Baldin Essay In Marathi: आपण वयाने मोठे होत जातो मात्र आपल्यातील लहान मुले कायम जिवंतच ठेवले पाहिजे हे आपण ऐकले असेलच. बालदिन हा लहान मुलांसाठी साजरा केला जातो पण मोठ्या व्यक्तींनी देखील आपल्यातील लहान मूल जिवंत ठेवले तर त्यांनीही बालदिन साजरा करायला काहीच हरकत नाही. जगभरामध्ये पूर्वी 20 नोव्हेंबर या रोजी बाल दिन साजरा केला जात असे.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन 14 नोव्हेंबर याचे औचित्य साधून भारताने 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यास सुरुवात केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले फार आवडत असत. लहान मुले ही आपल्या देशाची संपत्ती आहे आणि ही संपत्ती आज जतन केली तर उद्या आपला देश उत्तमरीत्या घडणार आहे असे ते म्हणत .
पंडित जवाहरलाल नेहरू यांना सर्वजण लाडाने चाचा नेहरू असे देखील म्हणत. पंडित नेहरू हे लहान मुलांचे खऱ्या अर्थाने चाचा होते. पंडित नेहरूंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ते पंतप्रधान असताना अशा अनेक उपाययोजना योजनेचे जेणेकरून भारताची भावी पिढी एक उज्वल नागरिक बनू शकेल. पंतप्रधान नेहरू यांच्या काळामध्ये भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) तसेच भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) यांची स्थापना करण्यात आली. आज या संस्थेमधून कितीतरी मुले उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत.
दिल्लीतील सर्वात मुख्य विद्यापीठ जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरूनच ठेवण्यात आलेले आहे. आजवर कितीतरी नामवंत विद्यावृंद जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा भाग बनलेले आहेत.पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीने आज भारताची नवीन पिढी सर्वत्र आपल्या यशाचा डंका वाजवत आहे असे म्हणण्यास हरकत नाही. पंतप्रधान नेहरू यांना कायम लहान मुले अत्यंत प्रिय होती. लहान मुलांना देखील आपले चाचा नेहरू फार आवडत.
नेहरूंची गांधी टोपी आणि नेहरू जॅकेट हे सर्व मुलांमध्ये लोकप्रिय आहे. पंडित नेहरूंचे आवडते फूल गुलाब होते आणि ते कायम जॅकेटमध्ये एक फुल लावून असत. ते मुलांना आणि फुलांना एक समजत. पंडित नेहरूंना मुलांविषयी असलेले प्रेम आणि मुलांच्या उज्वल भविष्याची चिंता या भावनेतून सरकारने त्यांच्या जन्मदिनी भारतीय बालदिन साजरा करण्यास सुरुवात केली.
बाल दिनाचे औचित्य साधून सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. बाल दिना वेळी शाळांमध्ये नृत्य, संगीत, वाचन, कथाकथन आणि साहित्य या विषयावर आधारित सुंदर कार्यक्रम योजले जातात. मुलांमध्ये साहित्याविषयी आवड निर्माण केली जाते. मुलांना बक्षीसे देऊन त्यांना प्रोत्साहित केले जाते. बालदिन साजरा करत असताना मुलांचा आनंदही लक्षात घेणे गरजेचे आहे.
मुलांना ज्या गोष्टीत आनंद मिळतो असे कार्यक्रम साजरे केल्यास मुले ही खुश होऊन जातात.लहान मुले यांना कधीच कोणाविषयी असूया नसते. मुलांमध्ये एकमेकांविषयी प्रेमाची भावना असते आणि ती जागी ठेवणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. मुलांना देशाविषयी प्रेम निर्माण करणे तसेच आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली कर्तव्य यांचे पालन करणे याविषयी पालकांनी सजग राहिले पाहिजे.
लहान मुले हा म्हणजे मातीचा गोळा असतो. आपण ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देतो तसा तो गोळा घडत असतो तसेच शाळेतील शिक्षकांनी लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक मूल वेगळे आहे आणि प्रत्येक मुलांमध्ये वेगळी कला आहे. मुलांमधील कला ओळखून त्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आजच्या काळात शिक्षकांनी मुलांना शिक्षण देणे गरजेचे आहे
.पालकांनी स्वतःच्या अपेक्षा मुलांवर लादता कामा नयेत. मुलांचे बालपण हरवून जाईल अशी वागणूक आई-वडिलांनी टाळली पाहिजे. मुलांसमोर आई-वडिलांनी भांडणे करणे टाळले पाहिजे अन्यथा लहान मुलांवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. मुलांना समाजात एकोप्याने राहिले पाहिजे ही शिकवण घरातून पालकांनी मुलांना दिली पाहिजे.
सार्वजनिक स्वच्छतेचे भान पालकांनी मुलांना शिकवणे गरजेचे आहे. एखादा खाऊचा पॅकेट खाऊ खाऊन झाल्यानंतर कचरा पेटीतच टाकला पाहिजे ही शिकवण पालकांनी मुलांना दिली पाहिजे. पालकांनंतर मूल घडण्यामध्ये सर्वात मोठा वाटा असतो तो म्हणजे गुरुजनांचा अथवा शिक्षकांचा.
शिक्षकांनी मुलांना विनाकारण ओरडून आणि छडी लागे छम छम विद्या येई घमघम हा नियम मोडीत काढून प्रेमाने आणि विश्वासाने मुलांना आपलेसे केले पाहिजे. बाल दिनाचे औचित्य साधून सर्वांनी मुलांना घडवण्यासाठी मुलांच्या कलेने वागून नवीन सुदृढ पिढी तयार करण्याचा संकल्प केला पाहिजे
Baldin Nibandh In Marathi 10 Lines
- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वाढदिवशी म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी भारतामध्ये बालदिन साजरा केला जातो.
- पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले फारच आवडत, सर्व लहान मुलांचे ते लाडके चाचा नेहरू होते.
- पंडित नेहरू यांच्यामध्ये लहान मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे.
- जर आपण महाराष्ट्राची ही संपत्ती प्रामाणिकपणे जपली तर त्यातूनच उद्याचा उज्वल भारत घडेल असे त्यांचे म्हणणे होते.
- पंडित नेहरूंच्या पेहरावामुळे ते लहान मुलांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते त्यांचे गांधी टोपी आणि नेहरू जॅकेट आजही सर्वांना मोहात पाडते.
- भारतामध्ये बाल दिना दिवशी अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रम साजरे केले जातात.
- लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बाल दिनाचे औचित्य साधून नृत्य, संगीत विषय कार्यक्रम घेतले जातात.
- लहान मुलांना कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रोत्साहन पर बक्षीस दिली जातात ज्यामुळे मुलांमध्ये हर्ष उल्हास येतो.
- पालक म्हणून लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कायम सजग राहिले पाहिजे.
- पालकांनंतर लहान मुलांना सर्वात जास्त जवळचे हे त्यांचे गुरुजन असतात म्हणून शाळेतील शिक्षकांनी देखील मुलांना प्रेमाने शिक्षण देत एक उत्तम नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
बालदिन कधी साजरा केला जातो?
दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो.
बालदिन का साजरा केला जातो?
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले फार आवडत म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी बालदिन साजरा केला जातो.
पंडित नेहरूंना लहान मुले कोणत्या नावाने हाक मारत असत?
पंडित नेहरूंना लहान मुले चाचा नेहरू असे म्हणत.