Majhe Avadte Sant Nibandh Marathi: महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक महान संत होऊन गेले. या महान संतांच्या पदस्पर्शाने ही महाराष्ट्र भूमी पावन झालेली आहे. आजच्या या निबंध मालिकेमध्ये आपण अशाच काही महान संतांपैकी एक असलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांवर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये निबंध सादर केलेला आहे.
Sant Dnyaneshwar Maharaj Essay In Marathi
“संतकृपा झाली,
इमारत फळा आली,
ज्ञानदेवे रचिला पाया,
उभारीले देवालया.”
महाराष्ट्राच्या मातीतील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी या अभंगांमध्ये संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे महाराष्ट्रातील पावन भूमीवरील महत्त्व अधोरेखित केलेले आहे. महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. वारकरी संप्रदाय संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर जगभर पोहोचलेला आहे.
आजच्या आधुनिक युगामध्ये देखील वारकरी संप्रदाय समजून घेण्यासाठी परदेशातून कितीतरी नागरिक भारतात येतात, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे माहेरघर असलेल्या पंढरपुर येथे येऊन अभ्यास करतात. या परदेशी नागरिकांना देखील महाराष्ट्रातील संतांचे महत्त्व उमजले आहे. यावरूनच आपल्याला हे सहज समजते की या संतश्रेष्ठांनी केलेले कार्य किती अनमोल आहे.
महाराष्ट्रच्या मातीमध्ये जन्माला आलेले महान संत म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज होय.ज्ञानेश्वर महाराजांच्या आईचे नाव रुक्मिणी बाई तर वडिलांचे नाव विठ्ठल पंत कुलकर्णी होय. विठ्ठल पंत कुलकर्णी यांना एकूण मिळून चार मुले झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई.
गृहस्थाश्रमात असताना विठ्ठल पंतांनी अचानकच गृहस्थाश्रम सोडून संन्यासाश्रम पत्करला. संन्यास आश्रमात असताना जेव्हा विठ्ठल पंतांच्या गुरूंना समजले की त्यांना मुले आहेत तेव्हा त्यांनी विठ्ठल पंतांना पुन्हा गृहस्थाश्रमात जाण्यास सांगितले. गुरुच्या आज्ञेनुसार विठ्ठल पंत पुन्हा गृहस्थाश्रमात परतले.
मात्र त्या काळातील मनुवादी लोकांनी विठ्ठल पंतांना गृहस्थाश्रमात परतण्याऐवजी देहांत प्रायश्चिताची शिक्षा सुनावली. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी बाई यांनी देहांत प्रायश्चित्त घेतले. आई-वडिलांच्या माघारी ही चारी मुले पोरकी झाली. चारी भावंडे भिक्षा मागून स्वतःची उपजीविका करत होते.
मात्र या चारी भावंडांना लोक उपेक्षित वागणूक देत होते. लोकांच्या अशा वागणुकीमुळे संत ज्ञानेश्वर महाराज दुःखी झाले होते आणि एकदा ताटी लावून घरात दुःखी होऊन बसले होते. अशावेळी बहीण मुक्ताबाईच्या उपदेशांमुळे संत ज्ञानेश्वरांना स्वतःच्या अंतरीक ज्ञानाची जागृती झाली.
संत ज्ञानेश्वरांनी समाजाला देखील नवीन दृष्टिकोन मिळवून दिला. संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद वदवले असे म्हटले जाते. संत ज्ञानेश्वरांनी चांगदेव महाराजांचे गर्वहरण करण्यासाठी निर्जीव भिंत चालवली असे म्हटले जाते. संत ज्ञानेश्वर आणि वयाच्या 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला जो भागवत पुराणाचा मराठी मधील अनुवाद आहे.
ज्ञानेश्वरी ग्रंथ हा ओव्यांमध्ये लिहिला गेलेला आहे. ही ज्ञानेश्वरीच आज वारकरी सांप्रदायाचा गीता सार म्हणून ओळखली जाते. प्रत्येक वारकरी हा ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन, मनन आणि आचरण करतो. ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये सर्वात शेवटी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी,’पसायदान’ लिहिले आहे.
पसायदानामध्ये संत ज्ञानेश्वरांनी सर्व जगाच्या सुखासाठी प्रार्थना केली आहे यावरूनच समजते की त्यांना सर्व प्राणीमात्रांबद्दल किती प्रेम होते. या “संपूर्ण विश्वाचा आत्मा एकच आहे”, असा विश्वास संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना होता.
संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव महाराज या दोघांनी मिळून वारकरी सांप्रदायाचा पाया घातला.
जास्तीत जास्त लोकांना पर्यंत वारकरी सांप्रदाय पोहोचावा यासाठी यांनी प्रयत्न केले. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवली. मराठी भाषेचे वर्णन करताना संत ज्ञानेश्वर माऊलींनी तिला अमृताची उपमा दिली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आणि संत नामदेव महाराजांनी संपूर्ण वारकरी समुदाय पंढरपूर येथे एकत्र आणला.
वारकरी संप्रदायाचे महान काम केल्यानंतर मात्र संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली. समाधी म्हणजे अष्टांग योगामधील एक प्रकार होता. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतली. या समाधीला संजीवनी समाधी असे म्हटले जाते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आज महाराष्ट्राच्या भूमीला वारकरी सांप्रदायाची थोर संस्कृती लाभली आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना शतशः नमन.
Sant Dnyaneshwar Maharaj Nibandh In Marathi 10 Lines: संत ज्ञानेश्वर महाराज निबंध 10 ओळींमध्ये
- महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये अनेक महान संत होऊन गेले त्यांपैकी एक म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना ज्ञानेश्वर माऊली म्हणून देखील ओळखले जाते.
- संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला.
- संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी तर आईचे नाव रुक्मिणीबाई होते.
- संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्ती, सोपान आणि मुक्ताबाई ही भावंडे होती.
- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आई-वडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा मिळाली होती.
- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची इतर भावंडे ही कर्मठ लोकांचा त्रास सहन करत आपले जीवन व्यतीत करत होती.
- संत मुक्ताबाईंनी संत ज्ञानेश्वरांना त्यांच्या अंतरिक्षक्तीची जाणीव करून दिली आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वरांना स्वतःचे दुःख कधीच जाणवले नाही.
- संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला.
- संत ज्ञानेश्वरांनी संत नामदेवांसोबत मिळून वारकरी सांप्रदाय मोठा केला.
- संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी आळंदी येथे संजीवनी समाधी घेतली.
आज आपण आपल्या निबंध मालिकेमध्ये संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर आधारित 100 ते 500 शब्दांमध्ये तसेच दहा ओळींमध्ये निबंध लिहिला आहे. आपणास हा निबंध कसा वाटला हे आम्हाला अभिप्राय देऊन नक्की कळवा. आपला अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. धन्यवाद!