Mahila Netrutwa Marathi Speech: भारत देशामध्ये अगदी सुरुवातीला मातृसत्ताक पद्धती होती. स्त्रियांचा प्रत्येक क्षेत्रामध्ये दबदबा होता. मध्यंतरीच्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धत जाऊन पितृसत्ताक पद्धत अस्तित्वात आली. पितृसत्ताक पद्धतीमुळे पुरुष कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी घर चालवू लागले तर स्त्रिया या घराच्या चार चौकटीच्या हात बांधल्या गेल्या.
स्त्रिया घरात थांबल्यामुळे कुठेतरी त्यांची सामाजिक तसेच वैयक्तिक प्रगती खुंटली. इसवी सन 1 6 व्या शतकात जिजाऊ माता राज्यकारभार पाहत असत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणी मागे एका श्रेष्ठ मातेचा हात होता. शिवाजी महाराजांच्या अंगीभुतुजे नेतृत्व होऊन होते ते त्यांना त्यांची माता जिजाऊ यांच्याकडूनच अवगत झाले होते.
जिजाऊ मातांचा हा वारसा पुढे तारा राणी राणीसाहेबांनी चालवला आणि मुघलांना सत्तेसाठी झुंजत ठेवले. राणी ताराराणी यांनी करवीर संस्थानाची स्थापना केली. एक स्त्री असून देखील त्या एक उत्तम शासनकर्त्या म्हणून सर्व परिचित आहेतच.अठराव्या शतकामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी देखील इंग्रजांना सळो की पळो केले होते.
महिलांमध्ये पूर्वीच्या काळी देखील नेतृत्व गुण होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली किती तरी लढाया लढला गेला असे आपला इतिहासच सांगतो. मात्र काही लोकांनी हा इतिहास दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच स्त्रियांना मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखले गेले.पुढे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रयत्नांमुळे स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या. स्त्रियांना पुरुषांच्या समानतेचे हक्क मिळाले पाहिजेत हा ज्योतिबा फुले यांचा अट्टाहास होता.
आपण पुरुषांपेक्षा कमी नाही किंबहुना आपण त्यांच्यापेक्षाही सरस आहोत ही भावना स्त्रियांमध्ये रुजायला लागली आणि त्यातूनच एक नवीन क्रांती जन्माला आली.महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू केली. स्त्री शिक्षणाची ही क्रांती जेव्हा सुरू झाली त्यानंतर ती आजतागायत सुरूच आहे. आज स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देखील आणि स्त्रियांनी पुढाकार घेतला प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदान देण्यासाठीही त्यामागे हटल्या नाहीत. महिलांकडे हे नेतृत्व गुण पहिल्यापासूनच अस्तित्वात होते. लक्ष्मी सेहगल, प्रीतीलता वड्डेदार तसेच कल्पना दत्त या अनेक महिला क्रांतिकारकांनी भारताच्या स्वातंत्र्यसाठी आपले आयुष्य झोकून दिले होते.महिला या मुळात सृजनशील असतात. प्रत्येक गोष्टीची निर्मिती ही स्त्रियांमधूनच होत असते.
स्त्री जितकी कोमल असते तितकीच ती कठोरही होऊ शकते. काही प्रौढ मतवादी लोकांना असे वाटते की स्त्रिया या कठीण कार्य करू शकत नाहीत किंवा त्या कठीण काम करण्यासाठी बनलेल्या नाहीत. मात्र आजच्या काळामध्ये असे एकही क्षेत्र नाही की जिथे स्त्रियांनी आपल्या नावाचा डंका वाजवला नसेल. पुरुष आज ज्या ज्या क्षेत्रात काम करत आहेत त्या क्षेत्रात स्त्रिया देखील खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात.
आज अनेक जागतिक नामवंत कंपन्यांमध्ये अनेक स्त्रिया उच्च पदावर कार्यरत आहेत. स्त्रियांची निर्णय क्षमता देखील उत्कृष्ट असते. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यातून इतरांचे भले कसे होईल आणि समाज पुढे कसा जाईल याचा देखील विचार महिला करतात आणि तसे निर्णय घेतात.
स्त्रिया या पुरुषांपेक्षा बौद्धिक दृष्ट्या अधिक हुशार असतात हे देखील आता विज्ञानाने सिद्ध केले आहे.आज अनेक राजकीय पक्षांमध्ये आपल्याला अनेक स्त्रिया कार्यरत दिसतात. भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नेतृत्व गुण तर सर्वांना माहीत आहेतच. आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे भारत देशाला सांभाळले तेव्हा वाखाणण्याजोगेच होते.
आज देशातील प्रत्येक मुलीसमोर अनेक महिला नेतृत्व एक आदर्श निर्माण करत आहेत. प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला, लता मंगेशकर, सायना नेहवाल, सानिया मिर्झा , दीपिका पादुकोण, प्रियांका चोपडा या आणि अशा अनेक स्त्रिया आपल्या विविध कार्यक्षेत्रामध्ये भारताचा डंका संपूर्ण जगभर वाजवत आहेत. या स्त्रिया प्रत्येक महिला आणि मुलींसाठी एक आदर्श म्हणून उभ्या आहेत.
स्त्री ही नुसती शोभेची बाहुली नसून प्रत्यक्ष समरंगणावरील रणरागिणी आहे हे या स्त्रियांनी आपल्या कार्यातून सिद्ध केलेले आहे.मुलींनी आणि महिलांनी स्वतःला कमी न समजता आपण ज्या गोष्टींमध्ये प्राविण्य मिळवू शकतो अशा गोष्टींबद्दल प्रयत्न करत राहिले पाहिजे. आपल्यासाठी मग यशाचा पल्ला फार लांब नाही हे मात्र नक्की.
महिला नेतृत्व या विषयावर दहा ओळींमध्ये मराठी भाषेत भाषण
- आज भारतामध्ये पुरुषांबरोबर अनेक महिला देखील नेतृत्व करत आहेत आणि देशाचे नाव सर्वत्र मोठ्या दिमाखाने मिळवत आहेत.
- राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने आरक्षण मिळाल्यामुळे स्त्रियांना त्यांचे हक्क मिळाले आहेत.
- महिला आज सर्व क्षेत्रांमध्ये नेतृत्व करत आहेत आणि लोकांसमोर एक आदर्श ठेवत आहेत.
- किरण मुजुमदार शॉ या एका मोठ्या औषध कंपनीच्या व्यवस्थापक आहेत ज्या आज जागतिक पातळीवर भारताचे नाव उंचावत आहेत.
- महिला नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत हे आजवरचा इतिहास देखील सांगतो.
- राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या नेतृत्वात आजवर आपण अनेक लढाया जिंकल्या आहेत.
- महिलांकडे उत्तम असे संभाषण कौशल्य देखील असते तसेच त्यामुळे त्या एखादी गोष्ट सहजगत्या करू शकतात.
- महिलांमध्ये मुळातच सृजनशीलता हा गुण असल्याकारणाने नवीन निर्मिती करणे आणि ते जोपासणे हा गुण महिलांच्या अंगीभूत आढळतो.
- महिलांमध्ये नेतृत्वगुण हे मोठ्या प्रमाणात आढळतात अगदी घरापासून ते देशापर्यंत त्या शिस्तबद्ध पद्धतीने वावरतात.
- देशाला विकासाच्या वाटेवर राहण्यासाठी महिला आणि पुरुष यांचे समप्रमाणात योगदान असणे गरजेचे आहे.
महिला नेतृत्व म्हणजे काय?
विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी जबाबदारीने पुढाकार घेऊन समाजाचे मार्गदर्शन करणे म्हणजे महिला नेतृत्व होय.
महिला नेतृत्वाचे समाजाला कोणते फायदे होतात?
महिला नेतृत्वामुळे समानता वाढते, निर्णयप्रक्रिया अधिक संवेदनशील होते आणि समाजाचा सर्वांगीण विकास घडतो.
महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणे का गरजेचे आहे?
महिलांमध्ये असलेल्या कौशल्यांचा योग्य वापर होतो, आत्मविश्वास वाढतो आणि पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण होतो.