मधील हस्तकला जगभर प्रसिद्ध आहे. येथील वैष्णव देवीचे मंदिर देखील हजारो पर्यटकांनी गजबजून जाते. काश्मीर मधील बर्फाच्छादित हिमशिखरे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण देखील जम्मू आणि काश्मीरच्या वादींमध्ये होते.

भारतातील दक्षिण राज्य जसे की तमिळनाडू, केरळ येथे अनेक धर्मांचे श्रद्धास्थान असलेली पुरातन मंदिरे आहेत. दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक येथे भेट देतात. ही श्रद्धास्थाने शक्तीचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहेत तसेच आजही येथील अनेक गोष्टी या गूढ प्रकारच्या असल्यामुळे तेथे देवाचा निवास आहे असे मानले जाते. देवाच्या अस्तित्वाच्या अनेक आख्यायिका देखील या भागांमध्ये ऐकू येतात.

राजस्थान हे राज्य देखील वीरांची भूमी म्हणून ओळखले जाते. राजस्थानला लाभलेला वाळवंट हा राजस्थानच्या सौंदर्यात भर पाडताना दिसतो. प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती असूनही राजस्थान हा प्रदेश दिसायला अत्यंत सुंदर आहे त्यामुळे प्रतिकूलतेत देखील सौंदर्य असते असे म्हणायला हरकत नाही. राजस्थान मधील कितीतरी गड किल्ले आजही चांगल्या अवस्थेत उभे आहेत आणि ते पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू देखील आहे. राजस्थान मधील संस्कृती ही आजही तग धरून आहे.

गुजरात हे राज्य देखील भारताची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते. द्वारका आणि सोमनाथ ही तीर्थक्षेत्रे आपल्याला गुजरात मध्ये आढळतात. गुजरात मधील लोक हे कर्मठ आणि धार्मिक स्वभावाचे आहे. गुजराती लोक हे कायम स्वादिष्ट अन्न खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक गुजराती भारताच्या विविध भागांमध्ये व्यापार करताना आपल्याला आढळतात मात्र तरीही ते गुजराती संस्कृती विसरत नाहीत.

भारतातील या विविध प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या लोकांचा आहार देखील विभिन्न प्रकारचा आहे. महाराष्ट्रीयन जेवण हे प्रामुख्याने तिखट आणि झणझणीत असते तर गुजराती लोकांचे जेवण हे गोड असते. प्रत्येक भौगोलिक भागात ज्या पिकांची लागवड केली जाते तेच पीक आहारामध्ये प्रामुख्याने आढळते.

भारतामध्ये हिंदू, बौद्ध, इस्लाम, शीख , जैन आणि ख्रिश्चन हे धर्म असलेले लोक आढळतात. भारताची बहुसंख्या लोकसंख्या ही हिंदू आहे आणि येथील बहुतांश लोक हिंदी ही भाषा वापरतात. भारत हा हिंदू बहुसंख्य देश असला तरी इतर धर्माचे लोक देखील येथे अगदी सुरक्षितपणे आणि आनंदाने राहू शकतात हा विश्वास भारत सर्वांना देतो.

भारतात धर्मा नुसार वेगवेगळे सण साजरे केले जातात जसे की हिंदू धर्मीय लोक गुढीपाडवा, मकर संक्रांति, गणेशोत्सव आणि मुस्लिम लोक ईद साजरी करतात. ख्रिश्चन लोक नाताळ तसेच गुड फ्रायडे हे सण साजरे करतात.

भारतात एकाच दिवशी महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांति हा सण साजरा होतो तर पंजाब मध्ये लोहरी साजरी केली जाते, तमिळनाडूमध्ये पोंगल म्हणून आणि आसाममध्ये बिहू म्हणून हा सण साजरा केला जातो. एकच सण विविध प्रदेशांमध्ये विविध नावाने साजरा होतो हीच भारतातील सांस्कृतिक विविधता म्हणावी लागेल.

भारताची सांस्कृतिक विविधता हीच भारताची खरी ताकद आहे कारण विविधता असून देखील भारतामध्ये एकता आहे आणि एकता हेच त्या राष्ट्राचे खरे बळ असते. आपण सर्वांनी ही भारताची विविधता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे मला वाटते.जय हिंद जय भारत!

दहा ओळींमध्ये भारताची सांस्कृतिक विविधता या विषयावर मराठी मध्ये भाषण

  1. भारत हा विविधतेने नटलेला देश म्हणून ओळखला जातो.
  2. भारतामध्ये भौगोलिक विविधता आढळते जसे की भारताला समुद्रकिनारा लाभलेला आहे त्याप्रमाणे पर्वत शिखरे आहेत आणि एका बाजूला वाळवंट देखील आहे.
  3. भौगोलिक विविधतेमुळे भारत हा विविध प्रादेशिक राज्यांमध्ये विभागला गेलेला आहे.
  4. प्रत्येक प्रादेशिक राज्याची स्वतःची अशी सांस्कृतिक विविधता भारतामध्ये आढळते.
  5. प्रादेशिक राज्यांमध्ये विविध जाती आणि तेथील लोकांचे पेहेराव आणि अन्न यामध्ये देखील विविधता आढळते.
  6. महाराष्ट्र हे राज्य मराठी माणसांचे आहे येथे लावणी हा नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे आणि येथील स्त्रिया या नऊवारी आणि सहावारी साडी परिधान करतात तर पुरुष धोतर आणि शर्ट पँट परिधान करतात.
  7. पंजाब मधील लोक हे नेहमी उत्साहाने भरलेले असतात. पंजाब मध्ये गव्हाचे उत्पादन होते तसेच त्याची निर्यात होते.
  8. तमिळनाडू, केरळ या दक्षिणेकडील राज्यांमध्ये विविध धर्मस्थळे आहेत आणि येथे आढळणारे मसाले हे अत्यंत प्रसिद्ध आहेत.
  9. भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख , जैन आणि ईसाई हे धर्म आढळतात. सर्व धरचे लोक भारतामध्ये एकोप्याने राहतात आणि भारत हा धर्मनिरपेक्ष देश म्हणून जगभर ओळखला जातो .
  10. भारताची ही सांस्कृतिक विविधता अबाधित ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आह

भारतातील भौगोलिक विविधता म्हणजे काय?

भारतात समुद्रकिनारे, पर्वतरांगा, हिरवीगार मैदाने आणि वाळवंट असे विविध भौगोलिक प्रदेश आढळतात, यालाच भौगोलिक विविधता म्हणतात.

भारतात कोणकोणते भौगोलिक प्रदेश आढळतात?

भारतात समुद्रकिनारे, उत्तुंग हिमालयीन पर्वतरांगा, हिरवाईने नटलेले प्रदेश तसेच वाळवंटी भाग आढळतात.

भौगोलिक विविधतेचा भारताच्या संस्कृतीवर कसा परिणाम झाला आहे?

भौगोलिक विविधतेमुळे भारतात विविध भाषा, परंपरा, सण आणि जीवनशैली विकसित झाल्या आहेत, त्यामुळे भारत सांस्कृतिक दृष्ट्याही अत्यंत विविध आहे.

Leave a Comment