अक्षय तृतीया माहिती: अक्षय तृतीया हा सण भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. आम्ही आपल्यासाठी अक्षय तृतीया या सणाची माहिती त्याचे महत्त्व तसेच त्यामागे दडलेला इतिहास घेऊन आलेलो आहोत. सणांबद्दल माहिती मिळवण्यासाठी आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या.
अक्षय तृतीया मुहूर्त
दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया आहे. या दिवशी सकाळी १०:४९ ते दुपारी १२:२० पर्यंत सोने खरेदी साठी सर्वोत्तम मुहूर्त आहे. अक्षय तृतीया १९ एप्रिल रोजी १०:४९ वाजता सुरू होत आहे तर २० एप्रिल रोजी सकाळी ७:२७ वाजता समाप्त होत आहे. आपण जर एखादे शुभ कार्य जसे की सोने खरेदी, जमीन अथवा घर खरेदी करता इच्छित असाल तर अक्षय तृतीयेच्या या सुवर्ण मुहूर्ताचा नक्की फायदा घ्या.
अक्षय तृतीयेचे महत्व
अक्षय तृतीया या दिवशी तुम्ही जर एखादी खरेदी केली तर ती तुम्हाला लाभदायक ठरते असे मानले जाते. अक्षय या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. अक्षय म्हणजेच ज्याचा कधीच क्षय होत नाही. म्हणूनच या दिवशी शुभ कार्य करण्यास प्राधान्य दिले जाते.
अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांना अनन्यसाधारण महत्व आहे. अक्षय तृतीया हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. तुम्ही या दिवशी पंचांग न बघता देखील शुभ कार्य करू शकता कारण हा पूर्ण दिवसच शुभ मानला जातो.
जर तुम्ही अक्षय तृतीया या मुहूर्तावर दानधर्म केला अथवा एखादे शुभ कार्य केले तर त्याचे शुभ फळ तुम्हाला मिळते. अक्षय तृतीया या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते.
अक्षय तृतीया इतिहास
अक्षय तृतीया साजरी करण्यामागे अनेक पौराणिक कथांमध्ये उल्लेख आढळतो.
अक्षय तृतीया या दिवशी पांडवाना अक्षय पात्र मिळाले असे म्हटले जाते. जेव्हा दुर्वास ऋषी आपल्या सर्व शिष्य गणांसोबत वनवास भोगत असलेल्या पांडव आणि द्रौपदी यांच्या पर्णकुटी मध्ये भोजनासाठी आले तेव्हा या अक्षय पात्राच्या मदतीने द्रौपदी ने सर्व ऋषी मुनीना भोजन देऊन तृप्त केले तसेच दुर्वास ऋषींच्या क्रोधाग्नी पासून सर्वांचे रक्षण झाले.
त्रेतायुग प्रारंभ: अक्षय तृतीया या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे म्हटले जाते.
गंगा नदी याच दिवशी पृथ्वी वरती अवतरित झाली असे म्हणतात.
अक्षय तृतीया या दिवशी वेद व्यास यांनी श्री गणेश यांना महाभारत सांगण्यास सुरुवात केली असे म्हटले जाते. भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या महाकाव्याची रचना या दिवशी सुरू झाली.
अक्षय तृतीया कशी साजरी करावी?
अक्षय तृतीया या दिवशी सोने खरेदी करून तुम्ही आपल्या घरी अक्षय वृद्धी आणू शकता.
या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करावी .
दानधर्म करून देखील आपण हा सण साजरा करू शकतो.
आम्हाला आशा आहे की आम्ही अक्षय तृतीया मुहूर्त, अक्षय तृतीया सणाचे महत्व तसेच अक्षय तृतीया सणाचा इतिहास या विषयावर दिलेली माहिती आपणास महत्वपूर्ण वाटली असेल. अशाच नवनवीन माहिती साठी आम्हाला नक्की भेट द्या. धन्यवाद.