Rajkarnat Yuvakancha Sahbhag Speech Marathi: व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय गुरुजन वर्ग, माझे सह अध्यायी तसेच येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. आज आपण युवकांचा राजकारणातील सहभाग या विषयावर चर्चा करणार आहोत.
मित्रांनो आज जगामध्ये सर्वत्र अनिश्चिततेची परिस्थिती दिसते. ही अनिश्चितता तयार होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत जसे की काही निर्णय हे देशाचे हित लक्षात न घेता स्वार्थीपणे आपला हेका पुढे करण्यासाठी घेतले गेलेले निर्णय.
देश चालवत असताना कित्येकदा देशातील वयस्कर राजकारणी लोक हे फक्त स्वतःचे विचार इतरांवर लादून त्यातून नियम बनवत असतात. हे वयस्कर लोक काळाच्या बदलाला मान्य करण्यास तयार होत नाहीत आणि परिणामी त्यातून देशाचे हित देखील साधले जात नाही.देशाचे युवक हे त्या देशाची खरी संपत्ती आहे असे आपल्या देशात मानले जाते.
युवकांवरती देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेली मोठी जबाबदारी आढळून येते. जर तरुण लोक देशाचा आर्थिक विकास साधू शकतात तर मग त्यांना देशातील राजकारणामध्ये देखील सहभागी करून घेणे हे देशातील वयस्कर राजकारणी लोकांचे कर्तव्य असले पाहिजे.
देशापुढे कोणीच मोठा नसतो हे सत्य आहे आणि म्हणूनच देशांमधील राजकारणामध्ये युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.भारत हा मूल्य टिकवून ठेवलेला देश आहे. आज भारत जागतिक पटलावरती एक विकसित देश म्हणून उभा राहण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र भारतामधील काही गोष्टींमुळे भारत हा मागे पडत आहे.
भारतात आज देखील धर्म आणि जात यांवरून सर्वत्र संघर्ष दिसून येतो. वास्तविक पाहता भारतामध्ये अनेक जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात मात्र काही राजकीय पक्ष् स्वतःच्या बाजूने मतदान होण्यासाठी लोकांमध्ये जातीय आणि धार्मिक वाद निर्माण करतात अशावेळी जर देशातील युवक जागा राहिला आणि त्याने हा जात आणि धर्म विषय बाजूला करून विकास या विषयावर राजकारण केले तर ते भारतासाठी निश्चितच हिताचे ठरेल.
आज आपण पाहतो की कित्येक युवक जे राजकारणामध्ये सक्रिय आहेत ते जात आणि धर्म या पलीकडे जाऊन विकास आणि शिक्षण या मुद्द्यांवर भाष्य करतात आणि ही खरेच देशासाठी कौतुकाची गोष्ट आहे.
निर्भया प्रकरण तर आपल्या सर्वांना माहीत आहे, या प्रकरणांमध्ये निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी तरुणाई एकत्र आली होती आणि त्यामुळेच आज निर्भयाला न्याय मिळाला आहे. जिथे राजकीय शक्ती कमी पडते अथवा निष्क्रिय ठरते त्या त्या प्रत्येक वेळी देशातील युवक हा जागा झालेला आहे आणि त्याने स्वतःचा न्याय स्वतः मिळवलेला आहे.
आज भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 60 टक्क्यांहून जास्त लोकसंख्या ही तरुणाईची आहे. भारताने जर या देशातील युवकांचा आणि त्यांच्या ताकदीचा योग्य वापर करून घेतला तर भारत हा जगामध्ये प्रथम क्रमांकावर गणला जाईल.
भारतीय युवकांनी देखील राजकारणाला गलिच्छ न समजता तो समाजासाठी बदल घडवून आणण्याचा रस्ता आहे असे मानले पाहिजे.आजच्या काळामध्ये जिथे नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि त्याची जास्तीत जास्त माहिती ही तरुण पिढीला आहे किंबहुना तरुण पिढी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या रोजच्या जीवनामध्ये देखील करते. अशावेळी हे नवीन तंत्रज्ञान आणि याची देशाला होणारी उपयुक्तता तरुण पिढी इतके कोणीच समजू शकत नाही.
आजचा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा काळ आहे. या एआय च्या प्रगत तंत्रज्ञाना बद्दल तरुण पिढीला जबरदस्त आकर्षण आहे आणि त्याचा कित्येकदा केलेला वापर देखील आपण पाहत आहोत. ए आय मुळे आज अनेक अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी देखील अगदी सहज घडवू शकतो.
जर भारतातील युवकांनी या ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशामध्ये आरोग्य सुविधांमध्ये काही क्रांती आणली तर त्याचा देशाला निश्चित फायदा होईल.भारतीय युवकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना युवकांचे योगदान मोठे राहिले पाहिजे याचाच अर्थ भारताच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी एकत्र येणे हा भारताचा इतिहास आहे.
देशातील राजकारणामध्ये युवकांनी सहभाग नोंदवल्याशिवाय देशाचे चित्र आजवर पालटले नाही आणि पुढेही पालटू शकत नाही म्हणून देशाच्या भल्यासाठी आणि विकासासाठी जास्तीत जास्त युवकांनी राजकारणामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे.
राजकारण आणि युवक सहभाग भाषण मराठी 10 ओळी
- देशाचे युवक ही देशाची खरी संपत्ती मानली जाते आणि म्हणूनच त्यांनी देशाच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.
- भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना अनेक युवक आणि युवतींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले होते.
- आज स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारताला तरुणाईच्या सळसळत्या रक्ताची देशाच्या विकासासाठी अत्यंत गरज आहे.
- भारतातील युवक हा देशाचे आर्थिक राजकारण चालवण्यास सक्षम आहे त्याचप्रमाणे देश चालवण्यासाठी देखील सक्षम आहे.
- राजकारणाला सुरुवातीपासूनच नाव ठेवले जाते मात्र जोवर भारतीय युवक त्यामध्ये उतरणार नाही तोवर त्याला अपेक्षित असणारे बदल सामाजिक जीवनात दिसणार नाहीत.
- जेव्हा एक सुशिक्षित युवक राजकारणामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला असलेले ज्ञान आणि अनुभव याचा वापर तो देशाच्या हितासाठी करतो.
- विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये झालेली प्रगती आज कालच्या युवकांना देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करू शकते.
- देशाला विकसित करण्यासाठी युवकांच्या नजरेत असलेला नवीन भारत घडवण्याची आवश्यकता आहे.
- भारतात मागील दहा वर्षांमध्ये जी आंदोलने झाली त्यामध्ये युवकांचा सहभाग हा वाखाणण्याजोगा होता.
- युवकांच्या राजकारणातील सहभागामुळे झोपलेली व्यवस्था खाडकन जागी होते परिणामी त्यातून देशाचा विकास साधला जातो.
प्रश्न 3: राजकारणामध्ये युवकांचा सहभाग का गरजेचा आहे?
उत्तर: राजकारणामध्ये युवकांचा सहभाग झाल्यास झोपलेली व्यवस्था खाडकन जागी होते आणि त्यातून देशाचा विकास साधला जातो म्हणून राजकारणामध्ये युवकांचा सहभाग असणे गरजेचे आहे.
भारत देशामध्ये युवकांबद्दल काय मान्यता प्रचलित आहे
युवक हे देशाची संपत्ती आहेत अशी मान्यता भारत देशामध्ये प्रचलित आहे.
राजकारणामध्ये युवक प्रामुख्याने कोणत्या गोष्टींवर भाष्य करतात?
राजकारणामध्ये युवक हे प्रामुख्याने शिक्षण आणि विकास या गोष्टींवर भाष्य करतात.
राजकारणामध्ये युवकांचा सहभाग का गरजेचा आहे?
राजकारणामध्ये युवकांचा सहभाग झाल्यास झोपलेली व्यवस्था खाडकन जागी होते आणि त्यातून देशाचा विकास साधला जातो म्हणून राजकारणामध्ये युवकांचा सहभाग असणे गरजेचे आहे