My Sister Essay In Marathi: माझी ताई निबंध मराठी १०० शब्द आणि १० ओळींमध्ये

Majhi Bahin Essay In Marathi: आपल्या सर्वांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर काही खास व्यक्ती भेटतात पुढे आपली आणि त्यांची मैत्री होते आणि पुढे ती आयुष्यभर टिकून राहते तशीच आपल्या जन्मबरोबर जोडली गेलेली आपली मैत्रीण म्हणजे आपली बहीण . बहिणी सोबतच नात म्हणजे मैत्री पलीकडचं प्रेम आणि त्याच हक्काचे रुसवे फुगवे सुद्धा. आज आपण माझी बहीण या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये निबंध लिहिलेला आहे. त्याचा वापर तुम्ही शालेय निबंध लेखनासाठी करू शकता.

My Sister Essay In Marathi | माझी बहीण मराठी निबंध

बहीण म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती आईची सावली म्हणजेच माझी ताई . माझी बहीण तिला मी ताई नावाने हाक मारते. माझी बहीण माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. माझी आई खूप कामात असेल तेव्हा माझी बहीण आम्हा भावंडांना जबाबदारीने सांभाळते. माझी बहीण जणू काही माझी दुसरी आईच आहे.

माझी बहीण शाळेत देखील अत्यंत हुशार आहे. आम्ही दोघीही एकाच शाळेत जातो. माझी बहीण ही शाळेमध्ये एक आदर्श विद्यार्थिनी आहे. शाळेमध्ये सर्वाना तिचा आदर्श दिला जातो. माझ्या बहिणीकडे पाहून मला नेहमी वाटते की मी देखील तिच्यासारखी सर्वांच्या कौतुकाला पात्र होण्याकरता प्रयत्न करणार.

माझ्या बहिणीची चित्रकला एकदम सुंदर आहे. माझ्या चित्रकलेच्या वही मध्ये मी तिच्याकडूनच सुंदर सुंदर चित्रे काढून घेते. चित्रकलेबरोबरच माझ्या ताईला सुंदर रांगोळी आणि मेहंदी काढता येते. कधी कोणता सण असेल तर ती आवर्जून दारापुढे रांगोळी काढते. रात्री झोपताना माझ्या हातावर ती मेहंदी काढते. माझी बहीण कायमच माझ्या सोबत असते .

आईने घरी केलेला एखादा गोड खाऊ मला फार आवडला असेल तर ती तिच्या वाट्याचा खाऊ देखील मला देते. तिचे माझ्यावरील प्रेम हे पूर्णपणे निःस्वार्थी आहे. माझ्या बहिणीला गाणे ऐकायला आणि गायला फार आवडते. माझ्या बहिणीला संगीतामध्ये रुची आहे. आम्ही तिला आमच्या घरातील गानकोकिळा असे देखील संबोधतो. माझ्या घरी जेव्हा देवाचे कार्यक्रम असतात तेव्हा ती तिच्या मधुर आवाजामध्ये अभंग आणि ओव्या गाते .

जेव्हा माझी आई माझ्यावर चिडली असेल अथवा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माझी बहीण एखाद्या ढालीप्रमाणे मला आईच्या मारापासून वाचवते. वेळप्रसंगी आईचा मार तिला देखील खावा लागतो पण ती माझी बहीण म्हणून कायमच माझी पाठराखण करत असते. माझी बहीण आमच्या नात्यामध्ये कायम प्रेमाचा वर्षाव करत असते.

माझी बहीण माझ्या बाबांची खूप लाडकी आहे. ती घरातील सर्वांना सतत मदत करत असते. तिचा स्वभाव फारच छान आहे. माझ्या बहिणीला निसर्गाबद्दल फार आदर आहे. ती नेहमी निसर्ग चांगला राहिला पाहिजे याकडे कटाक्षाने लक्ष देत असते.

आम्ही कधी बाहेर फिरायला गेलो तरी प्रवासात जमा होणारा कचरा ती कोणालाही रस्त्यात मध्ये टाकू देत नाही ती सर्व कचरा गोळा करते आणि तो कचरा कचराकुंडीत टाकते. ती जे उपदेश करते तशीच स्वतःदेखील आचरणात आणते.”बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले ” ही उक्ती तिला अगदी तंतोतंत लागू पडते.

माझी बहीण माझ्या आजी आणि आईचा वारसा पुढे नेत आहे त्यामुळे माझी आई देखील माझ्या बहिणीला कायम चांगल्या गोष्टी शिकवत राहत असते. माझ्या बहिणीला कधीही कोणत्याही वेळी काही काम सांगितले तर ती लगेचच ते काम करण्यास तयार होते. ती काम करण्यामध्ये अगदी पटाईत आहे.

माझी बहीण घरातील कामे अगदी चपळाईने करत असतो. घरी जेव्हा केव्हा पाहुणे येतात ते देखील माझ्या बहिणीचे अगदी तोंड भरून कौतुक करतात. माझी बहीण अभ्यासात देखील कायम पहिला क्रमांक काढता असते.

माझे आजोबा आणि आजी माझ्या बहिणीला देवांची पुस्तके दिवेलागणीला वाचायला सांगतात. तिचे संस्कृत शब्दांचे उच्चार ही एकंदम व्यवस्थित असतात. तिचे उच्चार ऐकून भगवंताचरणी मन तल्लीन होऊन जाते. माझ्या बहिणीला पावसाळा हा ऋतू फार आवडतो आणि पावसात भिजायला देखील फार फार आवडते. पावसामध्ये सर्व निसर्ग हिरवाईने नटतो आणि ते पाहून माझी ताई खूप खुश होते. अशी ही निर्मळ मनाची माझी बहीण निसर्गाप्रमाणेच फार मोठ्या मनाची आहे.

My Sister Nibandh In Marathi 10 Lines

  1. माझी बहीण माझ्या घरात सर्वांची लाडकी आहे.
  2. माझी बहीण एक आदर्श विद्यार्थिनी आहे आणि तिचे उदाहरण शाळेत नेहमी दिले जाते
  3. माझ्या बहिणीला पावसाळा ऋतू फार आवडतो.
  4. पावसामध्ये हिरवाईने नटलेला निसर्ग पहायला आणि पावसात भिजायला माझ्या बहिणीला फार आवडते.
  5. माझी बहीण मला कायम प्रत्येक गोष्टीमध्ये सांभाळून घेत असते.
  6. माझी बहीण माझ्या आईला घरातील सर्व कामामध्ये मदत करत असते.
  7. माझे बाबा माझ्या बहिणीवर फार प्रेम करतात कारण ती बाबांना कायम अभिमान होईल अशी वागणूक ठेवते.
  8. माझे आजी आजोबा माझ्या बहिणीला अभंग ओव्या गायला सांगतात कारण तिला या सर्व गोष्टींची खूप आवड आहे.
  9. माझी बहीण कायम मला माझ्या आईच्या मारापासून वाचवत असते.
  10. माझ्या बहिणीला मोठे होऊन डॉक्टर बनून जनसामान्यांची सेवा करायची आहे.

आज आपण, ‘ माझी बहीण ‘ या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये आणि दहा ओळींमध्ये निबंध सादर केलेला आहे. तुम्हाला हा निबंध आवडला का नाही हे आम्हाला अभिप्राय देऊन नक्की कळवा. आपला अभिप्राय आमच्यासाठी महत्वाचा आहे. धन्यवाद!

Leave a Comment