Mulgi Vachva Mulgi Shikva Nibandh In Marathi: एखाद्या घरामध्ये जेव्हा लहान मूल जन्माला येते तेव्हा सर्वात आधी प्रश्न विचारला जातो काय झालं? मुलगा की मुलगी? त्या जन्माला येणाऱ्या मुलाच्या तब्येतीची विचारणा कोणीच करत नाही उलट जन्माला आलेलं बाळ हे मुलगा आहे की मुलगी हे जाणण्यामध्ये सर्वांना स्वारस्य असतं.
खरे तर आजच्या काळात मुलगी कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाही तरीही लोकांचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला नाही. लेकीला जर चांगले शिक्षण दिले तर त्या फक्त आपले घर नाही तर संपूर्ण समाज पुढे घेऊन जातात हा इतिहास सर्वांना माहीत आहे. आज आपण आपल्या निबंध मालिकेमध्ये ‘लेक वाचवा ,लेक शिकवा’ या विषयावर निबंध सादर करणार आहोत.
Mulgi Vachva Mulgi Shikva Essay In Marathi
‘ लेक म्हणजे परक्याचं धन ‘ हे वाक्य प्रत्येकाच्याच तोंडी आपण कधी ना कधी ऐकलेलं असतं. जेव्हा एखाद्या घरी मुलीचा जन्म होतो तेव्हा म्हटलं तर जातं की घरात लक्ष्मी जन्माला आली. मात्र त्या लक्ष्मीचा आदर मात्र केला जात नाही. लेक म्हणजे घरची लक्ष्मीच असते. तिच्या येण्याने घर अगदी भरून जात असतं. आजच्या आधुनिक युगामध्ये बहुतांश भागांमध्ये मुलींना मुलांप्रमाणे वागणूक दिली जाते.
मात्र अजूनही काही भाग असा आहे जिथे आजही मुलींना ओझे समजले जाते. घरात मुलगी जन्माला आली तर तिला हुंडा द्यावा लागेल या विचाराने कितीतरी कोवळे जीव जन्माला येण्याआधीच संपवले जातात. गर्भलिंग निदान करून जर तो जीव मुलीचा असेल तर त्या मुलीला, त्या कोवळ्या कळीला गर्भातच खुडले जाते. निसर्गाने जिला जन्मण्याचा हक्क दिला आहे तिचा तो हक्क हिरावून घेणे म्हणजे अपराधच आहे.
आजच्या युगामध्ये हे वारंवार सिद्ध होत आहे की मुलगी आज कुठेच मुलापेक्षा कमी नाही. सरकार देखील लेक वाचवा लेक शिकवा हे अभियान राबवत आहे. सरकार मुलींना मोफत शिक्षण देत आहे. असे म्हटले जाते की मुलीचा आपल्या आईबापांवर फार लळा असतो. आजच्या युगामध्ये हे देखील दिसून येते की आज मुली आपल्या आई-वडिलांना अगदी खंबीरपणे सांभाळत आहेत आणि त्यांची देखभाल करत आहेत.
आपण जर मुलींना शिकवलं घडवलं तर त्या फक्त स्वतःपुरता विचार करत नाहीत तर त्या समाजालाही पुढे घेऊन जायचे काम करत आहेत. म्हणूनच मुलींना शिकवणे खूप गरजेचे आहे.
आजच्या काळामध्ये मुली विज्ञान असो अथवा तंत्रज्ञान असो सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. जेव्हा मुलगी स्वतःचे शिक्षण घेत असते तेव्हा एक पालक म्हणून आपण तिला कायम पाठिंबा दिला पाहिजे. कुठलीही गोष्ट अत्यंत उत्कृष्टपणे करण्याची क्षमता मुलींमध्ये असते. मुलींमध्ये चिवटपणा असतो.
मुली नाजूक असतात पण वेळ पडल्यावर त्या दगडाहून ही कणखर होतात. मुलींमध्ये अमाप सहनशीलता असते. सृजनशीलता हा तर मुलींचा स्थायीभाव आहे.
जेव्हा आपल्या घरी लेक जन्माला येते तेव्हा ते घर म्हणजे स्वर्गच जाणवते. लेकीची ती कोवळी पावले घरात सर्वत्र इकडेतिकडे धुडू धुडू धावत असतात. लेक घरात असली की घर अगदी जिवंत वाटतं. ज्या घरात लेक असते ते घर साक्षात देवी लक्ष्मीचे निवासस्थान आहे असे वाटते. घरातील लेकी वर आईचा जीव असतोच मात्र बाबाची तर ती परीच असते. एखादा पुरुष आपल्या पत्नीला एक वेळ दुखावेल मात्र स्वतःच्या लेकीला तो थोडा त्रास झालेला आहे सहन करू शकत नाही.
लेक आणि बाबांचं अतूट नातं असतं. लेकी शिवाय घराला घरपण नाही असं म्हणतात ते उगाच नाही. अशी ही लेक आपण सर्वांनी शिकवली पाहिजे. आज आपण आपल्या लेकीला शिकवलं तर ती या धावत्या जगामध्ये स्वतःला सिद्ध करून जगू शकेल. जर आपण आपल्या लेकीला योग्य शिक्षण योग्य वयामध्ये दिले नाही तर आपण तिचे नुकसान करतो.
ज्या घरामध्ये लेकीचा जन्म होतो तिथे साक्षात परमेश्वर वास करत असतो अशी आपली परंपरा आहे. आज काल मात्र आपण तंत्रज्ञानाचा गैरवापर करत आहोत असे म्हणायला वावगे ठरणार नाही. गर्भलिंगनिदान चाचणी करून आजकाल अनेक कोवळ्या कळ्या खुडल्या जातात जे की निसर्गचक्राच्या अगदी विरुद्ध आहे.
अशा चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी सरकारने लेक वाचवा लेक शिकवा हे अभियान राबवले ज्या अंतर्गत मुलींवर होणारे अत्याचार थांबवले जातील. चुकीच्या पद्धतीने गर्भलिंग निदान करणारे डॉक्टर्स आणि त्यांची इस्पितळे बंद करण्यात आली. भारतामध्ये विसाव्या शतकात जेव्हा जनगणना करण्यात आली तेव्हा हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ही 900 जवळ होती ज्याचा अर्थ असा होता की भविष्यात प्रत्येक पुरुषामागे स्त्रीची संख्या समान नसेल. हा अनर्थ टाळण्यासाठीच सरकारने हे अभियान राबवले.
लेक वाचवा लेक शिकवा हे एक कौतुकास्पद अभियान राबवले गेले. या अभियाना अंतर्गत अनेक ठिकाणी समुपदेशन करण्यात आले. लोकांच्या मानसिकतेमध्ये यामुळे फरक पडला. मुलगी मुलगा भेदभाव हाणून पाडण्यामध्ये या अभियानाला यश आले. तसेच जेथे मुलीची जबाबदारी पूर्वी उचलली जात नव्हती तेथे मुलींना मिळणाऱ्या सोयी सुविधांमुळे कुटुंबासाठी गोष्टी सोप्या झाल्या. शाळांमधून देखील लेक वाचवा लेक शिकवा हे अभियान राबवले गेले.एकंदरीत लेक वाचवा लेक शिकवा हे एक यशस्वी अभियान ठरले.
Mulgi Vachva Mulgi Shikva Nibandh 10 Lines In Marathi: मुलगी शिकवा मुलगी वाचवा निबंध 10 ओळी
- आपल्या देश हा पुरुषप्रधान संस्कृतीचा असल्यामुळे येथे कायमच स्त्रीला दुय्यम स्थान दिले गेले.
- घरात स्त्रीचा जन्म होणे म्हणजे दुर्भाग्य असे समजले जात होते.
- प्राचीन युगामध्ये मात्र स्त्री म्हणजे देवीचे प्रतीक मानले जात असे आणि जिथे स्त्रीचा जन्म होतो तिथे परमेश्वराचा वास आहे असे मानले जात असे.
- आपल्या आधुनिक देशांमध्ये मात्र स्त्रीचा जन्म हा ओझे समजला जायला लागला होता.
- आपल्या देशामध्ये स्त्रीचा जन्म होऊ नये म्हणून गर्भलिंगनिदान चाचणी करून तो गर्भ खुडला जात असे.
- गर्भलिंगनिदान चाचणीमुळे स्त्री गर्भाचे प्रमाण कमी झाले आणि त्याचा परिणाम हा लोकसंख्येमध्ये स्पष्टपणे जाणवला.
- 2000 च्या जनगणने मध्ये असे दिसून आले की प्रत्येक हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ही केवळ 900 च्या आसपास आहे.
- स्त्रीची संख्या वाढावी म्हणून सरकारने लेक वाचवा लेक शिकवा हे अभियान राबवले या अभियाना अंतर्गत लोकांना विविध सामाजिक माध्यमांद्वारे समुपदेशन देण्यात आले.
- लेक शिकली तर ती समाज पुढे घेऊन जाते याचे महत्त्व लोकांना पटवून देण्यात आले.
- लेक वाचवा लेक शिकवा हे यशस्वीरित्या राबवले गेलेले अभियान आहे या अंतर्गत मुलींना सरकारने मोफत शिक्षण देखील दिले आहे.
आज आपण लेक वाचवा लेक शिकवा या विषयावर 100 ते 500 शब्दांमध्ये आणि दहा ओळींमध्ये निबंध सादर केला आहे. आपणास हा निबंध कसा वाटला हे आम्हाला अभिप्राय देऊन नक्की कळवा. आपला अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद!