My School Essay In Marathi: माणूस म्हणून समाजात वावरत असताना अशी कितीतरी ठिकाणे असतात जी आपल्यावर कायमची एक छाप सोडून जात असतात. अशाच मोजक्या ठिकाणांपैकी एक म्हणजे शाळा. शाळा म्हणजे माणसाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक होय. माणसाच्या जडणघडणी मध्ये शाळा खूप महत्वाची असते. आज आपण या निबंधमालिकेमध्ये माझी शाळा या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये निबंध सादर करणार आहोत.
My School Essay In Marathi
“ही आवडते मज मना पासुनी शाळा,
लाविते लळा ही जसा माऊली बाळा,
हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी,
ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी”
शाळेमध्ये ही कविता कोणी ऐकली नसेल असे फार क्वचितच लोक असतील. शाळा म्हणजे आठवण आणि आठवण आली की डोळ्यात आपोआप पाणी येतच. शाळेमधील ते शिक्षक आणि आपले मित्र मैत्रिणी यांना आपण कधीच विसरू शकत नाही.
शाळा म्हणजे आपल्या जीवनपटातील एक हसरा अध्याय. शाळा म्हणजे नुसतच शिक्षण देणारी संस्था नाही तर माणूस म्हणून समाजात वावरायला शिकवणारा आपला गुरु. शाळेतले शिक्षक म्हणजे आपल्या जीवनाला लाभलेली सर्वात सुंदर व्यक्ती जी आपल्याला शिकवते सुद्धा आणि आपल्याला घडवते सुद्धा.
शाळा म्हटलं की आपसुकच डोळ्यासमोर उभी राहते ती वर्गाच्या बेंचवर बसून मित्र-मैत्रिणींबरोबर केलेली धमाल मस्ती. शाळा म्हटलं की आठवतो आईने आपल्या सोबत इतरांसाठी करून दिलेला जेवणाचा डबा. शाळा म्हटलं की आठवते सकाळची प्रार्थना. शाळा म्हटलं की आठवतो पि.टी.च्या मास्तरांचा सर्वांना हवाहवा वाटणारा तास. आयुष्यातील आठवणींच्या एका कोपऱ्यात शाळा सदैव असते.
माझी शाळा ही फार सुंदर आहे. माझ्या शाळेमध्ये आम्ही सर्व जण आनंदाने शिक्षण तर घेतोच पण त्याचबरोबर नवनवीन उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आमचे कौशल्य देखील वाढवण्यास आमची शाळा आम्हाला मदत करते. माझ्या शाळेमध्ये भरपूर साऱ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.
फक्त शिक्षण देणे हेच आमच्या शाळेचे उद्दिष्ट नाही तर त्या शिक्षणातून एक चांगला विद्यार्थी घडवणे जो उज्वल भारताचा नागरिक बनेल अशी आमच्या शाळेची विचारधारा आहे. ‘ बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे माझ्या शाळेचे ब्रीदवाक्य आहे. माझ्या शाळेमध्ये जात धर्म प्रांत यावरून कोणामध्येही भेदभाव केला जात नाही. आमच्या शाळेची ही शिकवण विद्यार्थ्यांना सर्वांना समानतेने वागण्याचा मोलाचा संदेश देत राहते. माझ्या शाळेमधून विद्यार्थी समतेचे आणि बंधुत्वाचे धडे घेऊन बाहेर पडतो.
माझ्या शाळेची इमारत अगदी सुसज्ज आहे. माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बैठकीसाठी सुविधा उपलब्ध आहे. माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची सुविधा देखील उपलब्ध आहे.
माझ्या शाळेमध्ये प्रात्यक्षिके करण्यासाठी वैज्ञानिक प्रयोगशाळा देखील आहे. माझी शाळा पारंपारिक ते बरोबर आधुनिकतेलाही तितकेच महत्त्व देते त्यामुळे माझ्या शाळेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा विभाग देखील आहे. माझ्या शाळेमध्ये सर्वांना माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण देखील दिले जाते.
माझ्या शाळेमध्ये आपल्या संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजले पाहिजे यासाठी सारे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. सर्व विद्यार्थ्यांना सर्व धर्मांच्या सणांची माहिती याद्वारे मिळते आणि त्यामुळे सर्व विद्यार्थी एकमेकांच्या सणांचा आदर करतात. सन साजरी करण्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भागाचे भौगोलिक,सांस्कृतिक, ऐतिहासिक ज्ञान मिळते.
माझ्या शाळेमध्ये जगभर चालू असलेल्या वैज्ञानिक प्रयोगाबद्दल माहिती दिली जाते जेणेकरून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर काय सुरू आहे याबद्दल माहिती कळते. माझ्या शाळेमध्ये मुलांना क्रीडा क्षेत्रामधील ही माहिती दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांना खेळांमध्ये रुची आहे अशा विद्यार्थ्यांच्या कलेचे अवलोकन केले जाते आणि त्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी जे परिश्रम घ्यावे लागतात त्यावर मार्गदर्शन केले जाते.
माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाचे ओझे वाटेल असे शिक्षण दिले जात नाही या उलट विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची वाटली पाहिजे अशा पद्धतीने विषयाची आवड निर्माण केली जाते. माझ्या शाळेमध्ये विविध प्रकारच्या भाषा शिकवल्या जातात. कोणती भाषा आत्मसात करायची यावर निर्बंध नाहीत.
माझ्या शाळेमध्ये आम्हाला शिकवणारे सारे शिक्षक वर्ग हे त्या त्या विषयांमध्ये प्राविण्य मिळवलेले आहेत. आम्हाला कोणताही विषय अगदी सहज सोप्या भाषेत समजावण्यामध्ये ते माहीर आहेत. आमच्या वर्ग शिक्षकांची शिकवण्याची हातोटी फारच उत्कृष्ट आहे.
आमचे शिक्षक आम्हाला मित्राप्रमाणे समजावून सांगतात त्यामुळे आम्हाला काहीही प्रश्न पडले तरी आम्ही न घाबरता आमच्या शिक्षकांजवळ बोलू शकतो. असे शिक्षक लाभणं म्हणजे आमचे भाग्यच आहे. माझ्या शाळेमध्ये वर्ग पाठ, गृहपाठ यांचा तगादा नसतो याउलट हसत खेळत शिक्षण दिले जाते.
माझ्या शाळेमध्ये पोपटपंची करून विषय पाठ करण्यापेक्षा तो समजून उमजून आत्मसात करण्याला महत्त्व दिले जाते.
माझी शाळा निव्वळ परीक्षेतील गुणांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करत नाही तर विद्यार्थ्यांच्या कला आणि कौशल्य यांवर त्यांचे मूल्यमापन करते . अशी ही माझी शाळा मला फार फार आवडते.
Majhi Shala Nibandh In Marathi 10 Lines: माझी शाळा १० ओळी निबंध
- माझी शाळा रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.
- गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे आणि सर्व प्रवाहातील लोक शिक्षणाच्या कक्षेत यावेत म्हणून ही शाळा सुरू करण्यात आली.
- माझ्या शाळेमधून आजवर कितीतरी जागरूक भारतीय नागरिक जन्माला आले आहेत.
- माझ्या शाळेने केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर व्यावहारिक ज्ञान देऊन विद्यार्थी घडवले आहेत.
- माझी शाळा विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याच्या विकासावर देखील फार भर देते.
- माझे वर्गमित्र मैत्रीण हे सर्वजण अभ्यासामध्ये मला मदत करतात.
- माझ्या शाळेमधील शिक्षक वर्ग आम्हाला अवघड वाटलेला एखादा विषय अगदी सहजपणे समजावून सांगतात.
- माझ्या शाळेमध्ये विविध क्रीडा खेळांचे देखील प्रशिक्षण दिले जाते.
- माझ्या शाळेमध्ये संगीत विषयक शिक्षण देखील उपलब्ध आहे.
- माझी शाळा आम्हा विद्यार्थ्यांना समता आणि बंधुत्व शिकवते. अशी ही माझी शाळा मला मनापासून फार फार आवडते.
आज आपण माझी शाळा या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये तसेच दहा ओळींमध्ये निबंध पाहिला आहे. आपणा सर्वांना शैक्षणिक स्तरावर याचा उपयोग होईल अशी आशा आहे. आपणा सर्वांना आमच्या निबंध मालिकेतील माझी शाळा हा निबंध कसा वाटला हे आम्हाला अभिप्राय देऊन नक्की कळवा. आपला अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. धन्यवाद!