Dr.A.P.J Abdul Kalam Speech In Marathi: डॉ. ए पी जे अब्दुल कलाम मराठी भाषण

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम Bhashan In Marathi: आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग, माझे सह अध्यायी आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो आज दिनांक 15 ऑक्टोबर म्हणजेच राष्ट्रीय विद्यार्थी दिवस. मित्रांनो आपण हा दिवस राष्ट्रीय विद्यार्थी दिवस म्हणून का साजरा करतो हे तुम्हाला ठाऊक आहे का?

भारताचे 11 वे राष्ट्रपती डॉ. ए . पी. जे. अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस . डॉ. ए . पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिनांक 15 ऑक्टोबर 1931 रोजी तमिळनाडू येथील रामेश्वरम येथे एका कुटुंबात झाला.डॉ. ए . पी. जे. अब्दुल कलाम यांचे संपूर्ण नाव अवुल पाकिर जैनुलाबदीन अब्दुल कलाम होय. त्यांचे वडील जैनुलाबदीन हे बोटीचे मालक तसेच तेथील मशिदीचे इमाम होते. त्यांच्या आई आशिआम्मा या गृहिणी होत्या.

अब्दुल कलाम यांना एकूण चार भाऊ आणि दोन बहिणी होत्या तसेच ते घरात सर्वांत लहान होते.अब्दुल कलाम यांना शिक्षणामध्ये सुरुवातीपासून अत्यंत रुची होती मात्र ते अभ्यासात सामान्य होते. शाळेत ते पुढे काहीतरी मोठे काम करतील असे कोणाला देखील वाटत नव्हते. त्यांनी आपल्या अभ्यासातील प्रगती साधून पुढे भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस मध्ये पदवी प्रदान केली.अब्दुल कलाम यांना खरे तर फायटर पायलट बनायचे होते मात्र त्यांचा नववा क्रमांक आला आणि त्यावेळी फायटर पायलट या पदासाठी केवळ आठ जागा होत्या. मात्र कलामांनी हार मानली नाही.

भारतीय संरक्षण खात्याशी संबंधित असलेल्या DRDO या संरक्षण रिसर्च आणि विकास सेवा संस्थेमध्ये ते रुजू झाले. त्यांनी पुढे जाऊन भारतीय अवकाश संस्था म्हणजेच ISRO मध्ये सिनिअर सायंटिस्ट म्हणून काम केले.अब्दुल कलाम यांनी आपल्या कार्यकाळामध्ये भारतीय अवकाश संशोधनामध्ये अत्यंत महत्वाची कामगिरी बजावली. त्यांनी पृथ्वी बाण, आकाश बाण, नाग बाण यांची निर्मिती केली जी भारतीय अवकाश संशोधनामध्ये मैलांचा दगड ठरली आहेत.

उपग्रह एस एल व्ही ची चाचणी देखील योग्यरीत्या पार पाडण्यामध्ये कलामांचा फार मोठा वाटा आहे. पोखरण येथे झालेल्या अणूचाचणी मध्ये देखील डॉक्टर अब्दुल कलाम यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.डॉक्टर अब्दुल कलाम यांचे भारतीय संशोधन क्षेत्रामध्ये असलेले योगदान त्या काळाच्या भारतीय सरकारने लक्षात घेतले होते आणि त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत.

भारतामध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा पद्मभूषण तसेच पद्मविभूषण हा पुरस्कार डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या नावे झालेला आहे. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला गेलेला भारतरत्न हा पुरस्कार देखील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना देण्यात आलेला आहे.डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून 25 जुलै २००२ रोजी निवडले गेले. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले राष्ट्रपती आपल्या देशाला लाभणे ही आपल्या देशासाठी अत्यंत गौरवाची आणि अभिमानास्पद बाब होती.

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपतीपदी निवडून देण्यासाठी कोणीच विरोध केला नाही त्यांची निवड ही एकतर्फी होती यावरूनच आपल्याला समजून येते की ते देशातील किती आदर्श असे व्यक्तिमत्व होते जे सर्वांना हवेहवेसे होते. 25 जुलै २००२ ते २५ जुलै २००७ ही पाच वर्षे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती या पदावर राहिले.

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे विद्यार्थ्यांचे अत्यंत आवडते व्यक्तिमत्व होते तसेच ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत प्रिय देखील होते. अब्दुल कलामांचे विद्यार्थ्यांवर अतिशय प्रेम होते आणि ते या भारताचा उज्वल भविष्यकाळ लहान मुलांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये पहात होते. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी 2020 मध्ये भारतात तरुण लोकांची संख्या सर्वात जास्त असेल हे सांगितले होते आणि ही तरुणाईच भारताला विकसित देश घडवेल असेही उच्चार त्यांनी काढले होते. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी पाहिलेला हा भविष्यकाळ आज आपण वर्तमानामध्ये अनुभवत आहोत.

आज भारतामध्ये प्रामुख्याने जास्त लोकसंख्या असलेले व्यक्ती हे तरुण आहेत. डॉक्टर कलाम यांनी विंग्स ऑफ फायर हे पुस्तक लिहिले ज्याचा मराठी अनुवाद अग्निपंख या नावाने प्रसिद्ध आहे. इग्नायटेड माईंड्स हे त्यांनी लिहिलेले पुस्तक देखील प्रसिद्ध आहे.

राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यानंतर डॉक्टर कलाम यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद येथे प्राध्यापक म्हणून काम केले.

27 जुलै 2015 रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलॉंग येथे व्यासपीठावर बोलत असताना ते अचानक कोसळले आणि त्यांना हृदयविकाराचा धक्का येऊन त्यांचे निधन झाले. डॉक्टर कलाम यांच्या निधनामुळे आपला देश एक महान व्यक्तिमत्वाला मुकला.

भारतातील सर्वात प्रभावी 10 व्यक्तिमत्त्वांपैकी एक असे डॉक्टर कलाम यांना मानले जाते तसेच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाइल मॅन म्हणून देखील ओळखले जाते.अशा या थोर महान शास्त्रज्ञाला मानाचा मुजरा.

Dr.A.P.J. Abdul Kalam 10 ओळी भाषण मराठी

  1. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे संपूर्ण नाव अवुल पाकिर जैनुलाबदिन अब्दुल कलाम असे होते.
  2. अब्दुल कलाम यांचा जन्म तमिळनाडू येथील रामेश्वर येथे झाला होता.
  3. डॉक्टर कलाम यांनी आपले शिक्षण मद्रास विद्यापीठातून पूर्ण केले होते त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस यामध्ये पदवी प्राप्त केली होती.
  4. भारताच्या पोखरण येथील अणुचाचणीमध्ये डॉक्टर अब्दुल कलाम यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.
  5. एस एल व्ही उपग्रह याचे यशस्वी प्रक्षेपण डॉक्टर कलाम यांच्या प्रयत्नातून साध्य झाले होते.
  6. डॉक्टर कलाम यांनी आपल्या कार्य काळामध्ये डीआरडीओ आणि इस्त्रो यांसारख्या भारताच्या महत्त्वाच्या शासकीय संस्थांमध्ये आपले योगदान दिलेले आहे.
  7. 25 जुलै 2002 रोजी डॉक्टर अब्दुल कलाम यांनी भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
  8. डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर 1931 हा राष्ट्रीय विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो.
  9. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलॉंग येथे एका कार्यक्रमा वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन अब्दुल कलाम यांचे निधन झाले.
  10. डॉक्टर कलाम हे एक शास्त्रज्ञ आणि त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट लेखक देखील होते त्यांनी लिहिलेली द इग्नायटेड माईंड्स ,विंग्स ऑफ फायर ही पुस्तके तरुणाई मध्ये लोकप्रिय आहेत.

भारताचे मिसाइल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते?

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाते.

डॉक्टर अब्दुल कलाम यांनी कोणती पुस्तके लिहिली आहेत?

द इग्नायटेड माईंड्स ,विंग्स ऑफ फायर आणि इतर पुस्तके डॉक्टर अब्दुल कलाम यांनी लिहिली आहेत.

डॉक्टर अब्दुल कलाम यांनी शालेय जीवनामध्ये कोणत्या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली होती?

– डॉक्टर अब्दुल कलाम यांनी शालेय जीवनामध्ये भौतिक शास्त्र तसेच एरोस्पेस या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली होती.

Leave a Comment