Sainikachi Atmakatha Essay in Marathi: सैनिकाचे मनोगत निबंध मराठी

Essay On Sainikache Manogat In Marathi: माझ्या देश बांधवांनो आज एक सैनिक म्हणून मी तुमच्याशी हितगुज करायचं ठरवले आहे. तुम्ही आम्हा सैनिकांविषयी बातम्यांमध्ये रोज ऐकत असालच . भारतीय सेनादलातील शूरवीरांच्या आख्यायिका बातम्यांमध्ये झळकताना तुमचा उर देखील भरून येत असेल. आम्ही सैन्यामध्ये कार्यरत असताना आम्हाला काय काय गोष्टींना सामोरे जावे लागते हे मी आज तुम्हाला सांगणार आहे.

मित्रांनो मी महाराष्ट्रातील एका छोट्याशा खेडेगावातील तरुण आहे. माझ्या देखील घरी माझे संपूर्ण कुटुंब आहे. माझी आई वडील शेतात राबून घराची उपजीविका चालवत. माझ्या आई-वडिलांचे कष्ट पाहून मला कायमच त्यांच्यासाठी काहीतरी करायचे असा विचार मनात येत असे. शाळेमध्ये देखील सैनिकांविषयी असलेला आदरभाव मला जाणवत होता आणि म्हणूनच मी माझ्या लहानपणीच मला सैनिक व्हायचे असे ठरवले होते.

शालेय शिक्षण पूर्ण करताना मी दररोज व्यायाम करून स्वतःचे शरीर पिळदार बनवण्याकडे भर दिला. मी रोज संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर धावण्याचा सराव देखील करत असे. पुढे जेव्हा सैन्यभरतीच्या जाहिरातीत निघाल्या तेव्हा मी देखील तेथे जाऊन शारीरिक परीक्षा आणि लेखी परीक्षा दिल्या.

जेव्हा माझा निकाल लागला तेव्हा मी सैनिक या पदासाठी निवडला गेलो हे मला कळाले. माझ्या घरातील सर्वांनाच या गोष्टीमुळे आनंद झाला आणि सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. सैनिक म्हणून माझी निवड मराठा रेजिमेंट मध्ये करण्यात आली. निवड झाल्यानंतर आम्हाला योग्य ते प्रशिक्षण दिले गेले. प्रशिक्षणाचा काळ हा मोठा कठीण होता. जसे आपण दूरचित्रवाणी वरती पाहतो त्यापेक्षाही प्रत्यक्षामध्ये प्रशिक्षणाचा सराव अधिक असतो.

सैनिक म्हणून आम्हाला अति दुर्गम प्रदेशात जरी जावे लागले तरी तिथे राहण्यासाठी आणि जगण्यासाठी ज्या कला अंगीभुत असल्या पाहिजे त्या प्रशिक्षणाधर्माण आम्हाला शिकवल्या जातात. आमच्याकडे जर पिण्याचे पाणी उपलब्ध नसेल तर अशावेळी कशी तग धरून राहिले पाहिजे हे देखील प्रशिक्षणामध्ये शिकवले जाते.

जेव्हा आपला सहसैनिक दुखावला गेला असेल तर शत्रूच्या हल्ल्यादरम्यान त्याचा जीव कसा वाजवावा हे देखील प्रशिक्षणात सांगितले जाते. आम्हाला प्रशिक्षणाधर्मान विविध हत्यारे कुशल पणे कशी वापरली पाहिजेत याचे शिक्षण दिले जाते. जमिनीखाली सुरुंग लावले असतील तर त्या ठिकाणी वाचण्यासाठी स्वतःचे संरक्षण कसे करायचे याचा देखील धडा दिला जातो.

माझा प्रशिक्षणाचा काळ हा बहुतांश गोष्टी शिकण्यामध्ये मी घालवला त्यानंतर मला नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले. नियुक्ती मध्ये प्रामुख्याने देशाच्या ज्या सरहद्दी आहेत आणि जिथे दहशतवाद होऊ शकतो अशा ठिकाणी आम्हाला नेमले जाते. रोजच्या हालचालींपेक्षा काही वेगळे तर घडत नाही ना याकडे आम्हाला एक सैनिक म्हणून कटाक्षाने लक्ष द्यावे लागते कारण आमच्या वरतीच संपूर्ण जनता निर्धास्तपणे अवलंबून राहते.

देशाचा सैनिक म्हणून माझी जबाबदारी फार मोठी आहे असे मला वाटते. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे सण म्हणजे भारताचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन. स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर खूप हर्ष उल्हास असतो. आम्ही सर्वजण वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्यक्षिके सादर करतो.

आम्हाला स्वातंत्र्यदिन साजरा करताना खूप आनंद मिळतो. रक्षाबंधन सणावेळी आम्हाला घरी जाणे शक्य नसते पण जेव्हा आम्हाला देशातील आमच्या भगिनी राखी आणि प्रेमाची पत्रे पाठवतात तेव्हा मन अगदी गहिवरून येते मला एक सैनिक म्हणून आपल्या देशाची सेवा करायची आहे आणि हे करत असताना जर मला वीरमरण आले तरी देखील त्यासाठी मी कायम तयार असेन. शेवटी मला एकच वाक्य माझ्या नसानसांमधे कायम जागे ठेवायचे आहे ते म्हणजे ‘ जय हिंद जय भारत ‘

सैनिकाचे मनोगत मराठी निबंध १० ओळी

  1. मी एक सैनिक म्हणून देशाच्या अस्तित्वासाठी कायम तत्पर असतो आणि तुम्ही सर्वजण मला भरभरून प्रेम देता त्यामुळे मला लढण्यासाठी अजून बळ मिळते.
  2. जेव्हा रक्षाबंधन हा सण येतो तेव्हा मला घरची फार आठवण येते मात्र तुम्ही सर्व भगिनी जेव्हा माझासाठी सीमेवर राखी आणि प्रेमाची पत्रे पाठवता तेव्हा मला गहिवरून येते.
  3. सैनिक म्हणून सेवेत रूजू होण्याआधी मला अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले गेले आहे.
  4. सैनिक म्हणून जगताना आम्हाला सर्वप्रथम देशाच्या कल्याणार्थी विचार करावे लागतात.
  5. मी जेव्हा सैनिक म्हणून मराठा रेजिमेंट मध्ये भरती झालो तेव्हा मी भारताची विविधता अगदी जवळून पाहिली.
  6. भारतीय सैन्यदलामध्ये काम करताना आम्हाला अनेक तांत्रिक माहिती बाबत गुप्तता पाळावी लागते.
  7. भारताचा स्वातंत्र्यदिन हा आमच्यासाठी सर्वात मोठा उत्सव असतो.
  8. स्वातंत्र्यदिनी लाल महाल येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात तेथे आम्ही सैनिक आमचे कौशल्य दाखवतो.
  9. जर एखाद्या व्यक्तीने देशविघातक कार्य केले तर अशा व्यक्तीला धडा शिकवण्याकरता आम्हाला सज्ज केले जाते.
  10. एक सैनिक म्हणून जगताना आपल्या देशाची म्हणजेच भारत भूमीची सेवा करणे हे आमचे परम कर्तव्य आहे.

देशाचे रक्षण परकीय आक्रमणांपासून कोण करते?

देशाचे सैनिक हे देशाचे परकीय आक्रमणांपासून रक्षण करतात.

भारत देशात सैन्याचे कोणते प्रकार आहेत?

भारत देशांत सैन्याचे भूदल, नौदल आणि हवाईदल हे प्रकार आहेत.

सैनिकांचे परमकर्तव्य काय आहे?

भारत मातेची सेवा करणे हे सैनिकांचे परम कर्तव्य आहे.

Leave a Comment