My Favourite Animal Cow Essay In Marathi: माझा आवडता प्राणी गाय/ गोमाता

Maza Aawdata Prani Gay :“हंबरून वासराले चाटती जवा गाय,तवा मला तिचे मंदी दिसती माझी माय”

हे गाणे खूप जणांना माहित असेलच खूप जणांनी दूरचित्रवाणीवर हे गाणं पाहिले देखील असेल. गोठ्यात गायीचे दूध पिणाऱ्या वासराकडे पाहून आपल्याला आपली आई आठवते असे या कवीला सांगायचे आहे तो त्या गायीमध्ये आपली आई शोधत आहे असे वाटते.गाय हा प्राणी माझा अत्यंत आवडीचा आहे.

आपल्या भारतामध्ये पांढरा, तांबूस आणि काळा रंग असलेल्या गायी आढळतात. भारतामध्ये देशी गायींना अत्यंत मोठी मागणी असते. देशी गायींपासून तयार झालेले दुग्ध पदार्थ संपूर्ण जगभर मोठ्या आवडीने खाल्ले जातात तसेच त्यांना भरपूर मागणी देखील आहे.

गाय हा एक सस्तन पशु आहे. गायीला चार पाय आणि दोन शिंगे असतात. गायीला हिरवा चारा फार आवडतो. गाय जिथे बांधली जाते त्याला गोठा असे म्हणतात. गाय ही मादा आहे तर तिच्या नरास सांड, बैल किंवा वळू असे संबोधतात. बैल हे शेतात कामासाठी वापरले जातात. गाय ही दुभते जनावर आहे.

गायीकडून आपल्याला दूध मिळते. दुधापासून आपण खरवस, दही, ताक, लोणी तसेच तूप बनवतो.अनेक शेतकरी आपल्या शेतीबरोबर पशुपालन हा जोडधंदा करतात.पशुपालनमध्ये प्रामुख्याने पाळला जाणारा प्राणी म्हणजे गाय होय. गाय ही स्वभावाने शांत प्राणी म्हणून ओळखली जाते.

गायीचे दूध हे पचायला हलके असल्या कारणाने लहान मुलांना गायीचे दूध द्यावे असा सल्ला आपल्याला डॉक्टर देतात.गाईच्या दुधाचे असंख्य फायदे आहेत. पुर्वी गायीच्या शेणाने घर सारवत असत. शेणाच्या वासामुळे घरात कोणत्याही प्रकारचे किडे येत नसत. आजकालच्या पेस्ट कंट्रोल ऐवजी पूर्वीचे गायीचे शेण हे एकदम उत्तम कीडनाशक आहे.भारतामध्ये गायीचे विविध प्रकार आढळतात.

गीर, देवणी, खिल्लारी, साहिवाल , कांकरेज, डांगी, ओंगल हे देशी गायीचे प्रकार भारतात आढळतात. या गायीच्या दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतात आता संकरित जातीच्या गायी देखील उपलब्ध आहेत मात्र त्यांच्या दुधाचा दर्जा हा देशी गायींपेक्षा खालचा असतो.

भारतामध्ये गायीला पूजेचे स्थान मिळाले आहे. कुठलीही गोष्ट पवित्र करायची असेल तर त्या गोष्टीवर गायीचे गोमूत्र शिंपडून तिला शुद्ध केले जाते. काही पूजा विधींमध्ये तर गोमुत्र देखील प्राशन केले जाते.एखादी पूजा करायची असेल तर त्या पूजेमध्ये जे हवन केले जाते त्यामध्ये गायीचे शेण टाकले जाते.

गायीचे श्रीकृष्ण देवाशी असलेले आईचे नाते भारतीय हिंदू पुराणात आढळते. जिथे बाळकृष्ण गायीच्या स्तनांना तोंड लावून तिचे दूध प्राशन करतो.श्री कृष्णाचा पूर्ण वेळ हा गायी चरायला नेण्यामध्ये जात असे. श्री कृष्ण गायींना चरायला सोडत असे आणि स्वतः बासरी वाजवत असे. श्री कृष्णाच्या बासरी मुळे सर्व गायी मंत्रमुग्ध होऊन त्या बासरीच्या सुरावर मस्त डोलत असत.

भारतीय पुराणांमध्ये गायीला आईचा दर्जा देण्यात आलेला आहे. गायीला गौ किंवा गोमाता असे संबोधले जाते. गाय ही पवित्र मानली जाते. आपण एखादी गोष्ट करायला जात असू तर चांगला निष्कर्ष हवा असेल तर गायीच्या मागच्या भागाला स्पर्श करून नमस्कार केला तर कार्यात सिद्धी मिळते असे म्हटले जाते.

आमच्या घरी देखील लक्ष्मी नावाची गाय आहे. तिचा रंग तांबूस आहे. तिला आम्ही दररोज चारा देतो. चारा आणि पाणी पिऊन ती निवांत रवंथ करते. जेव्हा तिला भूक लागते तेव्हा ती मोठ मोठ्याने हंबरडा फोडते. माझ्या घरात लक्ष्मी आम्हा सर्वांची लाडकी आहे.

गायीमध्ये जंगली गायी देखील आढळतात ज्यांना नीलगाय असे म्हणतात. नीलगाय ही प्रामुख्याने गवताळ प्रदेशात आढळते. गायीशी साधर्म्य असणारा मात्र बर्फाळ प्रदेशात आढळणारा आणखी एक प्रकार म्हणजे याक. बर्फाळ प्रदेशात याक हा प्राणी आढळतो तसेच त्याचे दूध अन्न म्हणून देखील वापरले जाते.

गोहत्या करण्यास भारतामध्ये बंदी आहे तसेच गोमांस भक्षण करणे हे हिंदू संस्कृतीमध्ये पाप मानले जाते. भारतात प्रामुख्याने गोहत्या आणि गोमांस बंदी कायदा अस्तित्वात आणला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला देव म्हणून पूजले जाते. अशा या आपल्या गोमातेस जपूया आपली संस्कृती जपूया.

My Favourite Animal Cattle Essay In 10 Line’s

  1. गाय हा माझा अत्यंत आवडतीचा प्राणी आहे कारण गाई ही आपल्या आईप्रमाणे असते.
  2. भारतामध्ये विविध जातींच्या गाई आढळतात जसे की गीर, साहिवाल, खिल्लारी, डांगी.
  3. भारतात देशी गाईचे दूध आणि त्यापासून बनणाऱ्या इतर पदार्थांना भरपूर मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
  4. देशी गाई या वातावरणीय बदलांना योग्य प्रकारे सामोरे जातात म्हणूनच सर्वत्र देशी गायींना जास्त मागणी आहे.
  5. भारतीय हिंदू पुराणांमध्ये गाईला देवाचे स्थान दिले आहे.
  6. भारतीय हिंदू पुराणानुसार गाईमध्ये 33 कोटी देवांचे वास्तव्य आहे असे मानले जाते.
  7. पौराणिक कथांमुळे गाईला जे महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळे भारतामध्ये गोमांस खाणे आणि विकणे यांना कायदेशीर बंदी आहे.
  8. गाय हा अत्यंत गोंडस प्राणी आहे तसेच गाय या प्राण्यांच्या पिल्लास वासरू असे म्हणतात.
  9. गाईचे दूध पचनासारखे असल्यामुळे लहान मुलांना गाईचे दूध आहार म्हणून दिले जाते.
  10. गाईपासून मिळणारे शेण आणि गोमूत्र हे देखील अत्यंत उपयोगी असते आणि भारतात अनेक सणांना याचा वापर केला जातो. .

गाय हा तुमचा आवडता प्राणी का आहे?

गाय ही शांत, निरुपद्रवी व उपयुक्त प्राणी आहे. ती आपल्याला दूध देते आणि भारतीय संस्कृतीत तिला विशेष महत्त्व आहे.

गायीपासून आपल्याला कोणते फायदे मिळतात?

गायीपासून दूध, दही, ताक, तूप मिळते. शेण व मूत्र शेतीसाठी उपयुक्त ठरते.

आपल्या जीवनात गायीचे महत्त्व काय आहे?

गाय आर्थिक, आरोग्यदायी व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची असून ती मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

Leave a Comment