Pandit Jawaharlal Nehru Essay In Marathi: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध

Pandit Jawaharlal Nehru Nibandh In Marathi: पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी उत्तर प्रदेश येथील प्रयागराज मध्ये झाला. विख्यात वकील मोतीलाल नेहरू यांच्या पोटी पंडित जवाहलाल नेहरू यांचा जन्म झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे कुटुंब सधन होते. लहानपणापासूनच त्यांना घरीच शिक्षण मिळत गेले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या घरी येऊन शिक्षक त्यांना शिकवून जात असतात असे ते वयाचे 15 वर्ष होईपर्यंत घरी शिक्षण घेत होते. पुढे ते शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. पुढे केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी नॅचरल सायन्स या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली. 1912 मध्ये नेहरू भारतात परतले आणि त्यांनी भारतीय राजकारणामध्ये उडी घेतली.

‘ बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ‘ ही उक्ती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी अत्यंत शोभून दिसते. अगदी लहानपणापासूनच त्यांना समाजाबद्दल कनव होती तसेच स्वतःच्या जबाबदाऱ्यांची जाणीव देखील होती. त्यांच्या बालपणीचे काही किस्से आहेत ज्या मधून त्यांना समाजाबद्दल असलेली भूतदया तसेच ते स्वतः आत्मनिर्भर होते हे दिसून येते.
त्यांच्या घरात पिंजऱ्यामध्ये एक पक्षी होता.

त्या पक्षावर लक्ष ठेवण्याचे काम आणि त्याला वेळच्यावेळी खाऊ देण्याचे काम त्यांच्या घरातील माळी काकांना देण्यात आले होते. एके दिवशी ते माळी काका घरात नसताना तो पक्षी जोर जोरात ओरडत होता. पक्षाचा आवाज ऐकून नेहरूंनी पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि पक्षी उडून गेला. पक्षी उडून गेल्यानंतर जेव्हा मालिका तिथे आले आणि त्यांना विचारले की तुम्ही पिंजऱ्याचा दरवाजा का उघडला? तेव्हा नेहरूंनी उत्तर दिले की इथे सर्व मनुष्यांना स्वातंत्र्य हवे आहे तर आपण त्यांना ते स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झगडत आहोत मग पक्षांना स्वातंत्र्य का देऊ नये.

पंडित नेहरूंच्या बालपणीचा अजून एक किस्सा प्रसिद्ध आहे. पंडित नेहरूंच्या बुटांना त्यांनी स्वतः पॉलिश केले आणि ते काम करत असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना हे छोटे काम तू का करत आहेस असा प्रश्न विचारला त्यावर पंडित नेहरूंनी उत्तर दिले की अशी छोटी कामे आपली आपल्यालाच करता यायला हवीत यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही यातून नेहरूंचा आत्मनिर्भरपणा दिसून येतो.

पंडित नेहरू आणि गांधीजींची प्रथम भेट ही 1916 मध्ये झाली होती. गांधीजींच्या भेटीमुळे पंडित नेहरू फार प्रेरित झाले. पुढे असहकार आंदोलनावेळी पंडित नेहरू देखील दोन वेळा तुरुंगामध्ये गेले. 15 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांचा दृष्टिकोन अगदी व्यापक होता. पंडित नेहरू यांनी भारताला जागतिक स्तरावर आणण्यासाठी प्रयत्न केले.

पंडित नेहरूंची ओळख ही उदारमतवादी, विज्ञानवादी, पुरोगामी विचारसरणी असलेले महान व्यक्ती अशी होती. पंडित नेहरू यांचा ओढा विज्ञानाकडे होता. पंडित नेहरू हे लहान मुलांना राष्ट्राची संपत्ती म्हणत असत. जर ही मुले योग्य घडली तर देश चांगला घडतो अशी त्यांची शिकवण होती.

त्यांनी भारताची जडणघडण होण्यात सर्वात मोठी भूमिका बजावणाऱ्या शिक्षण संस्थांची निर्मिती करण्याची कल्पना मांडली आणि ती पूर्ण देखील केली. भारतीय आयुर्विज्ञान विकास संस्था (AIIMS), भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) आणि भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) या संस्थांच्या निर्मितीची संकल्पना ही पंडित नेहरूंचीच होती.

भारत हा स्वतंत्र देश आहे. भारताची विचारसरणी देखील स्वतंत्र आहे आणि भारतावर इतर कोणत्याही देशाने वर्चस्व लादण्याचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडला जाईल असे नेहरूंचे कायम म्हणणे होते. एक उत्कृष्ट राजकारणी तर ते होतेच पण त्याबरोबर पंडित नेहरू हे एक उत्कृष्ट लेखक देखील होते.

त्यांनी लिहिलेले त्यांचे आत्मचरित्र तसेच ‘ अ लेटर फ्रॉम फादर टू हीस डॉटर ‘ हे पुस्तक देखील प्रसिद्ध आहे. पंडित नेहरू यांनी लिहिलेले बालसाहित्य देखील प्रसिद्ध आहे. पंडित नेहरूंना लहान मुले फार आवडत. पंडित नेहरूंचा जन्मदिन हा बाल दिन म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो.

पंडित नेहरूंना चाचा नेहरू म्हणून देखील बोलावले जात असे. असे हे सर्वांचे लाडके चाचा नेहरू 27 मे 1964 रोजी आपल्या सर्वांना एक सुंदर भारत देऊन आपल्यातून निघून गेले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नवीन भारत साकारताना जी आव्हाने आली त्यांचा सामना करून एक उत्कृष्ट भारत निर्माण केला.

अटल बिहारी वाजपेयी यांनी पंडित नेहरू यांना भारताचे राजकुमार असे म्हटले आहे. नेहरूंची कपडे घालण्याची एक विशिष्ट शैली होती जी आजही भारतीयांमध्ये लोकप्रिय आहे. गांधी टोपी आणि नेहरू जॅकेट असा त्यांचा पेहराव होता जो आज उत्तर प्रदेश मध्ये औपचारिक पेहराव म्हणून वापरला जातो. असे हे आपल्या सर्वांचे लाडके चाचा नेहरू होते.

पंडित जवाहरलाल नेहरू १० ओळी निबंध मराठी

  1. पंडित नेहरू यांचे संपूर्ण नाव पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे होते.
  2. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे झाला.
  3. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू हे ख्यातनाम वकील होते तसेच त्यांचे कुटुंब सधन होते.
  4. पंडित नेहरू यांनी केंब्रिज विद्यापीठातून नॅचरल सायन्स या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली होती.
  5. भारतात परतल्यानंतर पंडित नेहरू यांनी राजकारणामध्ये उडी घेतली आणि गांधीजींच्या साथीने त्यांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये स्वतःला झोकून दिले.
  6. पंडित जवाहरलाल नेहरू हे असहकार आंदोलन, भारत छोडो या चळवळींमध्ये सामील झाले.
  7. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरू यांनी शपथ घेतली.
  8. पंडित नेहरू हे लहान मुलांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते त्यांना मुले चाचा नेहरू म्हणत असत.
  9. पंडित नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर भारतामध्ये बालदिन म्हणून साजरा केला जातो.
  10. मुले ही राष्ट्राची संपत्ती आहेत , मुलांना जर चांगले घडवले तर देश घडेल असे पंडित नेहरू म्हणत असत.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पूर्ण नाव काय होते?

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे होते.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली?

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणू शपथ घेतली.

अटल बिहारी वाजपेयी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना काय संबोधले होते?

अटल बिहारी वाजपेयी यांनी पंडित नेहरू यांना भारताचे राजकुमार म्हणून संबोधले होते.

Leave a Comment