Maharashtra Day Wishes In Marathi:
निढळाच्या घामाने भिजला,
देश गौरवासाठी झिजला,
दिल्लीचे ही तख्त राखितो,
महाराष्ट्र माझा!!!
आपल्या महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुलून यावी असे हे महाराष्ट्राचे अतुलनीय वर्णन कविवर्य राजा बढे यांनी केले आणि आपल्या राज्याचे हे राज्यगीत महाराष्ट्र राज्याच्या शौर्यांची ग्वाही देत सर्वत्र घुमत आहे.
दिनांक 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्य साकार झाले आणि प्रत्येक महाराष्ट्रीय नागरिकांसाठी हा दिवस म्हणजे एक उत्सव आहे.
महाराष्ट्र दिन इतिहास:
सर्वप्रथम बॉम्बे स्टेट अस्तित्वात होती मात्र जेव्हा बोली भाषेनुसार राज्य निर्मितीसाठी सरकारने आग्रह धरला तेव्हा मुंबई कोणाकडे हवी यासाठी भरपूर वाद झाला होता. त्याकाळी मराठी आणि कोकणी भाषिक लोकांनी मुंबई सह महाराष्ट्र राज्याची मागणी तत्कालीन आयोगाकडे केली होती.
दिनांक 21 नोव्हेंबर 1956 रोजी त्या काळातील राज्य सरकार पुनर्रचना आयोगाने मुंबई ही नव्याने तयार होत असलेल्या महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये समाविष्ट करण्यास नकार दिला होता त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळी मध्ये असंतोष पसरला तसेच विविध सभा आणि आंदोलने होत होती या दरम्यान त्या काळचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश पोलिसांना दिले आणि यामध्ये 106 हुतात्मे शहीद झाले अशा प्रकारे मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी महाराष्ट्र राज्याला खूप मोठी किंमत चुकवावी लागली होती.
हुतात्म्यांच्या या बलिदानापुढे सरकारला झुकावे लागले होते आणि त्यातूनच पुढे 1 मे 1960 रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
महाराष्ट्र दिन कसा साजरा केला जातो?
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तसेच या दिवशी मुंबई देखील महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आली त्यामुळे हा महाराष्ट्र राज्यासाठी विजय दिवस म्हणून साजरा होतो. या दिवशी महाराष्ट्र राज्य सरकार अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करते.
राज्य सरकार मध्ये समाविष्ट राजकीय नेते महाराष्ट्र राज्य आणि त्याविषयी असलेल्या नवीन योजना सामाजिक रित्या सादर करतात. अनेक योजना अथवा प्रकल्प या दिवशी जनतेसाठी खुले केले जातात.
महाराष्ट्र राज्याचे देशातील स्थान आणि महत्व:
महाराष्ट्र राज्य हे राजकीय तसेच सामाजिक दृष्ट्या भारत देशातील एक अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक मेट्रो शहरे अस्तित्वात आहेत. महाराष्ट्र राज्यामधील पुणे, मुंबई ही शहरे आज जागतिक स्तरावर चमकत आहेत. महाराष्ट्र राज्याचा पुरोगामी विचार हा महाराष्ट्र राज्यासाठी खूप फायदेशीर ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्र घडवला आणि आज तो सर्वत्र मोठ्या दिमाखात उभा आहे हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे.
आज महाराष्ट्र राज्य हे शिक्षण, नोकरी, शेती, समाज जीवन या सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. महाराष्ट्र राज्याचा नागरिक असल्याचा अभिमान आपण सर्वांनी बाळगला पाहिजे.
शेवटी एकच म्हणावेसे वाटते,
जय महाराष्ट्र!