Christmas Essay In Marathi: क्रिसमस (नाताळ) सणावर निबंध मराठी

Natal Essay On Christmas Nibandh In Marathi :जगामध्ये सर्वात जास्त वेगाने पसरलेला धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म आहे. ख्रिश्चन धर्म हा कोणतीही जातपात मानत नाही. माणुसकी हा एक धर्म आणि आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहोत ही उक्ती हा धर्म मानतो आणि ह्या धर्माचे आचरण करणारे सर्वजण या शिकवणुकीचे पालन करतात.

आजच्या जगामध्ये आपण विविध धर्माच्या लोकांना मधला संघर्ष पाहतो. जात-पात उच्च निजा भेदभाव प्रत्येक धर्मामध्ये विमलेला आहे मात्र या सर्वांपासून अलिप्त असा ख्रिश्चन धर्म म्हणूनच सर्व जगतिक स्तरांवर पोहोचलेला दिसून येतो.

ख्रिश्चन धर्माच्या उदयाचा देखील एक इतिहास आहे. येशू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्मामध्ये देव मानले जातात. त्यांचा जन्म बेथलहम येथे झाला. त्यांचा जन्मदिवस 25 डिसेंबर हा पोप जुलियस यांनी नाताळ या नावाने साजरा करण्यास सुरुवात केली. येशू ख्रिस्तांच्या जन्माची तारीख अद्याप उपलब्ध नाही मात्र 25 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस म्हणून त्या दिवशी नाताळ हा सण सर्व ख्रिश्चन बांधव अगदी उत्साहाने साजरा करतात.

येशू ख्रिस्तांना देवाचे पुत्र असे संबोधले गेले. जेव्हा येशू ख्रिस्तां बद्दल जनतेला माहीत नव्हते की ते कोण आहेत तेव्हा त्यांना लोकांनी भिंतीवर खिळे ठोकून लटकवले होते. मात्र अशाच चिन्ह विचिन्ह अवस्थेत देखील येशू ख्रिस्ताने परमेश्वराला प्रार्थना केली की परमेश्वरा ही सगळी अझान बालके आहेत आणि ते काय करत आहेत हे त्यांना स्वतःला ठाऊक नाही तरी तू या अजाण बालकांना माफ कर अशी विनवणी त्यांनी परमेश्वराला केली. भगवान येशूंचे हे उद्गार ऐकून सर्व लोकांना अत्यंत वाईट वाटले व स्वतःच्या कृत्याची लाज वाटली.

येशू ख्रिस्त हे इतके थोर होते की ज्या लोकांनी त्यांना मृत्यू दिला त्या लोकांविषयी देखील त्यांच्या मनात फक्त ममता भाव होता त्या लोकांविषयी कोणत्याही प्रकारची हिंसा त्यांच्या मनाला स्पर्श केली नव्हती असे हे येशू ख्रिस्त सगळ्यांना प्रेमाचा संदेश देतात. ख्रिस्ती धर्माची शिकवण ही अशीच आहे की माणसाला प्रेमाने आपलेसे केले जाते.

येशू ख्रिस्ताची ही शिकवण सर्व ख्रिश्चन बांधवांनी आत्मसात केली आणि त्यांचा हा जन्मदिवस सर्वत्र पोहोचवण्यासाठी नाताळ हा साजरा करण्यास सुरुवात केली. नाताळ या सणांमध्ये सर्व ख्रिस्ती बांधव हे एकत्र येतात. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन आनंदाने हा सण साजरा करतात.

एकमेकांना भेटवस्तू देऊन एकमेकांची विचारपूस केली जाते. सर्व ख्रिस्ती बांधव हे एकत्र येऊन जीवनाचा आस्वाद घेतात. एकमेकांना भेटवस्तू देताना लोकांना ज्या वस्तूंची गरज आहे त्या वस्तू दिल्या जातात. गरीब व्यक्तींना भेटवस्तू मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा परमेश्वराची भक्ती केल्या इतकाच भासतो. शेवटी येशूंची शिकवण आहे की आपण सर्व एका ईश्वराची लेकरे आहोत म्हणूनच सर्व भावंडे एकत्र गुण्या गोविंदाने सण साजरा करताना आढळून येतात.

ख्रिश्चन बांधव विपुल असलेल्या समाजामध्ये तर हा सण साजरा होतोच मात्र त्याचबरोबर ज्या देशांमध्ये ख्रिश्चन बांधव हे अल्पसंख्यांक आहेत अशा ठिकाणी देखील त्यांच्यासाठी काय नाताळची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते. नाताळ हा सण फक्त ख्रिश्चन बांधवच नाही तर इतर धर्माचे लोक देखील उत्साहाने साजरा करतात.

नाताळ या सणामध्ये प्रामुख्याने लाल, हिरवा आणि सोनेरी हे रंग वापरले जातात या तिन्ही रंगांचे स्वतःचे असे महत्त्व आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा रंग हा लाल आहे जो सर्वसामान्य जनतेच्या रक्ताचा देखील आहे. समानता दर्शवण्यासाठी लाल हा रंग वापरला जातो. हिरवा हा रंग अनंत जीवनाचे प्रतीक म्हणून दर्शवला जातो. सोनेरी हा रंग राजाचे प्रतीक म्हणून वापरला जातो.

ज्याप्रमाणे सर्व मोठे व्यक्ती एकत्र येऊन हा सण साजरा करतात त्याप्रमाणे लहान मुलांमध्ये देखील नाताळ विषयी फार मोठे उत्सुकता आढळते. नाताळ या सणांमध्ये मुलांचे सर्वात मोठे आकर्षण असते ते म्हणजे लाल कपडे घातलेला आणि पांढरी दाढी असलेला सांताक्लॉज.

सांताक्लॉज हा एक काल्पनिक व्यक्ती आहे. हा व्यक्ती नाताळच्या रात्री लहान मुलांना भेटायला येतो तो भेटायला येत असताना घराच्या चिमणी मधून आत येतो आणि मूल जेथे झोपले असेल तेथे त्याला भेटवस्तू देतो आणि आपल्या रेनडियरच्या गाडीतून निघून जातो अशी काल्पनिक कथा आहे.

कथा जरी काल्पनिक असली तरी मुलांसाठी सांताक्लॉज हा मुख्य आकर्षण आहे. आजही काही पालक स्वतः सांताक्लॉज म्हणून आपल्या मुलांना वेगवेगळ्या भेटवस्तू नाताळाच्या दिवशी देतात. मुले देखील या भेटवस्तू मिळाल्यामुळे अत्यंत खूष होतात.
असा हा नाताळ सण आबालवृद्धांमध्ये उत्साहाने साजरा केला जातो.

क्रिसमस (नाताळ) सणावर मराठी निबंध 10 ओळी

  1. नाताळ हा सण येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
  2. येशू ख्रिस्त यांनी सर्व जगाला आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहोत असा उपदेश केला आहे.
  3. ख्रिश्चन धर्म हा माणूसकी हा एकच धर्म मानतो येथे जात पात उच्च नीच असा भेदभाव मानला जात नाही.
  4. नाताळ या सणा दिवशी सर्व ख्रिश्चन बांधव एकत्र येऊन हा सण अगदी आनंदाने साजरा करतात.
  5. नाताळ या सणामध्ये ख्रिसमसला आकर्षक अशा दिव्यांनी आणि वेगवेगळ्या आकाराच्या गोष्टींनी सजवले जाते.
  6. ख्रिसमस ट्री हे नाताळचे प्रमुख आकर्षण असते, या वृक्षांमध्ये देखील भेटवस्तू ठेवल्या जातात.
  7. नाताळचे लहान मुलांमध्ये एक वेगळीच आकर्षण असते ते म्हणजे सांताक्लॉज.
  8. सांताक्लॉज हा माणूस आपल्याला भेटवस्तू देऊन जातो असे लहान मुलांना वाटते.
  9. नाताळ या सणांमध्ये प्रेमाची देवाणघेवाण केली जाते.
  10. नाताळ या सणा दिवशी अनेक देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर केली जाते.

नाताळ हा सण कोण साजरा करतात?

नाताळ हा सण ख्रिस्ती बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करतात.

नाताळ हा सण कधी साजरा करण्यात येतो?

नाताळ हा सण दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

नाताळ या सणांमध्ये कोणत्या काल्पनिक व्यक्ती चा उल्लेख येतो?

सांताक्लॉज या काल्पनिक व्यक्तीचा उल्लेख नाताळ सणादरम्यान येतो.

Leave a Comment