CLOSE AD

Buddha Purnima 2026: बुद्ध पौर्णिमा माहिती 2026

Buddha Purnima 2026: “क्रोधाला प्रेमाने ,पापाला सदाचाराने, लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते” हे महान विचार आहेत परमपूज्य गौतम बुद्धांचे .

भगवान  गौतम बुद्ध कोण होते? 

भगवान बुद्ध म्हणजेच गौतम बुद्ध यांना अवतार म्हणून ओळखले जाते. भगवान गौतम बुद्ध यांचे खरे नाव सिद्धार्थ हे होते. भगवान बुद्धांचा जन्म वैशाख महिन्यातील शुक्लपक्ष पौर्णिमेला झाला ती पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा. आज दिनांक एक मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. गौतम बुद्ध यांचा जन्म, त्यांची ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण हे याच तिथीला झाले म्हणून आजच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

भगवान बुद्ध यांचा जन्म मायादेवी आणि राजा शुद्धोधन यांच्या पोटी झाला. भगवान बुद्धांना लहानपणापासूनच राजवैभव प्राप्त झाले होते त्यामुळे त्यांना समाजातील दुःख दारिद्र्य यांची कल्पना नव्हती. एके दिवशी राजमहालातून बाहेर पडताना त्यांना समाजातील गरिबी दिसली तसेच त्यांचे दुःख समजले त्यानंतर भगवान बुद्ध यांनी सर्व राजवैभवाचा त्याग केला. 

भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. भगवान बुद्धांनी करुणा अहिंसा आणि सत्य यांचे महत्त्व समाजाला सांगितले. भगवान बौद्धांनी अष्टांग मार्ग सांगितला . आज भगवान बुद्धांनी निर्माण केलेल्या बौद्ध धर्माचा प्रसार संपूर्ण जगभर झालेला आढळतो. बौद्ध धर्म हा एक उच्च धर्म मानला जातो.

बुद्ध पौर्णिमा वेळ 2026

दिनांक 30 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून 31 मिनिटांपासून ते दिनांक 1 मे 2026 रोजी रात्री दहा वाजून 51 मिनिटांपर्यंत बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाऊ शकते.

बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली जाते? 

संपूर्ण बुद्ध समाज बुद्ध पौर्णिमा मोठ्या आनंदाने साजरा करतो. बुद्ध पौर्णिमा यादी भगवान बुद्ध यांची मूर्ती अथवा प्रतिमेचे पूजन केले जाते. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करण्याचे वचन दिले जाते. बौद्ध समाजामध्ये बुद्ध पौर्णिमा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी समाजातील लोक एकमेकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतात. भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेली शिकवण आचरणात आणण्यासाठी सर्व बौद्ध बांधव प्रयत्नशील राहतात.

भगवान गौतम बुद्धांचे काही सुंदर विचार आम्ही खाली देत आहोत. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान आणण्यासाठी या विचारांचा अवलंब केल्यास आपणास फायदा होऊ शकतो.

Quotes by Gautam Buddha

🌼“मनच सर्वकाही आहे; तुम्ही जे विचार करता, तेच तुम्ही बनता.”🌼

🌼“शांतता आपल्या आतून येते; ती बाहेर शोधू नका.”🌼

🌼“राग धरून ठेवणे म्हणजे स्वतः विष पिणे आणि दुसऱ्याच्या मृत्यूची अपेक्षा ठेवणे.”🌼

🌼“भूतकाळात अडकू नका, भविष्याची चिंता करू नका; वर्तमानात जगा.”🌼

🌼“आरोग्य हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे, समाधान ही खरी संपत्ती आहे.”🌼

🌼“स्वतःवर विजय मिळवणे हे हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा श्रेष्ठ आहे.”🌼

🌼“आपल्याला कोणी वाचवू शकत नाही; आपल्यालाच स्वतःचा मार्ग चालावा लागतो.”🌼

🌼“प्रत्येक सकाळ नवीन सुरुवात घेऊन येते.”🌼

🌼“चांगले विचार करा, चांगले बोला, आणि चांगले करा.”🌼

🌼“अंधारावर राग करून उपयोग नाही; एक दिवा लावा.”🌼

 

तुम्हाला आम्ही भगवान बुद्ध आणि बुद्ध पौर्णिमा यांविषयी दिलेली माहिती  तसेच quotes कसे वाटली ते अभिप्राय देऊन नक्की कळवा आपला अभिप्राय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद!

Leave a Comment