Dr. Babasaheb Ambedkar Nibandh In Marathi: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म रामजी आणि भीमा बाई या दाम्पत्याच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. रामजी आंबेडकर हे ब्रिटिश सैन्यामध्ये सैनिक या पदावर कार्यरत होते. डॉक्टर आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होय. डॉक्टर आंबेडकर हे रामजी आंबेडकर यांचे चौदावे अपत्य होते. डॉक्टर आंबेडकर हे शालेय जीवनापासूनच अत्यंत हुशार विद्यार्थी होते.
मस्तक शूल या आजारामुळे भिमाबाईंचा अकाली मृत्यू झाला. भीमराव हे त्यावेळी पाच वर्षांचे सुद्धा नव्हते. भीमराव आणि त्यांच्या इतर भावंडांचा सांभाळ त्यांची आत्या मीराबाई यांनी केला. आंबेडकरांचे कुटुंब हे त्या काळातील वर्णभेदी लोकांच्या निशाण्यावर होते कारण तत्कालीन जाती व्यवस्थेमध्ये त्यांची जात ही अत्यंत खालची मानली जात होती.
आंबेडकर यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे होते. पूर्वीच्या काळी लोक स्वतःच्या गावाच्या नावापुढे कर लावून आडनाव तयार करून लावत असत त्यावरूनच त्यांचे आडनाव आंबडवेकर असे बनले होते.
हे पण वाचा: सैनिकाचे मनोगत निबंध मराठी
पुढे सातारा येथे शिक्षण घेत असताना त्यांचे शिक्षक कृष्णा केशव आंबेडकर यांनी त्यांना तुझे हे नाव फारच लांबलचक आहे आणि चुकीचे म्हटले जाऊ शकते म्हणून तू माझे आंबेडकर हे नाव लाव असे त्यांना सुचवले. म्हणूनच पुढे भीमराव आणि आंबेडकर हे नाव आडनाव म्हणून लावले.
रामजी आंबेडकर यांच्या नोकरी नियुक्तीमुळे त्यांना वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याचा योग आला. आंबेडकरांना पुढे मुंबईतील एलफिन्स्टन शाळेमध्ये प्रवेश मिळाला. या शाळेत प्रवेश मिळवणारे ते पहिले विद्यार्थी होते जे अस्पृश्य होते. एल्फिन्स्टन स्कूल मध्ये आंबेडकरांना जातीवादाचा सामना करावा लागला त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या पुस्तकांमध्ये केलेला आहे.
खालच्या जातीचे असल्याकारणाने त्यांना तेथील हंड्याला किंवा पेल्याला स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता त्यांना जर तहान लागली असेल तर उच्च जातीच्या लोकांनी पाणी पेल्याने हातावर ओतायचे आणि मग आपण ते प्राशन करायचे असा नियम होता. भारतातील हिंदू धर्मामध्ये असलेल्या या जातीयवादाचा आंबेडकरांना त्रास होत होता.
पुढे वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी त्यांचे लग्न रमाबाई आंबेडकर यांच्याशी झाले. आंबेडकर हे शालेय जीवनामध्ये 18 तास अभ्यास करत असत. त्यांच्या या मेहनतीचा परिणाम म्हणून त्यांना एल्फिन्स्टन स्कूल मधून मॅट्रिकची परीक्षा ती यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले.
असे करणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी ठरले म्हणूनच त्यांच्या इतर जाती बांधवांनी त्यांचे जंगी अभिनंदन केले आणि त्यामध्ये कृष्णाजी अर्जुन केसकर या गुरुजींनी त्यांना स्वतःच्या हाताने लिहिलेले बौद्ध विषयाचे पुस्तक दिले. हे बुद्ध यांचे पुस्तक वाचून त्यांच्याविषयी नितांत प्रेम वाटले. बुद्ध धर्म हा इतर धर्म पेक्षा वेगळा आहे याची जाणीव त्यांना यावेळी झाली असेल.
जेव्हा संपूर्ण देश इंग्रजांविरुद्ध लढण्यामध्ये एकवटला होता तेव्हा भारत देशातील अस्पृश्यांचे कैवारी बनवून आंबेडकरांनी सर्व अस्पृश्यांना एकत्र आणले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी त्या तेथे असणाऱ्या अस्पृश्यांना देखील ते स्वातंत्र्य मिळाले पाहिजे याकडे आंबेडकरांचा ओढा होता.
भारतातील सवर्ण हिंदूंच्या मनातील खालच्या जातीतील लोकांविषयी असलेला राग आणि भेद घालवण्यासाठी आंबेडकरांनी सर्वतोपरी शांतता मार्ग केले मात्र याला हिंदू उच्च धर्मीयांनी नीट अशी दाद दिली नाही. महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह आंबेडकरांनी मुद्दाम घडवून आणला होता त्यामागे त्यांना स्पृश्य आणि अस्पृश्य ही दरी मिटवायची होती.
अस्पृश्य लोकांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यासाठी अथवा पिण्यासाठी बंदी होती अशावेळी महाड येथील चवदार तळ्यामध्ये जाऊन आंबेडकरांनी स्वतः ती पाणी हातात घेऊन प्राशन केले ते पाहून इतर अस्पृश्यांनी देखील तेथील पाणी प्राशन केले. मात्र त्या काळातील स्पृश्य लोकांनाही आवडले नाही आणि त्यांनी अस्पृश्य लोकांवर हिंसेचा वापर केला. डॉक्टर आंबेडकर आणि मात्र आपल्या सर्व अनुयायांना अहिंसा मार्गाने शांत राहण्यास सांगितले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुमारे वीस वर्षे विविध धर्मांचा अभ्यास केला मात्र त्या प्रत्येक धर्मामध्ये कोठे ना कुठे स्पृश्य आणि अस्पृश्य या सीमा होत्या. बौद्ध धर्म हा एकमेव धर्म होता जिथे माणसाला माणसाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे तसेच मूर्ती पूजेला स्थान नव्हते.
“मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही कारण हिंदू धर्मामध्ये ,’सर्वभूती एक आत्मा’ असे तत्व मानले जात नाही म्हणून हिंदू धर्म किळसवाणा झाला आहे असे आंबेडकर म्हणत. पुढे 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे डॉक्टर आंबेडकरांनी महास्थीवर चंद्रमणी यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. डॉक्टर आंबेडकर यांच्या लाखो आणि अनुयायांनी देखील त्यांचे अनुकरण केले.
6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर आंबेडकर यांचे आपल्या शासकीय निवासस्थानी निधन झाले, या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असे म्हणतात. आंबेडकर हे एक उत्कृष्ट न्यायशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होते. आंबेडकरांना आधुनिक भारताचे शिल्पकार देखील म्हटले जाते. अशा या थोर महान नेत्याला कोटी कोटी प्रणाम.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 10 ओळी निबंध
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते.
- रामजी आंबेडकर आणि भीमाबाई यांना एकूण 14 आपत्ती होती त्यामध्ये शेवटचे अपत्य म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर होय.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून अत्यंत हुशार विद्यार्थी होते.
- आंबेडकर यांना वयाच्या पाचव्या वर्षी मातृशोक झाला होता मस्तकशुल आजारामुळे भीमाबाईंचे लवकर निधन झाले.
- डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या इतर भावंडांच्या संगोपन त्यांची आत्या मीराबाई यांनी केले.
- वडिलांच्या सततच्या बदलीमुळे आंबेडकरांनी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेतले.
- मुंबईतील एल्फिन्स्टंन शाळेमध्ये आंबेडकर मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांचे जंगी अभिनंदन केले गेले.
- आंबेडकरांनी आपले उच्च शिक्षण कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून केले.
- बडोदा संस्थानाचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून डॉक्टर आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जात असे.
- डॉक्टर आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते तसेच भारतीय संविधानाची निर्मिती देखील त्यांनी केली आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव काय होते?
बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता?
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता.