Mahatma Jyotiba Phule Essay In Marathi: महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी

Mahatma Jyotiba Phule Marathi Nibandh: ज्योतिबा फुले यांचे संपूर्ण नाव जोतिराव गोविंदराव फुले. महात्मा ही पदवी त्यांना मिळाली होती. महात्मा फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यात कटगुण या गावी 11 एप्रिल 1827 रोजी एका माळी कुटुंबामध्ये झाला. महात्मा फुले यांचे पूर्वज फुले विक्रीचा व्यवसाय करत म्हणूनच त्यांचे आडनाव फुले झाले. पूर्वी फुले यांचे आडनाव गोरे असे होते. महात्मा फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई फुले असे होते.

महात्मा फुले हे लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. शाळेमध्ये ते अत्यंत हुशार होते. शाळेमध्ये असताना फुलेंना जातीव्यवस्थेचा सामना करावा लागला होता. समाजामध्ये जातीभेद होते तसेच चातुर्वर्णीय संस्था होती. पुढे वयाच्या 13व्या वर्षी फुलेंचे सावित्रीबाईंशी लग्न झाले.महात्मा फुले हे थोर समाजशोधक होते, ते एक बंडखोर व्यक्ती होते त्यांनी त्या काळात असलेल्या जातीभेदाला कडाडून विरोध केला.

जुन्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेले होते, जातीभेद निर्माण करून शूद्र लोकांना जीवनावश्यक गरजांपासून देखील वंचित ठेवले जात होते.महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची गरज ओळखून आपल्या पत्नीला सर्वप्रथम साक्षर केले. सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील प्रथम महिला शिक्षक होत्या.

महात्मा फुले यांनी 1848 मध्ये पुणे येथील भिडेवाडा येथे मुलींसाठी सर्वप्रथम शाळा सुरु केली. येथे शूद्र समाजातील व्यक्तींना आणि स्त्रियांना शिक्षण उपलब्ध करुन दिले.जेव्हा हे दोघे पती पत्नी शिक्षणासारखे पवित्र काम करण्यासाठी बाहेर जात तेव्हा समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करत तसेच त्यांच्यावर दगडफेक, चिखलफेक करत असे असले तरी या दोघांनी आपले पवित्र काम कधीच सोडले नाही.

महात्मा फुले यांनी प्रस्थापित चतुर्वर्ण विरोधी भूमिका घेतली आणि समाजामध्ये एक नवीन विचारांची क्रांती आणली. फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.”सर्वसाक्षी जगत्पती , त्याला नकोच मध्यस्थी” असे या समाजाचे ब्रीदवाक्य होते. कोणत्याही गोष्टीचा शोध हा सत्याच्या आधारावर घेतला जात असे.महात्मा फुले हे समाजसुधारक तर होतेच त्याप्रमाणे एक उत्तम लेखक पण होते. त्यांनी शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब हे ग्रंथ लिहिले. या ग्रंथातून त्यांनी त्या काळातील वर्णभेदी लोकांवर टीकेची झोड उठवली होती.

महात्मा फुले यांना त्यांच्या या समाजसुधारणेच्या कार्यामुळे सर्वत्र मान होता.महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांवर आजचा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे. आजचा महाराष्ट्र हा पुरोगामी आहे आणि म्हणूनच आजच्या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते. महात्मा फुले यांच्यावर प्रामुख्याने संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा पगडा होता. संत तुकाराम महाराज ज्याप्रमाणे अभंग लिहितात त्याचप्रमाणे महात्मा फुले यांनी अखंड नावाचा ग्रंथ लिहिला होता जेथे त्यांनी सगळ्या विचारांची सांगड घातली होती.

महात्मा फुले यांचे म्हणणे होते की जोपर्यंत माणूस शिक्षित होत नाही तोपर्यंत समाज पुढे जाणार नाही आणि समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षण घेतले पाहिजे असा त्यांचा हट्ट होता. विद्येचे वर्णन करताना त्यांनी लिहिलेली शब्दरूपी कविता आपल्याला खूप काही सांगून जाते. महात्मा फुले यांच्या भाषेमध्ये लिहिलेली ही विद्येविषयी जागृती करणारी कविता खालील प्रमाणे होय.

“विद्या विना मती गेली,

मतीविना नीती गेली,

नीतीविना गती गेली,

गतीविना वित्त गेले,

वित्तविना शूद्र खचले,

इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले”.

महात्मा फुले यांनी अनेक राष्ट्र वीरांचे इतिहास देखील जनतेला उलगडून दाखवले. जनतेच्या डोळ्यातील धुळ त्यांनी बाजूला सारली आणि नवीन दृष्टिकोनातून जग बघण्याची दृष्टी फुलेंनी महाराष्ट्राला दिली असे म्हणण्यासारखं नाही. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुले यांची प्राणज्योत पुणे येथे मालवली.

आपण एक जागरूक नागरिक म्हणून महात्मा फुलेंचे हे प्रेरणादायी विचार जिवंत ठेवले पाहिजेत आणि वर्णभेद आला कुठे थारा दिला नाही पाहिजे.

महात्मा ज्योतिबा फुले मराठी निबंध 10 ओळी

  1. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला.
  2. महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्वीचे आडनाव गोरे असे होते त्यांचे पूर्वज शाहू काळामध्ये फुले विक्रीचा व्यवसाय करत म्हणून त्यांचे आडनाव फुले झाले.
  3. महात्मा फुले हे शाळेमध्ये असताना अत्यंत हुशार विद्यार्थी होते.
  4. महात्मा फुले यांचा विवाह वयाच्या 13 व्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला.
  5. समाजातील तत्कालीन वर्णभेद आला महात्मा फुले यांनी कडाडून विरोध केला आणि स्पृश्य अस्पृश्य ही संज्ञा मिटवून टाकण्याचा प्रयत्न केला.
  6. महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी तसेच ब्राह्मणाचे कसं या विषयांवर लिखाण केले.
  7. महात्मा फुले यांनी स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुले यांना घरी शिकवले.
  8. महात्मा फुले यांनी 1848 मध्ये पुणे येथील भिडे वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली.
  9. आपल्या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख मिळालेली आहे ती त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानामुळेच.
  10. महात्मा फुले यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुणे येथे झाला.

ज्योतिबा फुले यांचे संपूर्ण नाव काय होते?

ज्योतिबा गोविंदराव फुले हे त्यांचे संपूर्ण नाव होते.

ज्योतिबा फुले यांचा विवाह कोणाशी झाला?

ज्योतिबा फुले यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला.

ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव सांगा?

शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी ही पुस्तके ज्योतिबा फुले यांनी लिहिली आहेत.

Leave a Comment