Dahi Handi Essay In Marathi: दहीहंडी निबंध मराठी

Dahi Handi Nibandh In Marathi: आपल्या भारतीय संस्कृती ला विविध सणांचा गौरवशाली वारसा लाभलेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 33 कोटी देवांचा उल्लेख आहे. देवांमध्ये सृष्टी चालवणारे देव म्हणजे श्रीविष्णु .श्रीकृष्ण हे श्री विष्णूंचे आठवे अवतार मानले जातात. श्रीकृष्णांशी संबंधित असलेला एक सण आपण भारतीय अगदी हर्ष आणि उल्हासाने साजरा करतो तो म्हणजे दहीहंडी. आज आपण आपल्या लेखांमध्ये दहीहंडी उत्सव या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये निबंध लिहिलेला आहे त्याचप्रमाणे दहा ओळींमध्ये देखील निबंध सादर केलेला आहे.

Dahi Handi Essay In Marathi

भारतीय संस्कृतीला विविध सणांची परंपरा लाभलेली आहे. भारतातील हे सण विविध प्रकारे साजरे केले जातात. काही सण घरगुती पद्धतीने घरामध्ये पूजा करून साजरे केले जातात. तर काही सण हे सर्व समाज एकत्र येऊन साजरे करतो त्यांपैकीच एक म्हणजे दहीहंडी उत्सव. दहीहंडी उत्सवामध्ये लहान थोर सर्वच लोक अगदी आनंदाने सहभागी होतात.

दहीहंडी म्हणजे दही, चुरमुरे यांचा केलेला काला. हा काला श्रीकृष्णांचा अत्यंत आवडत आहे. श्रीकृष्ण बालपणी गवळणींच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या घरात दडलेली हंडी शोधून काढून मित्रांसमवेत त्याचा आस्वाद घेत असत. श्रीकृष्णांच्या या बाललीला पाहून सगळ्या गवळणी देखील अगदी खुश होऊन जात असत.

श्रीकृष्णाचा हाच खेळ आता कितीतरी युगांतर देखील आज ज्याला कलयुग म्हटलं जातं तिथेही आनंदाने साजरा केला जातो त्याचेच नाव म्हणजे दहीहंडी उत्सव. दहीहंडी उत्सव साजरा करणे म्हणजे आपल्यातील लहान मुलाला पुन्हा एकदा जाग करणे आणि तो बालहट्ट पुरून घेणे.

श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णू देवांचे आठवे अवतार होय. जनतेच्या उद्धारासाठी त्यांनी त्रेतायोगामध्ये जन्म घेतला. देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी श्रीकृष्णाने जन्म घेतला पण तोही एका अंधार कोठडीत. श्रीकृष्णाचे मामा म्हणजेच कंस याला बहिणीच्या लग्नामध्ये आकाशवाणी झाली होती की तिच्या पोटी जो पुत्र जन्मला येईल तो तुझा वध करेल. ही आकाशवाणी ऐकल्यानंतर कंसाने बहिण आणि बहिणीचा नवऱ्याला कैद मध्ये टाकले. कैदेत ठेवल्यानंतर त्यांना जेव्हा जेव्हा मूल झाले तेव्हा तेव्हा कंसाने कोठडीत जाऊन त्या प्रत्येक मुलाचा वध केला अशा सात निष्पाप जीवांच्या हत्या कंसाने केल्या.

कंस असा वारंवार आपल्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक पुत्राचा वध करत होता हे वासुदेवांना सहन झाले नाही आणि त्यांनी आपल्या पुत्राचा जीव वाचवायचे ठरवले. देवकी देवी पुन्हा गरोदर राहिल्या आणि कंस तो मुलगा जन्माला येण्याची वाट पाहत राहिला.
जेव्हा कोठडीमध्ये देवकी आणि वासुदेवाचा आठवा पुत्र जन्माला आला तेव्हा सर्वत्र अंधार होता.

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला जिला जन्माष्टमी असेही संबोधले जाते. जन्माष्टमी नंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. श्रीकृष्णांच्या जन्मानंतर तिथे राजा कंसाला बातमी देण्यासाठी देखील कोणता व्यक्ती उभा नव्हता. याच गोष्टीचा फायदा घेऊन वासुदेवाने या आठव्या पुत्राला वाचवायचे ठरवले.

वासुदेवाने आपल्या आठव्या पुत्राला एका टोपलीमध्ये ठेवले आणि तो आपला मित्र नंद यांच्याकडे जाण्यासाठी निघाला.
नंदा घरी वृंदावनाकडे जात असताना वासुदेवांना यमुनेच्या पुराचा सामना करावा लागला होता. तेव्हा श्रीकृष्णांचे पाय यमुनेच्या पाण्याला लागताच पूर ओसरला आणि वासुदेवांनी श्रीकृष्णाला व्यवस्थितपणे नंदाच्या घरी सुपूर्त केले. वासुदेवांनी नंदाला झालेली मुलगी टोपली ठेवली आणि तिला घेऊन ते पुन्हा कोठडीकडे रवाना झाले.

काही काळानंतर सेवकांनी कंसाला बातमी दिली की देवकी आणि वासुदेवाला आठवी संतान झाले आहे मात्र ते पुत्र नसून कन्या आहे. अहंकाराच्या मस्ती मध्ये धुंद कंस कोठडीत आला आणि त्याने ही कन्या उचलून जमिनीवर आपटली. मात्र पुढे जे झाले ते चमत्कारिक होते.

ती कन्या प्रत्यक्ष देवीचा अवतार होती तिने स्वतःचे दर्शन दिले आणि ती कंसाला म्हणाली,”दुष्ट कंसा तुझ्या पापाचा घडा भरला आहे तुझा विनाश करणारा काळ जनमला आहे आणि सुखरूप सुद्धा आहे, तुझ्या अंतिम काळ जवळ येत आहे”असे बोलून ती कन्या रुपी देवी अदृश्य झाली.

यानंतर कंस श्रीकृष्णाला सर्वत्र शोधत राहिला त्याला जेव्हा समजले की श्रीकृष्ण वृंदावनामध्ये यशोदा आणि नंदाच्या घरी आनंदाने राहात आहे तेव्हा त्याने वेगवेगळे राक्षस पाठवून कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला पण श्रीकृष्णाने कायम तो प्रयत्न हाणून पाडला. कंस श्रीकृष्णाला मारण्यासाठी हर एक प्रयत्न करत होता, मात्र श्रीकृष्ण वृंदावनामध्ये गोप गोपिकांसोबत आनंदाने निवास करत होते, त्यांच्या त्या बाललीला पाहून संपूर्ण वृंदावन सुखावले होते.

श्रीकृष्णाचा मित्रपरिवार देखील मोठा होता. सुबाला, पेंद्या, चंद्र आणि बलराम हे श्रीकृष्णाचे सवंगडी सगळ्या वृंदावनामध्ये कौतुकाचा विषय होते. गोपिकांचे दही ,लोणी हक्काने खाणे आणि त्यावर सर्वात आधी लहान मुलांचा अधिकार आहे असे श्रीकृष्णाचे म्हणणे होते. गवळ्यांनी दूध विकण्याआधी आपल्या मुलांचे पोट भरले पाहिजे आणि जे दूध शिल्लक राहील तेच विकावे अशी श्रीकृष्णाची धारणा होती.

आपल्या घरातील मुलांना पोषक अन्न मिळावे हाच त्यामागचा त्यांचा उदात्त हेतू होता. श्रीकृष्णांचा हाच हेतू आणि त्याचे वाढत गेलेले स्वरूप म्हणजेच दहीहंडी होय. आपल्या घराचे काही तयार होते त्यावर सर्वात पहिल्यांदा त्या घरातील बालगोपाळांचा अधिकार आहे हेच श्रीकृष्णांना यातून सर्वांना सांगायचे होते.

आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातील बालमन कायम ताजे ठेवले पाहिजे हे देखील आपण या सणातून शिकतो. दहीहंडी उत्सवाला आता मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. काही ठिकाणी आजही पारंपारिक दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. पारंपारिक उत्सवामध्ये एका खांबाला दही हंडी बांधली जाते आणि त्यावर मानकरी माणूस चढतो आणि ती दहीहंडी डोक्यावर फोडून त्यातील दही खायला सर्वांना वाटून टाकतो.

दहीहंडी उत्सवाला आता इव्हेंटचे देखील स्वरूप आले आहे. शहरी भागातील मोठ मोठी मंडळे अभिनय क्षेत्रातील नामवंतांना दहीहंडी उत्सवाला बोलावतात. तरुणाई देखील येथे आकर्षित होते. दहीहंडी उत्सवामध्ये व्यक्ती गोलाकार उभे राहून एकमेकांवर मिनार रचल्यासारखे उभे राहतात.

त्यावर कितीतरी उंचीवर दहीहंडी लावलेली असते. ही दहीहंडी पकडून फोडण्यासाठी विविध मंडळांमध्ये चुरस लागते. आज काल या दहीहंडी उत्सवामध्ये मोठ मोठ्या रकमांची बक्षिसे देखील असतात. अशाप्रकारे आज-काल दहीहंडी उत्सव साजरा होतो. असा हा दहीहंडी उत्सव मला फार फार आवडतो.

Dahi Handi Nibandh Marathi 10 Lines

  1. दहीहंडी हा उत्सव भारतामध्ये मोठ्या आनंदाने साजरा होतो.
  2. दहीहंडी हा उत्सवा मागे भारतातील पौराणिक कथेचा देखील संदर्भ आहे.
  3. भगवान विष्णूंनी जगत उद्धारासाठी आठवा अवतार घेतला तो म्हणजे श्रीकृष्ण.
  4. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या बाललीला म्हणजे जनमानसासाठी आनंदाची चाहूलच जणू.
  5. सर्व गवळी आपल्या घरी गाईचे दूध काढत आणि ते विकत हे श्रीकृष्णांना पटले नाही.
  6. गवळ्यांच्या घरच्या दुधावर सर्वात पहिल्यांदा तेथील मुलांचा अधिकार आहे असे श्रीकृष्ण म्हणत.
  7. श्रीकृष्ण सवंगड्यांसोबत मिळून दूध, दही आणि लोणी चोरून खात असत.
  8. श्रीकृष्ण हे एक अद्वैत अवतार होते आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या सर्वांना गीतेचा उपदेश केलेला आहे.
  9. श्रीकृष्णांनी केलेला गीतेचा उपदेश जर आपण समजून घेतला तर आपले जीवन सुसह्य होईल.
  10. श्रीकृष्णांच्या प्रेरणेतून निर्माण झालेला दहीहंडी उत्सव आजही जोरात साजरा केला जातो.

आपणा सर्वांसाठी आज आम्ही दहीहंडी या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये निबंध सादर केला आहे. आपणास हा निबंध कसा वाटला ते आम्हाला अभिप्राय देऊ नक्की कळवा. आपला अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद!

Leave a Comment