Online Education Essay In Marathi: ऑनलाईन शिक्षण मराठी निबंध

Online Shikshan Essay In Marathi: मित्रांनो, आज शिक्षणामुळे माणूस भरपूर मोठा झाला आहे. पूर्वी ज्याच्याकडे सर्वात जास्त पैसा असेल त्याला श्रीमंत समजले जात असे मात्र ज्याच्याकडे ज्ञान असते तो सर्वात श्रीमंत असतो असे आत्ताचा काळ सांगतो. तुमच्याजवळ पैसा असेल मात्र तो कसा वापरायचा याचे ज्ञान तुम्हाला नसेल तर त्या पैशांचा काहीच उपयोग होत नाही. काळाने देखील वारंवार हे सिद्ध केले आहे की शिक्षणाने माणूस समृद्ध होत असतो. शिक्षण देण्याची माध्यमे आजच्या आधुनिक काळामध्ये बदलली गेली आहेत. जुन्या काळात गुरुकुलामध्ये शिक्षण दिले जात असे पुढे त्याची जागा शाळांनी घेतली. आता तुम्ही घरबसल्या देखील हवे ते शिक्षण घेऊ शकता. तुम्ही घरबसल्या शिक्षण घेणे शक्य झाले आहे ते आजच्या आधुनिक ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे.

2020 मध्ये कोरोना मुळे जगामध्ये हाहाकार माजला होता. अनेक लोकांना या आजारामुळे स्वतःचे प्राण गमवावे लागले होते. कोणी कोणाशी बोलायला देखील या काळामध्ये परवानगी नव्हती. प्रत्येक जण आपल्या घरामध्ये बंदिस्त जीवन जगत होता. अशावेळी शैक्षणिक संस्थांची हालत देखील अत्यंत वाईट झाली होती. मुलांना शाळांमध्ये प्रवेश घेणे तसेच शिक्षण घेणे अवघड होऊन बसले होते. अशावेळी आपली नवीन पिढी जी उद्याचा उज्वल भारत आहे ती शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब अनेक शाळांनी तसेच कॉलेज यांनी केला.

कोरोनापूर्वी देखील काही डिजिटल माध्यम ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करत होते. मात्र कोरोनामुळे सर्वांनाच ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व समजले. कोरोना काळात अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले जे शिक्षणासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला दुवा ठरले. Zoom, Google meet या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे अनेकांना घरबसल्या शिक्षण घेणे सोपे झाले.

शिक्षकांनी मुलांना या डिजिटल माध्यमांमधून शिक्षण दिले त्यामुळे शिक्षणाचा स्त्रोत अबाधित राहिला. ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी देखील काही बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण लक्ष हे शिक्षकांवर आणि अभ्यासावर ठेवले पाहिजे. जर विद्यार्थी या ऑनलाइन पद्धतीचा वापर शिक्षणाऐवजी चुकीच्या गोष्टींसाठी करत असतील तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचे वैयक्तिक नुकसान होते.

ऑनलाइन शिक्षण पद्धती ही तुम्हाला घरबसल्या अगदी आरामांमध्ये शिक्षण घेण्यासाठी निर्माण झालेली आहे. आज काल तर अनेक जागतिक दर्जाची विद्यापीठे देखील आपल्याला ऑनलाइन पद्धतीने विविध कोर्सेस चे शिक्षण देतात. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे पूर्वीची शाळा सक्तीची शिक्षण पद्धत आपोआपच कमी होत जात आहे. आज-काल तुम्ही घरबसल्या जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून योग्य शिक्षण घेऊ शकता.

ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला एक गोष्ट मात्र ध्यानात घ्यावी लागते ती म्हणजे तुम्ही ज्या संस्थेमार्फत ऑनलाइन शिक्षण घेत आहात ती विश्वासार्ह असली पाहिजे. आज-काल अनेक ठिकाणी सायबर गुन्हे वाढत चालले आहेत. तुम्ही जेव्हा कोठेही शिक्षणासाठी नाव नोंदणी डिजिटल पद्धतीने करता, तेव्हा आपली आर्थिक माहिती सांगताना खबरदारी बाळगली पाहिजे तसेच ज्या संस्थेमार्फत अथवा ज्या विद्यापीठाकडून तुम्हाला सर्टिफिकेशन मिळणार आहे ती शासकीय नोंद असलेली आहे की नाही याचे भान बाळगणे गरजेचे आहे.

ऑनलाइन शिक्षण पद्धतीचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत मात्र आपण एक शिक्षित समाज म्हणून कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्याचा सारासार विचार करून मगच एखादा निर्णय घेणे हे फायद्याचे ठरते. आज-काल नोकरदार लोकांना देखील त्यांचे स्किल्स वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या कोर्सेस ची आवश्यकता असते. आज काल तुम्हाला अनेक पोर्टलवर नोकरीसाठी आवश्यक असणारे कोर्सेस उपलब्ध असल्याच्या जाहिराती दिल्या जातात मात्र स्वतः पूर्ण अभ्यास केल्याशिवाय अशा कोणत्याही कोर्सेस साठी पैसे गुंतवणे हे कदाचित धोक्याचे ठरू शकते.

ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये तुमचा वेळ वाचला जातो. काही ठिकाणी ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी आणि शिक्षक हा संवाद नसल्यामुळे विषयाचे आकलन होण्यास थोडा उशीर होतो अथवा काही गोष्टी पूर्णपणे समजत नाहीत. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये इंटरनेटचा वापर असल्यामुळे जर कधी इंटरनेट उपलब्ध नसेल तर विद्यार्थ्यांची अडचण होऊ शकते. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये इंटरनेट अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असते.

ऑफिसेस मध्ये देखील लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच LMS द्वारे ऑनलाइन शिक्षण दिले जाते.तुम्ही जर एखाद्या ठिकाणी फिरायला गेला असाल आणि ऑफिसमध्ये काही महत्त्वाचे ट्रेनिंग असतील तर अशावेळी ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे तुम्ही कोठेही असलात तरी ते अटेंड करू शकता. अशाप्रकारे ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा योग्य आणि समंजसपणे वापर केला तर तो आपल्या अत्यंत फायद्याचा आहे.

ऑनलाईन शिक्षण मराठी निबंध 10 ओळी

  1. आजच्या काळामध्ये ऑनलाइन शिक्षण ही काळाची गरज बनलेली आहे.
  2. 2020 मध्ये आलेल्या कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठे बदल झाले.
  3. ऑनलाइन शिक्षण पद्धती देणारे अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झाले आहेत.
  4. जागतिक दर्जाची विद्यापीठे देखील आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देत आहेत.
  5. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण घेणे शक्य झाले आहे.
  6. ऑनलाइन शिक्षण पद्धत ही इंटरनेट शिवाय अपुरी आहे.
  7. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांमधील संवाद कमी होतो.
  8. ऑफिस मध्ये लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम द्वारे ऑनलाइन शिक्षण दिले जाते.
  9. तुम्ही जर ऑनलाईन शिक्षण पद्धतीने शिक्षण घेत असाल तर विद्यापीठाची विश्वासार्हता तपासून घेणे गरजेचे आहे.
  10. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांनी जागरूक राहून शिक्षण घेणे गरजेचे आहे तसेच इंटरनेटचा गैरवापर टाळून आपल्या अभ्यासाचा वेळ हा केवळ शिक्षणावर खर्च करणे गरजेचे आहे.

ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा काय फायदा होतो?

ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण घेता येते तसेच जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कोठेही शिक्षण घेता येते.

ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये कोण महत्त्वाची भूमिका बजावत आहे?

ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये इंटरनेट ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

ऑफिसमध्ये ऑनलाइन शिक्षणासाठी कोणते माध्यम वापरले जाते?

ऑफिसमध्ये ऑनलाइन शिक्षण हे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच LMS द्वारे दिले जाते.

Leave a Comment